टाकळीमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर

शिरोळ (प्रतिनिधी) : कृष्णा नदीवर सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामाला चंदुर गावाकडील बाजूने टाकलेल्या भरावामुळे टाकळी भागातील शेतात नदीचे पाणी घुसले आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. याबाबत महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही शासनाच्या समन्वयाने नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. असे   सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सांगितले. यावेळी ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी… Continue reading टाकळीमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर

जांभळी गावामधील तरुणांनी दिला निराधाराला आधार…

इचलकरंजी (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील जांभळी-टाकवडे मार्गावर रात्रीच्या सुमारास गावातील काही तरुणांना एक निराधार व्यक्ती आढळून आली. तेथील युवासेना शहर अधिकारी सोन्या माळी, विशाल गायकवाड, ऋषिकेश भगत, अनिकेत जाधव आदी युवकांनी या व्यक्तीची आपुलकीने विचारपूस केली असता ही व्यक्ती कर्नाटकातील विजापूर येथील असल्याचे समजले. या तरुणांनी माणुसकीचे दर्शन घडवत या व्यक्तीची गावातील शाळेमध्ये राहण्याची सोय… Continue reading जांभळी गावामधील तरुणांनी दिला निराधाराला आधार…

संजीवनच्या विद्यार्थ्यांनी बनवली सौर उर्जेवर चालणारी ‘इलेक्ट्रिक थंडर बाईक’…

पन्हाळा (प्रतिनिधी) : संजीवन शिक्षण समूहाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रिकल विभागाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सौर उर्जेवर चालणारी थंडर बाईक टू व्हीलर बनवली आहे. ही दुचाकी अडीच तास चार्जिंग केल्यावर ८० ते १०० किलोमीटर अंतर कापणार आहे. या गाडीला ७२ होल्ट एंपियर लिथियम आर्यन बॅटरी वापरली असून बीएलडीसी मोटर चेन, पॉवर ट्रान्समिशन आहे. कोणत्याही आणीबाणीच्या परिस्थितीत गाडी जर डिस्चार्ज… Continue reading संजीवनच्या विद्यार्थ्यांनी बनवली सौर उर्जेवर चालणारी ‘इलेक्ट्रिक थंडर बाईक’…

‘दररोज एक विचार’ विद्यार्थी,पालकांना मार्गदर्शक : प्रा. भारत खराटे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रा. सर्जेराव राऊत यांनी विद्यार्थी आणि पालकांसाठी सर्जेराव ‘राऊत’ या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून सुरु केलेला दररोज एक विचार हा उपक्रम मार्गदर्शक असल्याचे प्रा. भारत खराटे यांनी सांगितले. प्रा. खराटे म्हणाले की, प्रा. सर्जेराव राऊत हे चाटे शिक्षण समूहामध्ये शैक्षणिक विभागप्रमुख म्हणून काम करतात. ते गणिताचे व्यासंगी शिक्षक असून आतापर्यंत आदर्श शिक्षक, शिक्षणरत्न,… Continue reading ‘दररोज एक विचार’ विद्यार्थी,पालकांना मार्गदर्शक : प्रा. भारत खराटे

हसन मुश्रीफ फाउंडेशनचा ‘स्नेहा’ला मदतीचा हात…

मुरगूड (प्रतिनिधी) : हंगेरी देशातील बुडापेस्ट येथे होणाऱ्या जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी जिल्ह्याची सुकन्या स्नेहा किरण चौगुले हिची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी निवड झालेली ती महाराष्ट्रातील एकमेव महिला मल्ल आहे. तिची आर्थिक परिस्थिती सामान्य असल्याने या स्पर्धेसाठी ना. हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने तिला आज (गुरुवार) आर्थिक मदत देण्यात आली. स्नेहा ही मुरगूड येथील सदाशिवराव… Continue reading हसन मुश्रीफ फाउंडेशनचा ‘स्नेहा’ला मदतीचा हात…

