टोप येथील शिवराज विद्यामंदीरला ‘गुणवंत’ शाळा पुरस्कार प्राप्त…

टोप (प्रतिनिधी) : टोप येथील शिवराज विद्यामंदीराला महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, कोल्हापूर खाजगी प्राथमिक विभागामार्फत गुणवंत शाळा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार शिक्षक आमदार जयंत आसगांवकर यांच्या हस्ते शाळेच्या मुख्याध्यापिक एस. एस. पाटील आणि सर्व शिक्षकांना देण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, महानगर पालिका शिक्षणाधिकारी डी. के. कुंभार, शिक्षण निरीक्षक आर. जी. चौगुले,… Continue reading टोप येथील शिवराज विद्यामंदीरला ‘गुणवंत’ शाळा पुरस्कार प्राप्त…

शरद पवार भावूक होतात तेव्हा…..

औरंगाबाद (प्रतिनिधी) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना डी. लिट पदवी देऊन गौरव केला. कुलपती आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते डी. लिट देऊन गौरवण्यात आले. यावेळी शरद पवार भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६२ वा दीक्षान्त समारंभ आज पार पडला. ‘सुपर कॉम्प्युटर’ चे जनक विजय भटकर… Continue reading शरद पवार भावूक होतात तेव्हा…..

शिक्षकांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० निबंध स्पर्धा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यामध्ये कार्यरत असणाऱ्या पूर्व प्राथमिक ते विद्यापीठ स्तरावरील शिक्षकांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० या विषयावर खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन करून प्रत्येक विभागातून जिल्हा स्तरावर पहिले तीन क्रमांक काढण्यात येणार आहेत. या स्पर्धा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे. निबंध दि. ३० नोव्हेंबरपर्यंत जिल्हा… Continue reading शिक्षकांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० निबंध स्पर्धा

शहीद शिक्षण मंडळ ‘पॉझिटिव्हीटी जेम्स ऑफ इंडिया’ने सन्मानित

राशिवडे (प्रतिनिधी) : नॅशनल समीट ऑन लीडरशिप इन पॉझिटिव्हीटी २०२२ मध्ये शहीद शिक्षण प्रसारक मंडळास ‘पॉझिटिव्हीटी जेम्स ऑफ इंडिया’ हा सन्मान बहाल करण्यात आला. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत एअर मार्शल अजित भोसले यांच्या हस्ते हा सन्मान देण्यात आला. भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहीद… Continue reading शहीद शिक्षण मंडळ ‘पॉझिटिव्हीटी जेम्स ऑफ इंडिया’ने सन्मानित

शिवाजी विद्यापीठाच्या इमारतीस आकर्षक रोषणाई

विद्यापीठाच्या इमारतीस रोषणाई (छाया : सचिन कामत)

पाचवी, आठवीची स्कॉलरशिप परीक्षा १२ फेब्रुवारीला

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षाच्या तारखा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने निश्चित केल्या आहेत. राज्यातील इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा १२ फेब्रुवारी २०२३ रोजी होणार आहे. या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता… Continue reading पाचवी, आठवीची स्कॉलरशिप परीक्षा १२ फेब्रुवारीला

अधिसभेवर महाडिक, हंगीरगेकर, डॉ. वाळवेकर यांची निवड

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठ अधिविभागातील शिक्षकांमधून अधिसभेवर निवडून द्यावयाच्या तीन सदस्यांच्या निवडणुकीमध्ये खुल्या जागेवर शशीभूषण बाबासाहेब महाडिक यांची, तर राखीव प्रवर्गातील अनुसूचित जमातीमधून डॉ. शंकर पोशेट्टी हंगीरगेकर आणि महिला प्रतिनिधी म्हणून डॉ. माधुरी वसंत वाळवेकर यांची निवड झाली. शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभा, विद्यापरिषद आणि नऊ अभ्यास मंडळासाठी निवडणूक दि.१४ नोव्हेंबर रोजी झाली. या निवडणुकीची मतमोजणी… Continue reading अधिसभेवर महाडिक, हंगीरगेकर, डॉ. वाळवेकर यांची निवड

कागलमध्ये पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यशाळा

कागल (प्रतिनिधी) : राजे विक्रमसिंह घाटगे फाऊंंडेशन व जिजाऊ महिला महिला समितीच्या वतीने कागल येथे दि. २७ नोव्हेंबर रोजी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले आहे, अशी माहिती राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा नवोदिता घाटगे यांनी पत्रकाद्वारे दिली. महाराष्ट्र शासनाने यावर्षी मोठ्या प्रमाणावर पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा लाभ सर्वसामान्य युवक-युवतींंना व्हावा, या… Continue reading कागलमध्ये पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यशाळा

दहावी-बारावीच्या परीक्षा जुन्याच पद्धतीने होणार

पुणे (प्रतिनिधी) : दहावी आणि बारावीच्या परीक्षा या जुन्याच पद्धतीने घेण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आला आहे. कोविड काळात विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या सवलती रद्द करण्याचा निर्णय शिक्षण मंडळाकडून घेण्यात आला असून, २०२३ ची बोर्डाची परीक्षा ही १०० टक्के अभ्यासक्रमावर होणार असल्याचे शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे. मार्च २०२० पासून… Continue reading दहावी-बारावीच्या परीक्षा जुन्याच पद्धतीने होणार

‘शाहू’ शिष्यवृत्ती योजनेच्या अर्जासाठी ७ डिसेंबरपर्यंत मुदत 

कोल्हापूर (प्रतिनिधी) : देशातील नामांकित शैक्षणिक संस्थामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना ‘राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना’सन २०२२-२३ करिता अर्ज करण्यास ७ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी  माहिती समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी दिली आहे. देशातील नामांकित शैक्षणिक संस्थामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना ‘राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती… Continue reading ‘शाहू’ शिष्यवृत्ती योजनेच्या अर्जासाठी ७ डिसेंबरपर्यंत मुदत 

error: Content is protected !!