कुंभोज येथे ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत जनजागृती रॅली

कुंभोज (प्रतिनिधी) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमांतर्गत १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत हातकणंगले तालुक्यातील प्रत्येक घरांवर राष्ट्रध्वज फडकवावा यासाठी आज कुंभोज-नेज येथे जनजागृती रॅली काढण्यात आली. बाहुबली विद्यापीठच्या वतीने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत अनेक विद्यार्थी तिरंगा ध्वज हातात घेऊन सहभागी झाले होते. रॅलीत देशभक्तीपर घोषणा देण्यात… Continue reading कुंभोज येथे ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत जनजागृती रॅली

डी. वाय. पाटील आर्किटेक्चर पश्चिम विभागात सहाव्या स्थानी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘ओपन मॅग्झीन’  या आघाडीच्या नियतकालिकाकडून २०२२ मधील उत्कृष्ट महाविद्यालयांची यादी जाहीर केली असून, डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आर्किटेक्चर विभागाने सर्वोत्कृष्ट महाविद्यालयांच्या यादीत पश्चिम विभागात देशात ६ वे स्थान मिळवले आहे. मेडिकल, इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, सायन्स, कॉमर्स या विभागात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महाविद्यालयांच्या कामगिरीचा आढावा घेऊन ‘ओपन मॅग्झीन’ कडून ही यादी जाहीर केली… Continue reading डी. वाय. पाटील आर्किटेक्चर पश्चिम विभागात सहाव्या स्थानी

जेईई-अॅडव्हान्स परीक्षेसाठी चाटे समूहाचे १७३ विद्यार्थी पात्र

कोल्हापूर (प्रतिनिधी) : नॅशनल टेस्टींग एजन्सीमार्फत घेण्यात आलेल्या जेईई-मेन्स- २०२२ पाया अंतिम निकाल झाला असून, या परीक्षेत चाटे शिक्षण समूहाच्या चार्ट क्लासेस, चाटे आयआयटी- नीट सेंटर ज्युनियर कॉलेजचे १७३ विद्यार्थी जेईई अॅडव्हान्ससाठी पात्र ठरले आहेत. या परीक्षेमध्ये राष्ट्रीय पातळीवरील निकषानुसार समूहाच्या विद्यार्थ्यांनी मिळवले आहे, असे प्रतिपादन शिक्षको संचालक प्रा. डॉ. भारत खराटे यांनी केले. प्रा.… Continue reading जेईई-अॅडव्हान्स परीक्षेसाठी चाटे समूहाचे १७३ विद्यार्थी पात्र

परशुराम विद्यालयामध्ये ‘आम्ही पत्र लिहितो’ उपक्रम

साळवण (प्रतिनिधी) : सध्याच्या काळात समाजमाध्यमातून संपर्क होत असल्याने आपल्यापासून लांब असलेल्या आपल्या जिव्हाळ्याच्या व्यक्तीला पत्र लिहून खुशाली कळवण्याची परंपरा लोप पावत चालली आहे. ही परंपरा जिवंत ठेवण्यासाठी गगनबावडा येथील जि.प. च्या परशुराम विद्यालय-ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ‘आम्ही पत्र लिहतो’ हा उपक्रम सुरू केला आहे. यावेळी जवळपास ७० विद्यार्थ्यांनी आपल्या प्रियजनांना पत्रे लिहिली. परशुराम विद्यालयात शिकणार्‍या… Continue reading परशुराम विद्यालयामध्ये ‘आम्ही पत्र लिहितो’ उपक्रम

आसगावच्या शाळेत इन्ट्रॅक्ट क्लबची स्थापना

कळे (प्रतिनिधी) : संपूर्ण जगभरात शैक्षणिक, सामाजिक कार्य करणारी अग्रगण्य संस्था रोटरी क्लब ऑफ करवीर मार्फत भैरव विद्यानिकेतन आसगाव (ता. पन्हाळा) या शाळेत या क्लबचा पदग्रहण सोहळा पार पडला. या पदग्रहण सोहळ्यात रोटरी क्लब करवीरचे अध्यक्ष उदय पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी यश पोहाळकर यांची अध्यक्ष व रेहान तरठे यांची सचिव म्हणून निवड… Continue reading आसगावच्या शाळेत इन्ट्रॅक्ट क्लबची स्थापना

