वाढदिवस पालकमंत्र्यांचा अन् संकल्प प्रा. संजय मंडलिकांच्या विजयाचा..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रभू श्रीराम नवमीचा दिवशीच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा तिथीनुसार वाढदिवस येतो. मंत्री मुश्रीफ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कार्यकर्ते ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग नागरिकांशी दिवसभर मतदानासाठी संपर्क साधत होते. या संवादात कार्यकर्ते मुश्रीफांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रा. संजय मंडलिक यांच्या खासदारकीच्या विजयाचे आवाहन करीत होते. कागल, गडहिंग्लज, उत्तुर विधानसभा मतदारसंघात हे… Continue reading वाढदिवस पालकमंत्र्यांचा अन् संकल्प प्रा. संजय मंडलिकांच्या विजयाचा..!

रामनवमीचे औचित्य साधत खा. धैर्यशील माने यांनी वारणानगर परिसरात दिली भेट..

वारणानगर (प्रतिनिधी) ; रामनवमीचे औचित्य साधत हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खा. धैर्यशील माने यांनी वारणानगर, वाठार परिसरांतील रामनवमींच्या कार्यक्रमांना हजेरी लावली. यावेळी त्यांनी विविध क्षेत्रांतील नेतेमंडळी, कार्यकर्त्याशी संवाद साधला. यावेळी सर्वांनीच धैर्यशील मानेंना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोध्येत प्रभू श्रीराममंदिराची उभारणी करून हिंदूऱ्हदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न… Continue reading रामनवमीचे औचित्य साधत खा. धैर्यशील माने यांनी वारणानगर परिसरात दिली भेट..

भाजपाला विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे : मंत्री चंद्रकांत पाटील

सांगली (प्रतिनिधी) : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध जिल्ह्यांचे दौरे करत आहेत. आज ते सांगली दौऱ्यावर आहेत. सांगली लोकसभा प्रवासादरम्यान शिवसेना उपजिल्हाप्रमुख वीर कुदळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. दरम्यान बावची येथील विलासराव शिंदे विकास सेवा सोसायटी येथे प्रमुख कार्यकर्त्यांसोबत त्यांनी बैठक देखील घेतली. यावेळी भाजपाला विजयी करण्यासाठी… Continue reading भाजपाला विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे : मंत्री चंद्रकांत पाटील

महायुतीतील उमेदवारांना समन्वय साधत विजयी करु -चंद्रकांत पाटील

सांगली ( प्रतिनिधी ) हातकणंगले लोकसभेचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ सदाभाऊ खोत यांच्या पुढाकाराने शिराळा विधानसभा मतदार संघामध्ये रयत क्रांती संघटनेकडून शिराळा विधानसभा मतदार संघाचा मेळावा पार पडला. यावेळी राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. महायुतीतील सर्व घटक पक्षांतील नेते आणि कार्यकर्त्यांनी समन्वय साधत महायुतीच्या उमेदवारांना विजयी करावे. त्यासाठी सर्वांनीच योगदान… Continue reading महायुतीतील उमेदवारांना समन्वय साधत विजयी करु -चंद्रकांत पाटील

दुग्ध व्यवसायामुळेच शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती : अरुण डोंगळे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोकुळच्या म्हैस दूध वाढ कृती कार्यक्रमांतर्गत श्री राधाकृष्ण सहकारी दूध संस्था कुशिरे, ता.पन्हाळा या संस्थेच्या दूध उत्पादकांनी एचडीएफसी बँकेच्या माध्यमातून मुऱ्हा जातीच्या १५ म्हैशी हरियाणातील करनाल येथून तर जर्शी जातीच्या १५ गायी बेंगलोर कोलार येथून खरेदी केल्या. त्याचे कुशिरे येथे गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे आणि संचालक मंडळाच्या उपस्थितीमध्ये ती जनावरे दूध संस्थेच्या… Continue reading दुग्ध व्यवसायामुळेच शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती : अरुण डोंगळे

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिनी कागलमध्ये प्रभू श्री. रामचंद्रांची आरती

