कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन दिवसात जनावरांच्या चोरीच्या घटना…

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : कुरुंदवाड पोलीस ठाणे परिसरात दोन वेगळ्या ठिकाणी पाळीव जनावरे चोरीच्या घटना घडल्या आहेत. शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी येथील शेतात खतासाठी बसवण्यात आलेल्या २० मेंढ्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. याची फिर्याद युवराज महादेव येडके (रा. सैनिक टाकळी) यांनी पोलिसांमध्ये दिली आहे. सैनिक टाकळी येथील सुरेश हाके आणि विनोद यंकापगोळ यांच्या मालकीच्या मेंढ्या… Continue reading कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन दिवसात जनावरांच्या चोरीच्या घटना…

इचलकरंजीच्या पोलीस नाईकाला चार हजारांची लाच घेताना अटक…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी चार हजारांची लाच घेताना इचलकरंजीमधील शहापूर पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबलला आज (गुरुवार) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. पांडुरंग लक्ष्मण गुरव (रा. खानापूर ता.भुदरगड, मूळ रा. पिरळ, ता.राधानगरी) असे या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, इचलकरंजीमध्ये तक्रारदार आणि त्यांच्या आई विरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात… Continue reading इचलकरंजीच्या पोलीस नाईकाला चार हजारांची लाच घेताना अटक…

रांगोळीतील रस्त्याचे काम मोजणी करूनच सुरू करावे : किरण हवालदार

रांगोळी (प्रतिनिधी) : रांगोळी येथे कन्या विद्यामंदिराच्या भोवतीने दलित वस्ती सुधारयोजनेअंतर्गत ढोर वसाहत रस्त्याचे काम आहे. या  रस्त्याची आणि विद्यामंदिराच्या जागेची मोजणी करून हा रस्ता सुरू करावा. यासाठी हातकणंगलेच्या गटविकास अधिकारी डॉ. शबाना मोकाशी, ग्रामविकास अधिकारी कुमार वंजिरे आणि रांगोळी ग्रामपंचायतीला किरण हवालदार यांनी निवेदन दिले.  निवेदनात म्हटले आहे की, या रस्त्यांचे काम करत असताना… Continue reading रांगोळीतील रस्त्याचे काम मोजणी करूनच सुरू करावे : किरण हवालदार

कोल्हापूर शहरात ओमायक्रॉनचा रूग्ण सापडल्याने खळबळ  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरातील कळंबा परिसरातील एका रूग्णाला आज (बुधवारी) दुपारी ओमायक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे  या रूग्णाने कोठेही प्रवास केलेला  नाही. त्यामुळे आरोग्य  विभागासह प्रशासनाची चिंता वाढली आहे. रूग्ण राहत असलेला परिसर प्रतिबंधित क्षेत्र करण्यात येणार आहे. कळंबा येथील आयटीआय परिसरातील एका व्यक्तीला खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले होते. त्याचा कोरोना चाचणी… Continue reading कोल्हापूर शहरात ओमायक्रॉनचा रूग्ण सापडल्याने खळबळ  

राधानगरी धरणाचा ‘तो’ दरवाजा बंद झाला…

राशिवडे (प्रतिनिधी) : राधानगरी धरणाचा सकाळी साडेनऊ वाजता उघडलेला मुख्य दरवाजा पाटबंधारे विभागाच्या तत्परतेने जवळपास सहा तासांनी बंद करण्यात आला. तो दरवाजा नेमका उघडला कसा याचं कारण अजूनही समोर आलेलं नाही. हा मुख्य दरवाजा कोणी चुकून उघडला, मुद्दामून उघडला की इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे उघडला गेला याची चौकशी आता केली जाणार आहे. त्यानंतरच यामागचे मुख्य कारण समोर… Continue reading राधानगरी धरणाचा ‘तो’ दरवाजा बंद झाला…