पणोरे येथे वृक्षदिंडी, एक हजार वृक्षांचे वाटप

कळे (प्रतिनिधी) : पणोरे, येथील कलाशिक्षण प्रसारक मंडळ मल्हारपेठ-सावर्डे संचलित लहू बाळा परितकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व मंदार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून भव्य असा वृक्षदिंडी व वृक्षवाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उदघाटन संस्थापक मारुतीराव परितकर  व पणोरे सरपंच छाया गुरव यांच्या हस्ते करण्यात आले… Continue reading पणोरे येथे वृक्षदिंडी, एक हजार वृक्षांचे वाटप

शिरोळ कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना अध्यक्षपदी चौगुले

कुरुंदवाड (प्रतिनिधी) :  येथील सहकारभूषण एस.के. पाटील महाविद्यालयात शिरोळ तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेची बैठक झाली. बैठकीमध्ये शिरोळ तालुक्याची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी एस. डी. चौगुले (जयसिंगपूर महाविद्यालय) यांची, तर उपाध्यक्षपदी ए. ए. मौलवी (डॉ. अल्लामा इकबाल हायस्कूल कुरुंदवाड) यांची निवड झाली. सचिव- विकास पाटील (अब्दुल लाट), सहसचिव- एस. ए. मुजावर (घोडावत… Continue reading शिरोळ कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना अध्यक्षपदी चौगुले

कोल्हापुरात कौशल्य अभ्यासक्रमासाठी प्रयत्नशील: आ. ऋतुराज पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : एकीकडे बेरोजगारी वाढत असताना दुसरीकडे कंपन्यांना कुशल मनुष्यबळ मिळत नसल्याचे चित्र आहे. हे चित्र बदलण्यासाठी तरूण मनुष्यबळाला कौशल्य विकासाचे बळ देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आ. ऋतुराज पाटील यांनी केले. आधुनिक कौशल्य विकासाच्या माध्यमातून तरुणांना सक्षम बनवणाऱ्या बेळगाव येथील गव्हर्मेंट टूल्स अँड ट्रेनिंग सेंटरला (जीटीटीसी) जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्यासोबत आ. पाटील यांनी… Continue reading कोल्हापुरात कौशल्य अभ्यासक्रमासाठी प्रयत्नशील: आ. ऋतुराज पाटील

‘करिअर’साठी दीनदयाळ ग्रामीण कौशल्य योजना उपयुक्त

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील युवक-युवतींनी करिअर व जीवनमान उज्ज्वल होण्यासाठी दीनदयाळ ग्रामीण कौशल्य योजनेचा (डीडीयू-जीकेवाय) लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ही योजना पूर्णपणे निःशुल्क असून, कोणत्याही प्रकारची फी विद्यार्थ्यांना आकारली जात नाही. केंद्र सरकार व राज्य सरकारचा हा उपक्रम स्तुत्य आहे. ‘डीडीयू-जीकेवाय’ योजना ही ग्रामविकास मंत्रालय भारत सरकार ६० टक्के आणि राज्य… Continue reading ‘करिअर’साठी दीनदयाळ ग्रामीण कौशल्य योजना उपयुक्त

शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्याची मुदत २५ ऑगस्टपर्यंत

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी महाडिबीटी पोर्टलवर परिपूर्ण अर्ज (ऑनलाईन पध्दतीने) भरण्याची मुदत दि.२५ ऑगस्टपर्यत आहे. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अर्ज नोंदणीचे प्रमाण वाढण्याकरिता प्रयत्न करावेत. नोंदणी करण्यात आलेले परिपूर्ण अर्ज सहायक… Continue reading शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्याची मुदत २५ ऑगस्टपर्यंत

error: Content is protected !!