LiveMarathi

कळे परिसरात घरगुती-सार्वजनिक गौरी-गणपतीचे विसर्जन उत्साहात…

कळे (प्रतिनिधी) : कळे परिसरासह धामणी खोऱ्यात उत्साहात व भक्तिमय वातावरणात गौरी-गणपतीचे विसर्जन करण्यात आले. प्रत्येक गावांमध्ये ग्रामपंचायीतीच्या नियोजनानुसार गणपतीचे विसर्जन करण्यात आले. चौकाचौकात बाप्पाला निरोप देण्यासाठी पारंपरिक वेशभूषा परिधान करून लहान मुले-मुली, महिला-पुरूष जमले होते. तसेच झिम्मा-फुगडीचा फेर, गौरीगीतांचे सूर सर्वत्र ऐकु येत होते. महिलांनी चौकात गणेशमूर्तीचे औक्षण केले. ग्रा.पं.कडून चौकाचौकात निर्माल्यदान करण्यासाठी निर्माल्य… Continue reading कळे परिसरात घरगुती-सार्वजनिक गौरी-गणपतीचे विसर्जन उत्साहात…

कपिलेश्वर, सरवडे परिसरात घरगुती बाप्पांच्या मुर्तीदान उपक्रमाला उदंड प्रतिसाद… 

कपिलेश्वर (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्यातील कपिलेश्वर, सरवडे, तुरंबे, मांगोली परिसरामध्ये गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या गजरात गणरायाला निरोप देण्यासाठी सकाळी 11 पासून मुख्यमार्गावरून नदीकाठापर्यंत गर्दी झाली होती. यामध्ये महिलांनीही पारंपरिक वेशभूषा करून गौरीची गीते गात गणपती आणि गौरीला निरोप देण्यात आला. तर ग्रामपंचायतीने मुर्ती दान आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी गंगा नदीकाठावर गणेश मूर्तीचे… Continue reading कपिलेश्वर, सरवडे परिसरात घरगुती बाप्पांच्या मुर्तीदान उपक्रमाला उदंड प्रतिसाद… 

हेरवाडमधून दोन मुलांसह विवाहित महिला बेपत्ता…

कुरुंदवाड (प्रतिनिधी) :-  शिरोळ तालुक्यातील हेरवाड येथून आपल्या दोन लहान मुलांसह विवाहिता बेपत्ता झाल्याची नोंद कुरुंदवाड पोलिस ठाण्यात झाली आहे. ज्योती मारुती माने (वय 30) बेपत्ता झालेल्या महिलेचे नांव असून समर्थ मारुती माने (वय 6) तर पुजा मारुती माने (वय 5) असे मुलांची नावे असून याबाबतची फिर्याद मारुती यशवंत माने यांनी कुरुंदवाड पोलिस ठाण्यात दिली… Continue reading हेरवाडमधून दोन मुलांसह विवाहित महिला बेपत्ता…

पुणे फेस्टिव्हलची देशभरात ‘मदर ऑफ ऑल फेस्टिव्हल’ अशी ओळख निर्माण : ना. चंद्रकांत पाटील

पुणे (प्रतिनिधी) : गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुण्याच्या पर्यटनाला चालना देणाऱ्या आणि कला-संस्कृतीचे सुंदर दर्शन घडविणाऱ्या ३५ व्या पुणे फेस्टिव्हलचे पर्यटनमंत्री गिरीष महाजन आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. पुणे फेस्टिव्हलमधील कार्यक्रमाचा दर्जा आणि कलाकारांना मिळणारे प्रोत्साहन पाहता हा महोत्सव ५० वर्ष पूर्ण करेल असा विश्वास व्यक्त करून पर्यटन विभागातर्फे महोत्सवाला यापुढेही सहकार्य… Continue reading पुणे फेस्टिव्हलची देशभरात ‘मदर ऑफ ऑल फेस्टिव्हल’ अशी ओळख निर्माण : ना. चंद्रकांत पाटील

टोप माळी मळा परिसरात बछड्यासह बिबट्याचा वावर; नागरिक धास्तावले

टोप ( प्रतिनिधी ) टोप ता. हातकणंगले येथील माळी मळा येथे काल शुक्रवार सायकाळी 7 .30 वाजता आशिष माळी यांनी बिबट्या दिसल्याने या परिसरातील नागरिक धास्तावले आहेत. या याची माहिती प्राणीमित्र किरण चौगुले यांना कळल्यानंतर त्यांनी त्या परिसरात जाऊन पायाचे ठसे पाहिले यावेळी त्यांना मोठ्या ठशे आढळून आले आहेत. यामुळे बछड्यासह बिबट्या असल्याचे निष्पन्न झाले.… Continue reading टोप माळी मळा परिसरात बछड्यासह बिबट्याचा वावर; नागरिक धास्तावले

