LiveMarathi

सासरच्या छळास कंटाळुन विवाहितेची आत्महत्या; पती, सासु, सासऱ्यावर गुन्हा नोंद

कळे ( प्रतिनिधी ) सासरच्या छळास कंटाळुन युवतीने आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना वेतवडे पैकी भेंडाई धनगरवाडा, ता.पन्हाळा येथे घडली आहे. यात मंगल रामा घुरके (वय 21) यांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर पिडीतेचे पती, सासु, सासऱ्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आत्महत्या प्रकरणी पिडीतेच्या मृत्युस कारणीभूत पती बिरु बाबुराव येडगे, सासु सखुबाई… Continue reading सासरच्या छळास कंटाळुन विवाहितेची आत्महत्या; पती, सासु, सासऱ्यावर गुन्हा नोंद

मद्यधुंद वाहनचालकाने वाहनांना उडवत गाठला पन्हाळा : दुचाकीस्वार गंभीर

पन्हाळा (प्रतिनिधी) : कोल्हापूरहून पन्हाळगडाच्या दिशेने येणारी इनोव्हा गाडी (एमएच ०९ ईएल ०४६६) वाहन चालक जयदिप उर्फ पवनकुमार दिपक शेटे (वय ४२, रा. कबनुर, इचलकरंजी) याने मद्यप्राशन करून धुंद अवस्थेत अतिवेगाने वाहन चालवत वाघबीळ घाटातील नलवडे बंगला येथे एका दुचाकीस्वाराला उडवले. तर पन्हाळा घाटामधील इतर गाड्यांना डॅश मारत पन्हाळा येथे तीन दरवाजा परिसरात आला. यावेळी… Continue reading मद्यधुंद वाहनचालकाने वाहनांना उडवत गाठला पन्हाळा : दुचाकीस्वार गंभीर

मजले येथे गंठन चोरणाऱ्या दोघांना अटक

हातकणंगले (प्रतिनिधी) : तालुक्यातील मजले येथे बळजबरीने वाटसरू महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठन चोरणाऱ्या दोघांना हातकणंगले पोलिसांनी अटक केली आहे. विजय प्रभाकर पोवार (वय ३८, रा. रुकडी) याला हातकणंगले येथील भंडारे पेट्रोल पंपाजवळ पकडले. दुसरा संशयित आरोपी विशाल सोनबा खाडे (वय २८, रा. हणमंतवाडी, ता. करवीर) याला त्याच्या घरातून ताब्यात घेण्यात आले. गंठन लंपास करण्याची घटना… Continue reading मजले येथे गंठन चोरणाऱ्या दोघांना अटक

थायलंडमध्ये गोळीबार २२ मुलांसह ३१ जणांचा मृत्यू

बँकॉक: थायलंडमध्ये एका प्री-स्कूलमध्ये गोळीबार झाल्याचे वृत्त असून त्यात २२ मुलांसह ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. एका माजी पोलिस अधिकाऱ्याने प्री-स्कूल चाइल्ड डे-केअर सेंटरमध्ये गोळीबार केला. थायलंडच्या उत्तर पूर्व भागातील बुआ लाम्फू येथे झालेल्या या घटनेनंतर गोळीबार करणारा फरार झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ठार झालेल्यामध्ये मुलांचा आणि जेष्ठ नागरिकांचा समावेश आहे. गोळीबार करणाऱ्याने चाकूने… Continue reading थायलंडमध्ये गोळीबार २२ मुलांसह ३१ जणांचा मृत्यू

वृद्धेचे दागिने चोरणाऱ्या दोन महिलांना अटक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : एस.टी. बसमधून उतरणाऱ्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सुमारे ८ लाख रु किमतीचे १७ तोळे सोन्याच्या दागिन्यांची पिशवी लंपास करणाऱ्या दोन चोरट्या महिलांना पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक करून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नकुशा बाबासो सकट (वय ४५, मानेनगर, गणेश फौंड्रीमागे, रुई) आणि सुभद्रा कल्लाप्पा चौगले (वय ५७, शिवाजी तालीमजवळ हातकणंगले) अशी अटक… Continue reading वृद्धेचे दागिने चोरणाऱ्या दोन महिलांना अटक