कागल ( प्रतिनिधी ) आज बुधवार दि. 17 म्हणजेच प्रभू श्री. रामनवमी. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा आज वाढदिवस. या वाढदिवसानिमित्त कागलमध्ये कागल शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने प्रभू श्री. रामचंद्रांच्या आरतीचे आयोजन करण्यात आले होते. खर्डेकर चौकातील प्रभू श्री. राममंदिरात मोठ्या उत्साहात ही आरती झाली. केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने म्हणाले, प्रभू श्री. रामनवमी म्हणजे… Continue reading पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिनी कागलमध्ये प्रभू श्री. रामचंद्रांची आरती

शिरोळ तालुक्यात पहिल्या वळीव पावसाची दमदार हजेरी

शिरोळ – जयसिंगपूर शिरोळसह परिसरात आज बुधवारी सायंकाळी पहिल्या वळीव पावसाने दमदार लावली हजेरी. दिवसभर वातावरणात प्रचंड उष्मा जाणवत होता. सायंकाळी चारच्या सुमारास अचानक गारांसह पावसाने हजेरी लावली. शिरोळ तालुक्यामध्ये दुपारी चार वाजता ढगांच्या गडगडाट व वादळासह झालेल्यां पावसाने हवेमध्ये गारवा निर्माण झाला. त्यामुळे उष्णतेने घायाळ झालेल्या नागरिकांना थोडा वेळ दिलासा मिळाला. तसेच हा पाऊस… Continue reading शिरोळ तालुक्यात पहिल्या वळीव पावसाची दमदार हजेरी

हेरवाडमध्ये दोन वाहनांचा भीषण अपघात ; 7 जण गंभीर जखमी

कुरुंदवाड प्रतिनिधी :- हेरवाड – पाचवा मैल मार्गालगत असणाऱ्या हॉटेल पनुजा जवळ दोन वाहनांच्या समोरासमोर झालेल्या धडकेत सात प्रवासी गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज बुधवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला असून, हा अपघात इतका भिषण होता की दोन वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. जखमींना तातडीने मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल… Continue reading हेरवाडमध्ये दोन वाहनांचा भीषण अपघात ; 7 जण गंभीर जखमी

माघार नव्हे..! ही तर नवी सुरुवात -डॉ. चेतन नरके

प्रतिनिधी (कोल्हापूर ) काही राजकीय आणि सामाजिक कारणामुळे लोकसभा निवडणुकीतून माघार घेत आहे. मात्र, या निवडणूकीत अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाला अथवा उमेदवाराला पाठींबा दिला नसल्याची घोषणा थायलंड देशाचे वाणिज्य सल्लागार, युथ बँकेचे चेअरमन आणि गोकुळ दूध संघाचे संचालक डॉ. चेतन नरके यांनी पत्रकार परिषदेत केली. युवकांना स्वयंरोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध करुन देण्यासाठी चेतन युवा सेतू… Continue reading माघार नव्हे..! ही तर नवी सुरुवात -डॉ. चेतन नरके

लोकसभा निवडणूक लढवणारे शाहू छत्रपती अब्जाधीश ; महाराजांकडे आहे ‘इतकी’ संपत्ती…    

कोल्हापूर : महाराष्ट्राच्या राजकारणात यंदा राजघराण्यातून लोकसभा निवडणूक लढवली जात आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13 वे वंशज उदयनराजे भोसले भाजपाकडून साताऱ्यात उमेदवार आहेत. तर, कोल्हापुरातून श्रीमंत शाहू छत्रपती हे महाविकास आघाडीकडून निवडणूक रिंगणात आहेत. महाविकास आघाडीकडून कोल्हापुरात मोदी विरुद्ध गादी असा प्रचार सुरु असून महायुतीला लक्ष्य केलं जात आहे. दोन्ही बाजूकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या… Continue reading लोकसभा निवडणूक लढवणारे शाहू छत्रपती अब्जाधीश ; महाराजांकडे आहे ‘इतकी’ संपत्ती…    

error: Content is protected !!