गणपती विसर्जन मिरवणुक पार्श्वभूमीवर इचलकरंजीतील वाहतुकीत बदल

कोल्हापूर ( इचलकरंजी ) अनंतचतुर्दशी दिवशी (दिनांक २८ सप्टेंबर रोजी) इचलकरंजी शहरात सार्वजनिक गणेश मंडळाचे गणेशमुर्ती विसर्जन शहरात मोठ्या प्रमाणात होणार आहे. विसर्जन मिरवणुक पाहण्यासाठी इचलकरंजी शहर व आजुबाजूच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात भाविक व प्रवासी वाहतुक करणारी वाहने इचलकरंजी शहरात येत असतात. येणाऱ्या वाहनांची वाहतुक सुरळीत ठेवण्यासाठी नियोजन करणे तसेच इचलकरंजी शहरात सार्वजनिक गणेश मंडळाच्या… Continue reading गणपती विसर्जन मिरवणुक पार्श्वभूमीवर इचलकरंजीतील वाहतुकीत बदल

मोठी बातमी..! कोल्हापूर जिल्ह्यात 5 ऑक्टोबरपर्यंत आंदोलन, मोर्चाला बंदी

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) मराठा समाजास ओ.बी.सी. प्रवर्गातुन आरक्षण मिळावे ही मागणी मान्य न केल्यास दि. 25 सप्टेंबर 2023 पासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व दि. 2 ऑक्टोबर रोजी पासून दसरा चौक या ठिकाणी धरणे, उपोषण आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. जिल्ह्यात विविध पक्ष /संघटना यांच्याकडून त्यांच्या विविध मागण्यांकरीता आंदोलन, उपोषण, मोर्चा इ. प्रकारचे आंदोलन… Continue reading मोठी बातमी..! कोल्हापूर जिल्ह्यात 5 ऑक्टोबरपर्यंत आंदोलन, मोर्चाला बंदी

आसगाव येथे विविध विकासकामांचे उद्घाटन; भास्करराव पेरे पाटील यांनी लावली उपस्थिती

कळे ( प्रतिनिधी ) पन्हाळा तालुक्यातील आसगाव येथील ग्रामपंचायतीकडून आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील व कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर, व यशवंत बॅंक कुडित्रे संचालक प्रकाश देसाई यांच्या उपस्थितीत आमदार विनय कोरे सावकर यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध विकासकामांचे उदघाटन करण्यात आले. आसगाव गावाची 1978 साली स्थापन झालेली ग्रामपंचायत यावेळी बिनविरोध पार पडली. त्यामुळे सध्या… Continue reading आसगाव येथे विविध विकासकामांचे उद्घाटन; भास्करराव पेरे पाटील यांनी लावली उपस्थिती

पुनाळमध्ये आढळला मांडुळ जातीचा दुर्मिळ साप

कळे ( प्रतिनिधी ) पन्हाळा तालुक्यातील पुनाळ येथे शेतातील घराशेजारी वैरण कापत असताना मांडुळ जातीचा साप निदर्शनास पडला. सर्पमित्र, वनरक्षक व संबंधित शेतकऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे मांडुळ सापाला जीवदान देण्यात आले. येथील प्रदिप गायकवाड यांना वैरण कापत असताना सायंकाळी साडेपाच वाजता हा साप दिसला. प्रथमदर्शनी नाग असल्याच्या भितीने त्यांनी सर्पमित्र संभाजी चौगले यांना बोलवले. सर्पमित्र संभाजी चौगले… Continue reading पुनाळमध्ये आढळला मांडुळ जातीचा दुर्मिळ साप

शिवाजी पेठेतील ज्येष्ठ पत्रकार सदाशिव जाधव यांच निधन

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) शिवाजी पेठ कोल्हापूर येथील ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते सदाशिव बाबुराव जाधव यांचे निधन, वयाच्या 67 व्या वर्षी त्यांचं निधन झालं आहे. सध्या ते राजे संभाजी तरुण मंडळ नजीकच्या घरात वास्तव्यावस होते. त्या ठिकाणीच त्यांची प्राणज्योत मालवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे सदाशिव जाधव हे गेल्या काही दिवसांपासून किडनीच्या विकाराने त्रस्त होते. त्यामुळे… Continue reading शिवाजी पेठेतील ज्येष्ठ पत्रकार सदाशिव जाधव यांच निधन

error: Content is protected !!