येत्या दोन वर्षात राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे टोलनाकामुक्त : नितीन गडकरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी देशभरातील टोलनाक्यांसंदर्भात महत्वाची घोषणा केली आहे. येत्या काळात राष्ट्रीय महामार्गावर वाहनचालकांना वारंवार थांबण्याची गरज नाही. कारण येत्या दोन वर्षात राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे टोलनाकामुक्त करणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले. गडकरी म्हणाले की, नवी जीपीएस आधारित कलेक्शन यंत्रणा आणण्यात येणार आहे. ही यंत्रणा सरकारच्या अंतिम टप्प्यात… Continue reading येत्या दोन वर्षात राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे टोलनाकामुक्त : नितीन गडकरी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टोप येथील आठवडी बाजार रद्द…

टोप (प्रतिनिधी) : कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर टोपचा आठवडी बाजार रद्द करण्यात आला आहे. शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत  हॉटस्पॉट गावामध्ये टोप गाव आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून टोप येथील आठवडी बाजार रद्द करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. तसेच गावात आज (गुरुवार) सकाळी एका पुरुषाचा कोरोनाने मृत्यु झाला असून गावात पुन्हा कोरोनाची भिती वाढली आहे. यामुळे नागरीकांनी प्रशासनाच्या… Continue reading कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टोप येथील आठवडी बाजार रद्द…

इचलकरंजीमध्ये खून, खुनी हल्ल्याचे सत्र सुरूच…

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी शहर आणि परिसरात खून आणि खुनी हल्ल्याचे सत्र सुरूच आहे. शहरामध्ये असणाऱ्या दाते मळा येथील इराणी बिल्डिंगमध्ये काल (बुधवार) मध्यरात्रीच्या सुमारास एका कुटुंबावर  खूनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये प्रेमाराम चौधरी (वय 42) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चौधरी हे कापड पँकिंगचे काम करतात. या… Continue reading इचलकरंजीमध्ये खून, खुनी हल्ल्याचे सत्र सुरूच…

सरनोबतवाडीत आयशर टेम्पोला शॉर्टसर्किटने आग : दहा लाखांचे नुकसान

करवीर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील सरनोबतवाडी येथे पुणे-बेंगलोर महामार्गालगत असणाऱ्या ट्रक रिपेरी गॅरेजमध्ये शॉर्टसर्किटने आयशर टेम्पोला आग लागली. यामध्ये या ट्रकचे सुमारे दहा ते बारा लाखांचे नुकसान झाले. महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने आग विझवली. सुदैवाने यामध्ये कुठलीही जिवीतहानी झाली नाही. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सरनोबतवाडी येथे शामराव माने यांचे श्रीगणेश ट्रक रिपेअरीचे गॅरेज आहे. आज (बुधवार) दुपारच्या… Continue reading सरनोबतवाडीत आयशर टेम्पोला शॉर्टसर्किटने आग : दहा लाखांचे नुकसान

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ज्येष्ठ संपादक राजा माने यांनी मुंबई येथे राज्य पातळीवरील डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची स्थापना केली आहे. या संघटनेची कोल्हापूर जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.  यामध्ये ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी विजय पोवार, उपाध्यक्षपदी ताज मुल्लाणी, कोल्हापूर शहराध्यक्षपदी प्रशांत चुयेकर, कोल्हापूर शहर सचिवपदी मदन अहिरे, कोषाध्यक्षपदी उत्तम पाटील यांची नियुक्ती करण्यात… Continue reading डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

कुरुंदवाड येथे मुख्याध्यापकाला कोरोनाची लागण : चार दिवस शाळा बंद

शिरोळ (प्रतिनिधी) : कुरुंदवाड येथील जि.प. च्या केंद्रीय उर्दू शाळेतील  मुख्याध्यापक कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे या शाळेला चार दिवस सुट्टी देण्याचा निर्णय आज (बुधवार) घेण्यात आला आहे. तर या शाळेतील सर्वच शिक्षकांची कोरोना तपासणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांचीही तपासणी करण्यात येणार असल्याचे समजले आहे.  दरम्यान, हे कोरोनाग्रस्त मुख्याध्यापक मिरज येथील असून… Continue reading कुरुंदवाड येथे मुख्याध्यापकाला कोरोनाची लागण : चार दिवस शाळा बंद

आता ‘त्या’ राजकीय शक्तीचा बुरखा फाटायला वेळ नाही लागणार ! : चंद्रकांतदादा पाटील (व्हिडिओ)

सचिन वाझे यांचे निलंबन, पोलीस दलातील बदल्या, वाढती गुन्हेगारी आदी मुद्द्यांवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी राज्य सरकारवर खरमरीत टीका केली.

कोल्हापूर कोरोना अपडेट : चोवीस तासात ४६ जणांना कोरोनाची लागण तर वृद्धेचा मृत्यू

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस होतेयं. गेल्या चोवीस तासात ४६ जणांना कोरोनाची लागण झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. तर आज (बुधवार) दिवसभरात २९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. १,१८१ जणांचे कोरोनाचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील २६, आजरा तालुक्यातील १, करवीर तालुक्यातील ४, पन्हाळा तालुक्यातील… Continue reading कोल्हापूर कोरोना अपडेट : चोवीस तासात ४६ जणांना कोरोनाची लागण तर वृद्धेचा मृत्यू

चंदगड शासकीय जमीन हडप प्रकरण : फिर्यादीच्याच मागे अधिक ससेमिरा…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : चंदगड येथील शासकीय जमीन हडप प्रकरणातील संशयित आरोपी असलेल्या डॉक्टरांनी अशी काही जादू केली आहे की सर्वांचेच ‘मेंदू’  बधिर झाले आहेत की काय अशी शंका येऊ लागली आहे. एकाच वेळी सर्व पातळीवर कारवाईच्या नावानं ‘उजेड’ पडतो आहे. परिणामी, तपास यंत्रणेचा ससेमिरा आरोपीच्या मागे लागण्याऐवजी फिर्यादीच्याच मागे लागल्याचे दिसते. या प्रकरणात ‘चोर सोडून… Continue reading चंदगड शासकीय जमीन हडप प्रकरण : फिर्यादीच्याच मागे अधिक ससेमिरा…

इचलकरंजी येथे ट्रकची मोटरसायकलला धडक : महिला गंभीर

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी येथील डेक्कन चौकात गॅस सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या एका ट्रकने मोटार सायकलस्वाराला पाठीमागून जोरात धडक दिली. त्यामुळे मोटरसायकलवरील महिला महानंदा मारूती कोकाटे (वय ३४, रा. सरनोबतवाडी) ही गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात आज (बुधवार) सायंकाळच्या सुमारास घडला. आज डेक्कन चौकातून महानंदा कोकाटे या आपल्या पती आणि लहान मुलासोबत मोटरसायकल क्र. (एमएच… Continue reading इचलकरंजी येथे ट्रकची मोटरसायकलला धडक : महिला गंभीर

error: Content is protected !!