नोकरीसाठी ऑनलाईन जॉब फेअर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे ऑनलाईन जॉब फेअरचे आयोजन २४ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत केले आहे, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सहायक आयुक्त सं. कृ. माळी यांनी दिली. ते म्हणाले, मेळावा केवळ ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांसाठीच आहे. जिल्हयातील इच्छुक उमेदवारांनी… Continue reading नोकरीसाठी ऑनलाईन जॉब फेअर

शाळांबाबतचा निर्णय आता मुख्याध्यापकांच्या कोर्टात…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालये आज, सोमवारपासून टप्प्याटप्प्याने सुरू करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने आदेश दिले आहेत. पण मुख्याध्यापकांनी स्वत:च्या जबाबदारीवर घाईगडबडीत पूर्वतयारी नसताना शाळा सुरू करण्याचा कोणताही निर्णय घेऊ नये, असे व्टिट शिक्षणमंत्र्यांनी केले आहे. परिणामी, शाळा सुरू करण्याच्या अंतिम निर्णयाची जबाबदारी एकमेकांवर ढकलली जात असल्याचे पुढे येत आहे. यामुळे पुन्हा शैक्षणिक… Continue reading शाळांबाबतचा निर्णय आता मुख्याध्यापकांच्या कोर्टात…

प्राथमिक शिक्षकांनी २६ नोव्हेंबरच्या संपात सहभागी होण्याचे आवाहन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी, कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ २६ नोव्हेंबररोजी पुकारलेल्या देशव्यापी संपात सर्व प्राथमिक शिक्षकांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष अर्जुन पाटील, जिल्हा सरचिटणीस प्रमोद तौदकर यांनी केले आहे. याबाबतची माहिती पुणे विभाग राज्य प्रसिद्धिप्रमुख हरिदास वर्णे यांनी दिली आहे.   सरकारच्या शेतकरी, कामगार विरोधी धोरणामुळे श्रमिक जगतावर विपरीत परिणाम होत… Continue reading प्राथमिक शिक्षकांनी २६ नोव्हेंबरच्या संपात सहभागी होण्याचे आवाहन

सीबीएसई १२ वीच्या प्रॅक्टिकल परीक्षेच्या तारखा जाहीर

नवी दिल्ली  (वृत्तसंस्था) : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्यूकेशनने (सीबीएसई) ने १२ वीच्या प्रॅक्टिकल परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या असून  प्रॅक्टिकल परीक्षा १ जानेवारी ते ८ फेब्रुवारीदरम्यान होणार आहे.  या तारखा संभाव्य असल्याचेही सीबीएसईने म्हटले आहे. तसेच निश्चित तारखांसोबत नियमावलीही  लवकरच अधिकृत वेबसाइटवर दिली जाईल, असेही स्पष्ट केले आहे.   प्रॅक्टिकल परीक्षांसाठी एक ऑब्जर्वर देखील नेमण्यात… Continue reading सीबीएसई १२ वीच्या प्रॅक्टिकल परीक्षेच्या तारखा जाहीर

सोमवारपासून शाळा सुरू करणे बंधनकारक नाही : जिल्हाधिकारी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील इयत्ता ९ वी ते १२ पर्यंतचे वर्ग सर्व शिक्षकांची कोविड चाचणी आणि पूर्व तयारी करून टप्याटप्याने सुरू करण्याचा निर्णय संस्थाचालक, पदाधिकारी यांच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात आज (शनिवार) संस्थाचालक, पदाधिकारी यांची व्हिडीओ कॉन्फरन्स बैठक घेण्यात आली. २३ नोव्हेंबरपासून शाळा… Continue reading सोमवारपासून शाळा सुरू करणे बंधनकारक नाही : जिल्हाधिकारी

पुण्यातील शाळा १३ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार..!

पुणे (प्रतिनिधी) : नुकतीच कोरोना रुग्णांची संख्येत घट होत होती. त्यातच मागील काही दिवसांपासून पुन्हा रुग्णसंख्येत वाढ होऊ लागल्याने कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पुणे महापालिकेने शहरातील शाळा १३ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी याबद्दलची माहिती दिली.  याबरोबरच मुंबई, ठाणे आणि पनवेलमधील… Continue reading पुण्यातील शाळा १३ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार..!

शाळा-कॉलेज सुरू करण्याच्या मुद्द्यावर रोहित पवारांचे महत्त्वाचे ट्विट

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनामुळे राज्यभर सर्वच सार्वजनिक ठिकाण बंद आहेत. मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्यामुळे अनेक उद्योगधंदे पुन्हा सुरू झाले आहेत. त्यामुळे आता शाळा-कॉलेजेस सुद्धा उघडण्याच्या होण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जरी रुग्णसंख्या कमी होत असली तरीही सर्वांनी काळजी घेणे अनिवार्य आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक ठिकाणी २३ नोव्हेंबरपासून शाळा आणि महाविद्यालये… Continue reading शाळा-कॉलेज सुरू करण्याच्या मुद्द्यावर रोहित पवारांचे महत्त्वाचे ट्विट

विद्यापीठाकडून शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांच्या कुटुंबातील पाल्याचा शैक्षणिक खर्च

कोल्हापूर (प्रतिनिधी) : काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात बहिरेवाडी गावचे ऋषिकेश जोंधळे शहीद झाले होते. शहीद ऋषिकेश जोंधळे यांच्या कुटुंबातील पाल्याने शिवाजी विद्यापीठाच्या अधिविभागात किंवा संलग्नित महाविद्यालयात प्रवेश घेतल्यास त्याचा संपूर्ण शैक्षणिक खर्च विद्यापीठाच्या वतीने करण्यात येईल, अशी ग्वाही कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी दिली. कुलगुरू डॉ. शिर्के यांनी गुरुवारी सायंकाळी बहिरेवाडी (ता. आजरा)… Continue reading विद्यापीठाकडून शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांच्या कुटुंबातील पाल्याचा शैक्षणिक खर्च

शाळेत ’इतके’च तास होणार : वालावलकर हायस्कूलच्या मुख्याध्यापकांची माहिती (व्हिडिओ)

शासन आदेशानुसार २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरु होणार असून कोल्हापुरातील शां. कृ. पंत वालावलकर हायस्कूलने योग्य नियोजन केले असून दररोज शाळेत इतकेच तास होणार असल्याची माहिती मुख्याध्यापक महावीर मुडबिद्रीकर यांनी दिली.  

शाळा सुरु होणार ! विद्यार्थ्यांत आनंद तर पालकांमध्ये संभ्रमावस्था (व्हिडिओ)

अनेक महिन्यानंतर शाळा सुरु होणार असून या निर्णयाने कोल्हापुरातील विद्यार्थी आनंदी असले तरी पालकांमधेय मात्र संभ्रमावस्था दिसून येत आहे.  

error: Content is protected !!