दुधाळी पॅव्हेलियन येथे ५० बेडचे कोविड सेंटर : आयुक्त

कोल्हापूर (प्रतिनिधी) : दुधाळी पॅव्हेलियन येथे नवीन कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे. या कोविड केअर सेंटरच्या उभारणीच्या कामाची आयुक्तांनी पाहणी केली. ५० बेडचे हे कोविड केअर सेंटर सर्व सुविधायुक्त करण्यावर अधिक भर असून सर्व संबंधितांनी सेंटरच्या उभारणीचे काम अधिक गतीने करावे,’ अशी सूचना आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केली. नगरसेवक प्रतापसिंह जाधव यांच्या… Continue reading दुधाळी पॅव्हेलियन येथे ५० बेडचे कोविड सेंटर : आयुक्त

स्वच्छता अभियानातून ‘ही’ ठिकाणे स्वच्छ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आज (रविवार) पंचगंगा नदी घाट, रंकाळा तलाव परिसरासह अन्य ५ ठिकाणी श्रमदान आणि लोकसहभागातून स्वच्छता मोहिमेतून परिसर स्वच्छ केला. आजच्या स्वच्छता मोहिमेव्दारे शहरातील रिलायन्स मॉल मागील परिसर, खानविलकर पेट्रोल पंप ते भगवा चौक, पंचगंगा नदी घाट परिसर, इंदिरा सागर हॉल ते आयसोलेशन हॉस्पिटल, रंकाळा तलाव परिसर व शाहू स्मृती… Continue reading स्वच्छता अभियानातून ‘ही’ ठिकाणे स्वच्छ

शिरोली दुमाला, गणेशवाडी येथे कोरोनामुळे दोघांचा मृत्यू 

सावरवाडी (प्रतिनिधी) : करवीर तालुक्याच्या पश्चिम भागात कोरोनाचा कहर वाढतच आहे. आज (रविवार) शिरोली दुमाला आणि गणेशवाडी या दोन गावात कोरोनामुळे प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यु झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. शिरोली दुमाला गावातील एक तर गणेशवाडी गावातील एका  शेतकऱ्याचा आज कोल्हापूरच्या कोविड सेंटरमध्ये मृत्यू झाला. या घटनेमुळे दोन्ही गावातील गल्ल्या सील केल्या आहेत. दरम्यान, कोरोनाचे… Continue reading शिरोली दुमाला, गणेशवाडी येथे कोरोनामुळे दोघांचा मृत्यू 

डॉक्टरांच्या उपचाराचेही ऑडिट करण्याची वेळ : जयंत पाटील

सांगली (प्रतिनिधी) : कोरोनावरील उपचारासाठी खासगी डॉक्टर भरमसाठ बिल घेत आहेत. यामुळे बिलासह उपचाराचेही ऑडीट करण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. दक्षिण भारत जैन सभेच्या डॉ. कर्मवीर आरोग्य अभियानतर्गंत चोपडे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सुरू करण्यात आलेल्या कोरोना रूग्णावरील उपचार केंद्राच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील –… Continue reading डॉक्टरांच्या उपचाराचेही ऑडिट करण्याची वेळ : जयंत पाटील

निकृष्ट अन्नधान्य वितरीत करणाऱ्या दुकानदारांविरुद्ध कारवाई

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई, ठाणेसह राज्याच्या विविध जिल्ह्यांतून रेशन दुकानदार निकृष्ट धान्यवाटप करीत असल्याच्या तक्रारी येत आहेत. असे करणाऱ्या दुकानदारांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे. नियमानुसार धान्य वितरण न करणे, पावत्या न देणे, निकृष्ट धान्य वाटप करणे अशा तक्रारी येत आहेत. यासंबंधीच्या बातम्याही… Continue reading निकृष्ट अन्नधान्य वितरीत करणाऱ्या दुकानदारांविरुद्ध कारवाई

पंतप्रधान मोदी घेणार ‘या’ राज्यांच्या मुख्यमत्र्यांशी कोरोना आढावा बैठक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या देशात कोरोनाचा फैलाव वाढतच आहे. या परिस्थितीबद्दल आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशातल्या ७ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे. ही बैठक २३ सप्टेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह दिल्ली, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, पंजाब यासह इतर काही राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत.… Continue reading पंतप्रधान मोदी घेणार ‘या’ राज्यांच्या मुख्यमत्र्यांशी कोरोना आढावा बैठक

‘सेवा सप्ताह’ अंतर्गत शिरोली दुमाला येथे रक्तदान शिबीर संपन्न

सावरवाडी (प्रतिनिधी) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७०व्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे ‘सेवा सप्ताह’ अंतर्गत करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला येथे काल (शुक्रवार) रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपाचे प्रदेश कार्यकारणीचे सदस्य  के. एस.  चौगुले यांच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी भाजपाचे करवीर तालुका अध्यक्ष  हंबिरराव पाटील होते. यावेळी भाजपा शेतकरी आघाडीचे करवीर तालुका… Continue reading ‘सेवा सप्ताह’ अंतर्गत शिरोली दुमाला येथे रक्तदान शिबीर संपन्न

महे येथे ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम

सावरवाडी  (प्रतिनिधी) करवीर तालुक्यातील महे येथे  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने हाती घेतलेली माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम   प्रभावीपणे  राबविण्यात आली. यावेळी ग्रामस्थांना विविध वस्तूंचे घरोघरी वाटप करण्यात आले.  उपसरपंच निवास पाटील, आरोग्यसेवक गणेश पाटील,  आशा पाटील, अंगणवाडी सेविका वृंदा कांबळे, रुपा इंगवले, राजेंद्र कांबळे़ यांनी ऑक्सीमीटर, थर्मामीटर गन, हँन्डग्लोज, मास्क देण्यात आले.

 ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अंतर्गत आरोग्य तपासणी सुरू

चंदगड (प्रतिनिधी): उमगाव येथे ‘माझे कुटुंब , माझी जबाबदारी’, आरोग्य सेवा आपल्या दारी’ या आरोग्य तपासणी अभियानास सुुरुवात करण्यात आली.या अभियान राबविताना आरोग्य उपकेंद्र उमगांव अंतर्गत आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका, पथकटीम, शिक्षक यांनी उत्तमरित्या जबाबदारी घेत प्रत्येक घरी जावून तपासणी करत कोरोना बचावविषयक आणी अभियानाअंतर्गत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमप्रसंगी पथकप्रमुख टीम, आरोग्यसेविका विद्या सावंत, आरोग्यसेवक… Continue reading  ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अंतर्गत आरोग्य तपासणी सुरू

आजऱ्यात पोलिसांची एकाकी ‘कोरोना लढाई’

आजरा (प्रतिनिधी) : तालुक्यासह शहरात मागील १५ दिवसांमध्ये वाढलेल्या कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रित करण्यास आजरा पोलीस एकाकी लढा देत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर सुमारे ३८१ विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यामुळे संसार्गावर थोडा का होईना वचक बसला आहे. प्रत्येकी १०० रुपये प्रमाणे ३८ हजार रुपये दंड संबंधितांकडून वसूल करीत सामाजिक वावर आणि आरोग्य सुरक्षित ठेवण्याचा… Continue reading आजऱ्यात पोलिसांची एकाकी ‘कोरोना लढाई’

error: Content is protected !!