मुले पळवणारी टोळी : अफवांना अटकाव, सतर्कता आवश्यक

राशिवडे (प्रतिनिधी) : सध्या जिल्ह्यामध्ये मुले पळवणारी टोळी आल्याच्या बातम्या वारंवार कानावर पडत असताना याची खातरजमा करून घेण्याबरोबरच टोळी आल्यासंदर्भातील व्हिडिओ क्लिप्स, फोटोज सोशल मीडियावर एकमेकांना पुढे पाठवताना दक्षता घेणे आवशक आहे. अफवांचे पीक अधिक फोफावणार नाही, याची काळजी घेत सतर्कता बाळगली तर अशा घटनांना पायबंद बसेल आणि मुलांबरोबर पालकांची भीती कमी होण्यास मदत होईल,… Continue reading मुले पळवणारी टोळी : अफवांना अटकाव, सतर्कता आवश्यक

लसीकरणानंतर बालकाचा मृत्यू; आरोग्य केंद्राची तोडफोड

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील सदर बाजार येथील दीड वर्षाच्या मुलाला शुक्रवारी प्राथमिक आरोग्य केंद्रात लस दिली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या बालकाचा मृत्यू झाला. लसीकरणात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत आज सोमवारी नातेवाइकांनी आरोग्य केंद्राची तोडफोड केली. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रातील साहित्य, खिडक्यांच्या काचा, खुर्ची, टेबल आणि इतर साहित्याची जमावाकडून मोडतोड झाली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे… Continue reading लसीकरणानंतर बालकाचा मृत्यू; आरोग्य केंद्राची तोडफोड

इचलकरंजीनजीक मित्रानेच केला मित्राचा खून

इचलकरंजी (प्रतिनिधी) : यड्राव फाटा-पंचगंगा साखर कारखाना मार्गावर शहापूर येथील म्हसोबा मंदिर परिसरात एका तरुण वहीफणी कामगाराच्या तोंडावर व डोक्यात दगड घालून खून करण्यात आला आहे. सूरज बबन कांबळे (वय २५) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली आहे. आर्थिक व्यवहारातून मित्रानेच हा खून केला असावा, अशी प्राथमिक माहिती मिळत… Continue reading इचलकरंजीनजीक मित्रानेच केला मित्राचा खून

कसबा बावडा येथे अनैतिक संबंधातून तारळेतील महिलेचा गळा चिरून खून…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कसबा बावडा येथे अनैतिक संबंधातून कोयत्याने गळा चिरून राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे येथील महिलेचा निर्घुण खून केल्याची घटना आज (रविवार) उघडीस आली. दरम्यान, तातडीने स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या शाखेच्या पोलीसांनी शहरातील अयोध्या टॉवरसमोर असणाऱ्या रस्त्यावर संशयीताला अटक केली. राकेश शामराव संकपाळ (वय ३०, रा. लाईनबाजार, कसबा बावडा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.… Continue reading कसबा बावडा येथे अनैतिक संबंधातून तारळेतील महिलेचा गळा चिरून खून…

वाशी येथे तिघा संशयितांकडून टेहळणी

राशिवडे (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील वाशी येथील कुमार विद्यामंदिरच्या आवारात तीन अनोळखी व्यक्ती टेहळणी करत असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या संशयास्पद हालचालीवरून काही सतर्क नागरिकांनी त्यांची चौकशी केली. त्यांना योग्य उत्तरे देता न आल्याने आणि लोकांची वाढती गर्दी पाहून तिघा संशयितांनी तेथून पळ काढला. गुरुवारी दुपारी  ४ वाजता कुमार विद्यामंदिर वाशी या शाळेच्या आवारात तीन अनोळखी… Continue reading वाशी येथे तिघा संशयितांकडून टेहळणी