राधानगरी धरणातील विसर्ग संध्याकाळपर्यंत बंद होईल : रोहित बांदिवडेकर

कोल्हापूर (प्रतिनिधी ) : राधानगरी धरणाचे हे गेट शॉर्ट सर्किटमुळे ओपन झाले असल्याचा पाटबंधारे विभागाच्या इलेक्ट्रिकल टीमचा प्राथमिक अंदाज आहे. हे सर्विस गेट बंद करण्यासाठी जलसंपदा विभाग व यांत्रिकी विभागाच्या टीम्स राधानगरी धरणावर पोहोचल्या आहेत. इमर्जन्सी गेट टाकून त्यानंतर सर्विस गेट बंद करण्यात येणार आहे. यासाठी साधारण ५ ते ७ तासाचा वेळ लागणार असून अंदाजे… Continue reading राधानगरी धरणातील विसर्ग संध्याकाळपर्यंत बंद होईल : रोहित बांदिवडेकर

‘गोकुळ’ च्‍या २०२२ दिनदर्शिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन…

कोल्‍हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामार्फत २०२२ नवीन वर्षात ‘आपलं लक्ष्य वीस लक्ष २०२२’ गोकुळ संदर्भित दिनदर्शिकेचे प्रकाशन आज (मंगळवार) संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांच्या हस्ते आणि माजी चेअरमन आणि जेष्ठ संचालक अरुण डोंगळे तसेच संचालक, अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संघाच्या ताराबाई पार्क कार्यालयात करण्यात आले. या दिनदर्शिकेमध्ये २० लाख लिटर दूध संकलनाचे उद्धिष्ठ… Continue reading ‘गोकुळ’ च्‍या २०२२ दिनदर्शिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन…

आदमापूर पायी दिंडीचे हेरवाडमध्ये उत्साहात स्वागत…

हेरवाड (प्रतिनिधी) : आई-वडीलांपेक्षा आयुष्यात मोठे काहीच नाही. आई वडील हेच आपला आदर्श असतात. प्रत्येकजण शाळेत नंतर शिकतो. तर पहिले गुरू आई-वडील असतात. ते चालते बोलते विद्यापीठ आहे. म्हणून दररोज आई वडिलांचे दर्शन घ्या. त्यांच्या सेवेतच खरा देव आहे, असे प्रतिपादन किर्तनकार हभप ज्ञानेश्वर माने यांनी केले. ते हेरवाड येथे  आदमापूर पायी दिंडीचे स्वागतावेळी बोलत… Continue reading आदमापूर पायी दिंडीचे हेरवाडमध्ये उत्साहात स्वागत…

कुरुंदवाड पालिकेच्या प्रशासक पदी निखील जाधव यांची नियुक्ती…

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : कुरुंदवाड पालिकेची २९ डिसेंबरला सभागृहाची मुदत संपणार आहे. ओमयक्रोनच्या संसर्ग थोपवण्यासाठी निवडणुका पुढे ढकलल्याने प्रशासक नेमण्यात येणार आहे. त्यासाठी नगरविकास खात्याकडून त्याबाबतचे परिपत्रक पालिकेला प्राप्त झाले असून मुख्याधिकारी निखिल जाधव यांची प्रशासकपदी नियुक्ती होणार आहे. त्यामुळे नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा कार्यभार पालिका प्रशासकांच्या हाती जाणार आहे. कुरुंदवाड पालिकेचे नगराध्यक्ष आणि नगरसेकांचा नवीन वर्षाच्या… Continue reading कुरुंदवाड पालिकेच्या प्रशासक पदी निखील जाधव यांची नियुक्ती…

प्रक्रिया संस्था गटाची निवडणूक नेत्यांनीच हातात घेतली…

कोल्हापूर (विजय पोवार) :  कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आणि शेवटच्या टप्प्यात विरोधी पॅनल तयार होण्यासाठी खऱ्या अर्थाने कळीचा मुद्दा ठरले त्या प्रक्रिया संस्था गटात सर्वच पक्षांच्या नेत्यांची आणि राष्ट्रवादी पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या गटाची निवडणूक आता उमेदवारांपेक्षा नेत्यांनी हातात घेतली आहे.   जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सत्तारूढ आघाडीचे नेते ना. हसन… Continue reading प्रक्रिया संस्था गटाची निवडणूक नेत्यांनीच हातात घेतली…

error: Content is protected !!