गुड न्यूज : ‘एनबीए’मध्ये आता डिजिटल मिडियाचाही समावेश…

मुंबई (प्रतिनिधी) : भारतातील वृत्तसंस्थांची सर्वात मोठी संघटना असणाऱ्या न्यूज ब्रॉडकास्टर्स असोसिएशननं (NBA-एनबीए) डिजिटल स्वरुपात बातम्या देणाऱ्या संस्थांनाही संघटनेत सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे. News Broadcasts Association या नावाचा विस्तार करून ते News Broadcasts and Digital Association असं केलं आहे. त्यामुळे या संघटनेमध्ये डिजिटल माध्यमांचाही प्रवेश झाला असल्याची माहिती ‘एनबीए’चे अध्यक्ष आणि ज्येष्ठ संपादक रजत… Continue reading गुड न्यूज : ‘एनबीए’मध्ये आता डिजिटल मिडियाचाही समावेश…

इचलकरंजी नगरपरिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देय रक्कम अदा…

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी नगरपरिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या देय रक्कम चर्चेचा विषय बनला होता. नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच सेवानिवृत्त आणि मयत कर्मचाऱ्यांच्या उपदान (ग्रॅज्युएटी), हक्काच्या रजेचा पगार, राखीव वेतन निधीतून ७ कोटी ४ लाख ९० हजारांची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली. या देयकांचा वाटप प्रदान सोहळा आज (शुक्रवार) नगरपरिषदेच्या सभागृहात संपन्न झाला. यासाठी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार… Continue reading इचलकरंजी नगरपरिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देय रक्कम अदा…

जोतिबा डोंगरावरील श्री चोपडाईदेवीची श्रावण षष्ठी यात्रा पारंपरिक पद्धतीने, मात्र भाविकांविनाच…

वाडी रत्नागिरी (प्रतिनिधी) : येथील श्री जोतिबा डोंगरावरील श्री चोपडाईदेवीची श्रावण षष्ठी यात्रा मागील दोन वर्षांप्रमाणेच यंदाही भाविकांविनाच आणि पारंपरिक पद्धतीने पार पडली. आज (शुक्रवार) यात्रेचा मुख्य दिवस होता. एरवी भाविकांमुळे गजबजून जाणाऱ्या मंदिर परिसरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शुकशुकाट होता. आज सकाळी नित्यक्रमाने श्री जोतिबा देवास व श्री चोपडाई देवीला अभिषेक घालण्यात आला. यानंतर श्री जोतिबा… Continue reading जोतिबा डोंगरावरील श्री चोपडाईदेवीची श्रावण षष्ठी यात्रा पारंपरिक पद्धतीने, मात्र भाविकांविनाच…

कोल्हापूर कोरोना अपडेट : ७०१ जणांना डिस्चार्ज, तर ४७१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत चांगलीच घट होत असून बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मागील चोवीस तासात ४७१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दिवसभरात १२ जणांचा मृत्यू झाला असून ७०१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ६९, आजरा – ३, भुदरगड – १, चंदगड – २,… Continue reading कोल्हापूर कोरोना अपडेट : ७०१ जणांना डिस्चार्ज, तर ४७१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

लाभार्थ्यांना शासकीय योजनेचा लाभ देण्यासाठी कार्यरत रहा : आ. चंद्रकांत जाधव

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोरगरीब, निराधार, असाह्य लोकांसाठी शासकीय योजनेतील पेन्शन हक्काची आहे. त्यामुळे प्रत्येक लाभार्थीला शासकीय योजनेचा लाभ देण्यासाठी समितीच्या सर्व सदस्यांनी कार्यरत रहावे, असे आवाहन आमदार चंद्रकांत जाधव यांनी केले. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची बैठक तहसीलदार कार्यालयात तहसीलदार श्रीमती मैमुन्निसा संदे आणि संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे… Continue reading लाभार्थ्यांना शासकीय योजनेचा लाभ देण्यासाठी कार्यरत रहा : आ. चंद्रकांत जाधव

मुंबईत डेल्टा प्लसचा पहिला बळी…

मुंबई (प्रतिनिधी) :  राज्यात डेल्टा प्लसच्या रूग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. मुंबईत डेल्टा प्लसने एका साठ वर्षीय महिलेचा पहिला बळी घेतला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या महिलेने कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले होते. त्यानंतर तिला कोरोनाच्या डेल्टा प्लस वेरिएंटची लागण झाली आणि त्यातच या महिलेचा बळी गेल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईत… Continue reading मुंबईत डेल्टा प्लसचा पहिला बळी…

मौनी विद्यापीठात डॉ. व्ही. टी. पाटील यांची जयंती उत्साहात…

गारगोटी (प्रतिनिधी) : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत डॉ. व्ही. टी. पाटील यांनी श्री मौनी विद्यापीठाची स्थापना केली. त्यातूनच भुदरगड तालुक्याचा सर्वांगीण विकास झाला. तालुक्याच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक विकासात त्यांचे योगदान खूप मोठे असल्याचे मौनी विद्यापीठाचे संचालक प्राचार्य डॉ. आर. डी. बेलेकर यांनी सांगितले. मौनी विद्यापीठाचे संस्थापक डॉ. व्ही. टी. पाटील यांची १३१ वी जयंती साजरी करण्यात… Continue reading मौनी विद्यापीठात डॉ. व्ही. टी. पाटील यांची जयंती उत्साहात…

इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिसांकडून बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस…

इचलकरंजी (प्रतिनिधी) :  इचलकंरजी येथे चलनासाठी आलेल्या बनावट नोटांच्या आधारे शिवाजीनगर पोलिसांनी या नोटा तयार करणार्‍या टोळीचा छडा लावला. या टोळीतील आंबाजी सुळेकर आणि राजुभाई लवंगे या दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून पोलिसांनी १० लाख ५४ हजार ४०० रुपयांच्या बनावट नोटा आणि यंत्रसामुग्री जप्त केली आहे. अशी माहिती उपअधीक्षक बाबुराव महामुनी आणि पोलीस निरीक्षक श्रीकांत… Continue reading इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिसांकडून बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस…

पिंपळगांवात ७० हजारांची घरफोडी…

गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील पिंपळगांव येथील सागर लक्ष्मण पंडे (वय ३२) हे कामानिमित्य मुंबई येथे गेले होते. त्यांच्या घराची कडी-कोयंडा तोडून रोख रक्कम आणि सोन्याचांदीचे दागिणे असा ७० हजारांचा माल अज्ञात चोरट्याने लंपास केला आहे. याबाबत भुदरगड पोलीस ठाण्यात गुन्हा आज (गुरुवार) नोंद झाला आहे. पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, ३ जुलै रोजी सागर… Continue reading पिंपळगांवात ७० हजारांची घरफोडी…

वाघापूरची नागपंचमी यात्रा रद्द…

गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील वाघापूर येथील प्रसिद्ध नागदैवत जोतिर्लिंग मंदिर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन आदेशानुसार बंद आहे. यामुळे उद्या (शुक्रवार) होणारी नागपंचमी यात्रा रद्द केली आहे. याची भाविकांनी नोंद घेऊन देवस्थानला सहकार्य करावे, असे आवाहन स्थानिक देवस्थान समिती अध्यक्ष अरविंद जठार, उपाध्यक्ष सदाशिव दाभोळे यांनी केले आहे. वाघापूर येथे दरवर्षी नागपंचमीला मोठी यात्रा भरते. यावर्षी… Continue reading वाघापूरची नागपंचमी यात्रा रद्द…

error: Content is protected !!