लोकसभा मतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार-औद्योगिक संघटनांचा निर्णय

टोप ( प्रतिनिधी ) कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विविध औद्योगिक वसाहती आहेत. या औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योजक आणि कामगार वर्ग लाखोंच्या संख्येने मतदार कार्यरत आहेत. या मतदारांना या दिवशी मतदान करणे सोईच जावे, कोणीही मतदानापासून वंचित राहू नये याची दक्षता घेण्यासाठी सर्व औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची बैठक संपन्न झाली.या बैठकीमध्ये स्मॅकचे चेअरमन सुरेन्द्र जैन, उपाध्यक्ष जयदीप… Continue reading लोकसभा मतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार-औद्योगिक संघटनांचा निर्णय

मंत्री मुश्रीफांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी केली अंबाबाईकडे प्रार्थना..!

कोल्हापूर, (प्रतिनिधी ) : जिल्ह्याचे नेते पालकमंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त, कोल्हापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करवीर निवासिनी श्री. अंबाबाई मंदिरामध्ये अभिषेक घालण्यात आला. सकाळी नऊ वाजता शहराध्यक्ष आदिल फरास यांच्या नेतृत्वाखाली सर्व माजी नगरसेवक, सर्व कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या अंबाबाई मंदिरामध्ये जमा झाले. सर्वांनी अभिषेक करून साडी-चोळीचा आहेर अंबाबाईला अर्पण केला व मंत्री मुश्रीफ… Continue reading मंत्री मुश्रीफांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी केली अंबाबाईकडे प्रार्थना..!

कोरे अभियांत्रिकीवर युरेका-जिज्ञासा 2 के 24 या स्पर्धेचे आयोजन

वारणानगर ( प्रतिनिधी ) अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे तसेच त्यांच्यामधील नाविन्यपूर्ण कल्पकतेला चालना मिळावी व विज्ञान विषयक अविष्कार सादर करण्याची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्युट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (स्वायत्त) महाविद्यालय गेली 37 वर्षे “युरेका -जिज्ञासा’ नावाची राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प प्रदर्शन व शोध निबंध स्पर्धा आयोजित करत असते. महाविद्यालयातील विद्यार्थी,प्राध्यापक, विभागप्रमुख यांच्या… Continue reading कोरे अभियांत्रिकीवर युरेका-जिज्ञासा 2 के 24 या स्पर्धेचे आयोजन

कु़डाळ येथे 21 एप्रिलरोजी एक दिवसीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन…

कुडाळ (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डॉक्टर्सचे ज्ञान अद्ययावत व्हावे यासाठी डीएफसी सिंधुदुर्ग, वर्किंग कमिटी कुडाळ यांच्यावतीने एक दिवसाची वैद्यकीय परिषद आणि कार्यशाळा सिंधुरेस्पिकॉन २१ एप्रिलरोजी आयोजित करण्यात आली आहे. याकरिता मुंबई, पुणे, सांगली, कोल्हापूर, गोवा येथील नामवंत फुफ्फुसविकार तज्ज्ञ तसेच संशोधक मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. आराध्या अडोरर, झाराप झिरो पॉइंट याठिकाणी ही परिषद संपन्न… Continue reading कु़डाळ येथे 21 एप्रिलरोजी एक दिवसीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन…

महाराष्ट्रदिनी कोल्हापुरात धडाडणार ‘ या ’ नेत्यांच्या तोफा  

कोल्हापूर : कोल्हापुरात लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. उमेदवारांच्या प्रचारार्थ मोठ मोठे नेते सभा घेण्याची तयारी करीत आहेत. गांधी मैदानात एक मे महाराष्ट्रदिनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या तोफा धडाडणार आहेत. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील  महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रचारार्थ काँग्रेससह… Continue reading महाराष्ट्रदिनी कोल्हापुरात धडाडणार ‘ या ’ नेत्यांच्या तोफा  

मंडलिक आणि शाहू छत्रपती कुटुंब एकत्र…घडलं असं काही की…

कागल : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून संजय मंडलिक तर महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती रिंगणात उतरले आहेत.दोन्ही बाजूकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत.यामुळं जिल्ह्यातील लोकसभेच वातावरण चांगलंच तापलं आहे. दोन्ही आघाडींच्या नेत्यांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. गेल्या आठवड्यात महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी शाहू महाराज यांच्या दत्तक प्रकरणाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने एकच खळबळ… Continue reading मंडलिक आणि शाहू छत्रपती कुटुंब एकत्र…घडलं असं काही की…

वाढदिवस पालकमंत्र्यांचा अन् संकल्प प्रा. संजय मंडलिकांच्या विजयाचा..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रभू श्रीराम नवमीचा दिवशीच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा तिथीनुसार वाढदिवस येतो. मंत्री मुश्रीफ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कार्यकर्ते ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग नागरिकांशी दिवसभर मतदानासाठी संपर्क साधत होते. या संवादात कार्यकर्ते मुश्रीफांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रा. संजय मंडलिक यांच्या खासदारकीच्या विजयाचे आवाहन करीत होते. कागल, गडहिंग्लज, उत्तुर विधानसभा मतदारसंघात हे… Continue reading वाढदिवस पालकमंत्र्यांचा अन् संकल्प प्रा. संजय मंडलिकांच्या विजयाचा..!

रामनवमीचे औचित्य साधत खा. धैर्यशील माने यांनी वारणानगर परिसरात दिली भेट..

वारणानगर (प्रतिनिधी) ; रामनवमीचे औचित्य साधत हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खा. धैर्यशील माने यांनी वारणानगर, वाठार परिसरांतील रामनवमींच्या कार्यक्रमांना हजेरी लावली. यावेळी त्यांनी विविध क्षेत्रांतील नेतेमंडळी, कार्यकर्त्याशी संवाद साधला. यावेळी सर्वांनीच धैर्यशील मानेंना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोध्येत प्रभू श्रीराममंदिराची उभारणी करून हिंदूऱ्हदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न… Continue reading रामनवमीचे औचित्य साधत खा. धैर्यशील माने यांनी वारणानगर परिसरात दिली भेट..

भाजपाला विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे : मंत्री चंद्रकांत पाटील

सांगली (प्रतिनिधी) : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध जिल्ह्यांचे दौरे करत आहेत. आज ते सांगली दौऱ्यावर आहेत. सांगली लोकसभा प्रवासादरम्यान शिवसेना उपजिल्हाप्रमुख वीर कुदळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. दरम्यान बावची येथील विलासराव शिंदे विकास सेवा सोसायटी येथे प्रमुख कार्यकर्त्यांसोबत त्यांनी बैठक देखील घेतली. यावेळी भाजपाला विजयी करण्यासाठी… Continue reading भाजपाला विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे : मंत्री चंद्रकांत पाटील

महायुतीतील उमेदवारांना समन्वय साधत विजयी करु -चंद्रकांत पाटील

सांगली ( प्रतिनिधी ) हातकणंगले लोकसभेचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ सदाभाऊ खोत यांच्या पुढाकाराने शिराळा विधानसभा मतदार संघामध्ये रयत क्रांती संघटनेकडून शिराळा विधानसभा मतदार संघाचा मेळावा पार पडला. यावेळी राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. महायुतीतील सर्व घटक पक्षांतील नेते आणि कार्यकर्त्यांनी समन्वय साधत महायुतीच्या उमेदवारांना विजयी करावे. त्यासाठी सर्वांनीच योगदान… Continue reading महायुतीतील उमेदवारांना समन्वय साधत विजयी करु -चंद्रकांत पाटील

error: Content is protected !!