कोल्हापुरातील गणेशोत्सव मंडळांना खड्डयांचे डिपॉझिट माफ करा : शिवसेनेची मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना खड्डयांचे डिपॉझिट पूर्णपणे माफ करण्यात यावे. या मागणीसह इतर विविध मागण्या संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष किशोर घाडगे, सुशील भांदिगरे यांच्या नेतृत्वाखाली आज (बुधवार) शिवसेना संयुक्त उत्तरेश्वर पेठ, बुधवारपेठ शुक्रवार पेठच्या वतीने महापालिका प्रशासनाकडे करण्यात आली. याबाबतचे निवेदन शिष्टमंडळातर्फे उपायुक्त शिल्पा दरेकर यांना देण्यात आले. यावेळी शहरात… Continue reading कोल्हापुरातील गणेशोत्सव मंडळांना खड्डयांचे डिपॉझिट माफ करा : शिवसेनेची मागणी

डिस्मेंटलीग ग्लोबल हिंदुत्व कॉन्फरन्सवर कारवाई करावी : हिंदु जनजागृतीची मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : डिस्मेंटलीग ग्लोबल हिंदुत्व या आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सचे आयोजन करणाऱ्यांसह यामध्ये सहभागी होणारे आणि यांना मदत करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी आज (बुधवार) हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन शिष्टमंडळातर्फे निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडीयामध्ये एका आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सबद्दल देशात असंतोषाचे… Continue reading डिस्मेंटलीग ग्लोबल हिंदुत्व कॉन्फरन्सवर कारवाई करावी : हिंदु जनजागृतीची मागणी

लाईव्ह मराठी ब्रेकिंग : महिला मंडल अधिकाऱ्यासह दोन कोतवालांना लाच घेताना अटक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : तक्रारदाराने खरेदी केलेल्या शेतजमीनीच्या हरकतीच्या दाव्याचा निकाल तक्रारदार यांच्या बाजूने दिला. म्हणून ३० हजारांची मागणी करून तडजोडी अंती प्रत्यक्षात २५ हजारांची लाच स्विकारताना आज (बुधवार) एका मंडल अधिकाऱ्यांसह दोन कोतलांवर कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली. अर्चना मिलिंद गुळवणी (वय ४७, पद-मंडल अधिकारी सजा गडमुडशिंगी) वर्ग-३, रा. संभाजीनगर कोल्हापूर), तात्यासो… Continue reading लाईव्ह मराठी ब्रेकिंग : महिला मंडल अधिकाऱ्यासह दोन कोतवालांना लाच घेताना अटक

रांगोळी येथे सार्वजनिक गणेशोत्सवा संदर्भात बैठकीचे आयोजन…

रांगोळी (प्रतिनिधी) : रांगोळी येथे शिवाजीनगर पोलीस स्टेशन, इचलकरंजी आणि रांगोळी ग्रामपंचायतीने गणेशोत्सवा संदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीत सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशाच्या मूर्ती चार फुटापर्यंत बसव्यात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करणे आणि गणेशाच्या मिरवणूकाला परवानगी नसल्याचे उपनिरीक्षक प्रमोद मगर  यांनी सांगितले. यावेळी सरपंच नारायण भोसले यांनी, गणेशोत्सवाच्या कालावधीत प्रशासनाच्या नियमांचे सर्व मंडळांनी पालन करावे… Continue reading रांगोळी येथे सार्वजनिक गणेशोत्सवा संदर्भात बैठकीचे आयोजन…

घरगुती वापराचा ‘एलपीजी’ सिलेंडर २५ रुपयांनी महागला…

मुंबई (प्रतिनिधी) :  तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या किंमती वाढवल्या आहेत. १४.२ किलो विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत तब्बल २५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता हा सिलेंडर ८८४.५ रुपयांना मिळणार आहे. एवढेच नाही तर १९ किलो व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीही वाढल्या आहेत, त्याची किंमत प्रति सिलेंडर ७५ रुपयांनी वाढवली आहे. यापूर्वी १७ ऑगस्ट रोजी एलपीजी… Continue reading घरगुती वापराचा ‘एलपीजी’ सिलेंडर २५ रुपयांनी महागला…

महात्मा गांधींचा अवमान केल्याप्रकरणी अभिनेत्री पायल रोहतगी विरोधात गुन्हा दाखल…

पुणे (प्रतिनिधी) : महात्मा गांधी आणि काँग्रेस परिवाराची बदनामी केल्याप्रकरणी अभिनेत्री पायल रोहतगी हिच्यावर पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुणे जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणीस संगीता तिवारी यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलीसांनी पायल रोहतगी आणि व्हिडिओ तयार करण्यात आलेल्या एका अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी देखील वादग्रस्त ट्विट… Continue reading महात्मा गांधींचा अवमान केल्याप्रकरणी अभिनेत्री पायल रोहतगी विरोधात गुन्हा दाखल…

मोनिका खिलानीने जिंकला ‘क्लासिक हेरीटेज इंडिया’चा किताब…

पुणे (प्रतिनिधी) : शैक्षणिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुण्यात नुकतीच ‘मिस हेरिटेज इंडिया’ ही सौदर्यवतींची स्पर्धा मोठ्या थाटामाटात पार पडली. या स्पर्धेच्या मुकुटाची मानकरी मोनिका खिलानी ठरली आहे. याचे आयोजन मृणाल एंटरटेंटमेंटच्या वतीने करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये भारतातील विविध सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता. मिस हेरिटेज इंडिया, मिसेस हेरिटेज इंडिया, क्लासिक हेरिटेज इंडिया अशा… Continue reading मोनिका खिलानीने जिंकला ‘क्लासिक हेरीटेज इंडिया’चा किताब…

सुळे येथे मटका अड्ड्यावर छापा : दोघांवर गुन्हा दाखल

कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील सुळे येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकून कळे पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सागर शिवाजी कांबळे (वय ३४, रा. सुळे) आणि ज्ञानदेव पंडीत कांबळे (वय ३२, रा. बोलोली, ता.करवीर) अशी दोघांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद कॉन्स्टेबल प्रमोद पाटील यांनी दिली. सुळे येथील हरीजन वसाहत येथे एका झाडाखाली उघडयावर काल (मंगळवार)… Continue reading सुळे येथे मटका अड्ड्यावर छापा : दोघांवर गुन्हा दाखल

जिल्ह्यात चोवीस तासात ११४ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ११४ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात २ जणांचा मृत्यू झाला असून १३९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ४१, आजरा – ४, भुदरगड – १, चंदगड – ०, गडहिंग्लज – २, गगनबावडा – ०, हातकणंगले – १३, कागल – ३, … Continue reading जिल्ह्यात चोवीस तासात ११४ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…

अनधिकृत बायोडिझेल विक्रीविरोधात धडक मोहीम राबवा : जिल्हाधिकारी

कोल्हापूर, (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात बायोडिझेलच्या अनधिकृत विक्री विरोधात धडक मोहीम राबवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सर्व तहसिलदार व ऑईल कंपनीशी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. सद्यस्थितीत जिल्ह्यात आज अखेर एकही अधिकृत बायोडिझेल विक्रीचा परवाना देण्यात आलेला नाही. कुणी अवैधरित्या बायोडिझेल विक्री करीत असल्यास नागरिकांनी त्यांच्याकडून बायोडिझेल खरेदी करू नये. ज्या व्यक्ती बेकायदेशीररित्या अवैध बायोडिझल… Continue reading अनधिकृत बायोडिझेल विक्रीविरोधात धडक मोहीम राबवा : जिल्हाधिकारी

error: Content is protected !!