महिला वैमानिकाने उडवले लढाऊ विमान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने सगळीकडे यशस्वी, क्रांतीकारी महिलांच्या यशोगाथा प्रसिद्ध होत असताना संरक्षण क्षेत्रातूनही एक आनंदाची आणि अभिमानाची घटना समोर येत आहे. पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढत सुखोई-३० लढाऊ विमानाचे महिला वैमानिकाने उड्डाण केले. आसाममधील भारत-चीन सीमेवर तेजपूर येथील पूर्व सेक्टरमधील फॉरवर्ड बेसवरून सुखोई ३० विमानाने उड्डाण घेतले. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले… Continue reading महिला वैमानिकाने उडवले लढाऊ विमान

शिवाजी विद्यापीठास ‘युजीसी’कडून ‘कॅटेगरी-१’चा दर्जा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील शिवाजी विद्यापीठाला नुकताच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने ‘कॅटेगरी-१’ विद्यापीठाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. ही माहिती कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज (मंगळवार) पत्रकार परिषदेत दिली. कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सांगितले की, विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) विद्यापीठांना श्रेणीबद्ध स्वायत्तता देण्याचा निर्णय २०१८मध्ये घेतला. त्यानुसार ‘नॅक’ (बंगळूर) यांचे ३.५१ सीजीपीए गुणांकन आणि… Continue reading शिवाजी विद्यापीठास ‘युजीसी’कडून ‘कॅटेगरी-१’चा दर्जा

‘डी. वाय.’ कृषी, तंत्र विद्यापीठाच्या १७ विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप

कोल्हापूर (प्रतिनिधी) : तळसंदे येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठामध्ये विविध अभ्यासक्रमासाठी सर्वाधिक गुण मिळवून प्रवेश घेतलेल्या १७ विद्यार्थ्यांना ‘शांतदेवी पाटील मेरिट स्कॉलरशीप’ने सन्मानित करण्यात आले.  या सर्व विद्यार्थ्यांचे १०० टक्के शुल्क माफ करण्यात येत असल्याची घोषणा कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी केली. विद्यापीठाच्या दुसऱ्या ओरिएंटेशन प्रोग्राममध्ये अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. संस्थेचे… Continue reading ‘डी. वाय.’ कृषी, तंत्र विद्यापीठाच्या १७ विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप

साऊथ वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटीची सुरेश सुतार यांना डॉक्टरेट

कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील कळे येथील विश्वविक्रमवीर सुरेश पांडुरंग सुतार यांना साऊथ वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटी यांच्याद्वारे दिल्ली येथे सोशल कौन्सरन्स पदवी देऊन गौरविण्यात आले. सुरेश सुतार यांच्या नावावर लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड २०००, ओ.एम.जी.बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड २०२० आहे. विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल भारतातील बारा व्यक्तींमध्ये सुतार यांची निवड करण्यात आली. त्यामुळे कोल्हापूरच्या… Continue reading साऊथ वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटीची सुरेश सुतार यांना डॉक्टरेट

मिम्ससाठी उत्तम सेन्स, निरीक्षण कौशल्य हवे : सुमित पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मिम्ससाठी उत्तम सेन्स हवा तसेच निरीक्षण कौशल्यही असायला पाहिजे. तरच उत्तम प्रकारचे मीन्स तयार होऊ शकतात, असे प्रतिपादन अभिनेता, कंटेंट क्रिएटर सुमित पाटील यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या पी. जी. डिप्लोमा इन ऑनलाइन जर्नालिझमच्या वर्गाच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. सुमित पाटील म्हणाले, मिम्सचा उद्देश मनोरंजन आहे; परंतु… Continue reading मिम्ससाठी उत्तम सेन्स, निरीक्षण कौशल्य हवे : सुमित पाटील

स्तुती प्रशिक्षण कार्यक्रमाचे संशोधक विद्यार्थ्यांनी केले कौतुक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सरकारच्या स्तुती प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये दिल्ली, गुजरात, हैदराबाद, कर्नाटक, पंजाब, तमिळनाडू, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील संशोधक विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले होते. शिवाजी विद्यापीठमध्ये सैफ सेंटरने सहावा स्तुती प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता. या सात दिवसांच्या कार्यक्रमामध्ये सर्व संशोधक विद्यार्थी तसेच व्याख्यात्यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनाचे व प्रशासकीय कौशल्याचे भरभरून कौतुक केले आहे. सैफ… Continue reading स्तुती प्रशिक्षण कार्यक्रमाचे संशोधक विद्यार्थ्यांनी केले कौतुक

एम.ए. मास कम्युनिकेशनचे डॉ. शिवाजी जाधव समन्वयक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठाच्या एम.ए. मास कम्युनिकेशन विभागाच्या समन्वयक पदी पत्रकारिता व जनसंवाद अधिविभागातील सहायक प्राध्यापक डॉ. शिवाजी जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. नुकतेच डॉ. जाधव यांना विद्यापीठ प्रशासनाकडून नियुक्तीचे पत्र देण्यात आले.  शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील तसेच प्र-कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी त्यांच्याकडे ही… Continue reading एम.ए. मास कम्युनिकेशनचे डॉ. शिवाजी जाधव समन्वयक

शिवाजी विद्यापीठात कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती

कोल्हापूर (प्रतिनिधी) : थोर समाजसुधारक व शिक्षण प्रसारक कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांची जयंती आज शिवाजी विद्यापीठात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. आज सकाळी शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनात प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. तत्पूर्वी, प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांनी विद्यापीठाच्या प्रांगणातील कर्मवीर पाटील… Continue reading शिवाजी विद्यापीठात कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती

डी. वाय. पाटील आर्किटेक्चरला ‘इंटॅक’चे सदस्यत्व

कोल्हापूर (प्रतिनिधी) : डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरला इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज (आयएनटीएसीएच) या राष्ट्रीय पातळीवरील सर्वोच्च हेरिटेज संस्थेचे सदस्यत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे महाविद्यालयाचे कार्य व गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज (आयएनटीएसीएच) अर्थात ‘इंटॅक’ ची स्थापना १९८४ मध्ये नवी दिल्ली… Continue reading डी. वाय. पाटील आर्किटेक्चरला ‘इंटॅक’चे सदस्यत्व

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीच्या पात्र विद्यार्थ्यांसाठी विशेष कॅम्प

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर सेवा पंधरवडा दरम्यान मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रस्ताव स्वीकारण्यासाठी विविध ठिकाणी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील अनुदानित प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे प्रस्ताव दिलेल्या ठिकाणी दि.३० सप्टेंबरपर्यंत गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या प्रतिस्वाक्षरीने सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी केले… Continue reading मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीच्या पात्र विद्यार्थ्यांसाठी विशेष कॅम्प

error: Content is protected !!