करवीर पोलिसांनी केली सराईत मोटारसायकल चोरट्यास अटक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर पोलिसांनी आज (गुरुवार) सराईत मोटारसायकल चोरट्यास शिताफीने अटक केली. मारुती गुंडू मस्कर (वय ५४, रा. सध्या उचगाव, ता. करवीर, मूळ गाव – मोरेवाडी ता. चंदगड जि कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. करवीर तालुक्यात मोटारसायकल चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे व अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी… Continue reading करवीर पोलिसांनी केली सराईत मोटारसायकल चोरट्यास अटक

सीमाभागातील दूध उत्पादकांना गोकुळचे नेहमीच सहकार्य लाभले : आ. गणेश  हुक्‍केरी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सीमाभागातील दूध उत्पादकांचे गोकुळ हे आर्थिक उन्नती स्रोत आहे. गोकुळ दूध संघाचे नेहमीच दूध उत्‍पादकांना सहकार्य लाभले असल्याचे प्रतिपादन आ. गणेश हुक्केरी यांनी केले. वीर राणी चेन्नम्मा दूध उत्पादक सहकारी संघ, श्री सरस्वती महिला को ऑप क्रेडिट सोसायटी व श्री समृद्धी महिला कृषी अभिवृद्धी सहकारी संघ मलिकवाड (ता. चिक्‍कोडी जि. बेळगाव) या संस्थांच्या… Continue reading सीमाभागातील दूध उत्पादकांना गोकुळचे नेहमीच सहकार्य लाभले : आ. गणेश  हुक्‍केरी

कोल्हापूर जिल्ह्यात १५२२ जण कोरोना पॉझिटिव्ह : सक्रिय रुग्णसंख्या चौदा हजारांच्या घरात…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मागील चोवीस तासांत कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत कालच्या तुलनेत काहीशी घट झाली आहे. त्याचबरोबर कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या आणि मृतांच्या संख्येतही घट झाली आहे. मागील चोवीस तासांत १५२२ जणांना कोरोनाची लागण झाली असून २९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ९११ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकूण १५ हजारांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत.… Continue reading कोल्हापूर जिल्ह्यात १५२२ जण कोरोना पॉझिटिव्ह : सक्रिय रुग्णसंख्या चौदा हजारांच्या घरात…

इचलकरंजी येथे गुटखा वाहतूक करणाऱ्यास अटक…

इचलकरंजी (प्रतिनिधी) : मोटारीतून तंबाखूजन्य पदार्थ आणि गुटखा वाहतूक करणार्‍या एकाला इचलकरंजीतील गावभाग पोलिसांनी अटक केली. इजाजअली अशरफअली कित्तुर (वय २४, रा. विक्रमनगर, इचलकरंजी) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा, चारचाकी गाडी आणि मोबाईल असा सुमारे २ लाख ६० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. इचलकरंजीतील हॉटेल ताराजवळ गुटखा वाहतूक होत असल्याची माहिती… Continue reading इचलकरंजी येथे गुटखा वाहतूक करणाऱ्यास अटक…

गणेशोत्सवावरील निर्बंधाच्या विरोधात रस्त्यावर उतरणार : ‘आप’चा इशारा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आगामी सार्वजनिक गणेशोत्सवासाठी राज्य सरकारने नियमावली जाहीर केली आहे, मात्र त्याला आम आदमी पार्टीने विरोध केला आहे. ‘आपला गणेशोत्सव – आपला लढा’ ही मोहीम जाहीर करीत या मोहिमेद्वारे कोल्हापुरातील सर्व गणेश मंडळे, तालीम संस्थांच्या बैठका घेऊन या निर्बंधाविरोधात रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा ‘आप’चे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष – संदीप देसाई यांनी… Continue reading गणेशोत्सवावरील निर्बंधाच्या विरोधात रस्त्यावर उतरणार : ‘आप’चा इशारा

error: Content is protected !!