LiveMarathi

संजय राऊत यांचा कोठडीतला मुक्काम वाढला

मुंबई (प्रतिनिधी) : गोरेगाव पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अद्याप दिलासा मिळालेला नाही. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी तहकूब करून पुढील सुनावणी १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आज होणारी सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. तर त्यांचा कोठडीतील मुक्कामही अजून वाढला आहे. पत्राचाळ… Continue reading संजय राऊत यांचा कोठडीतला मुक्काम वाढला

‘मनोधैर्य योजनेतून ‘पीडित महिला, बालकांना अर्थसहाय्य

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  बलात्कार, बालकावरील लैंगिक अत्याचार व पुनर्वसन करण्यासाठी सुधारित मनोधैर्य योजनेअंतर्गत बलात्काराच्या गुन्ह्याच्या खटल्यामधील १५ पीडित महिला, पोक्सो गुन्ह्यामधील १४४ पीडित बालकांना भरघोस आर्थिक मदत करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष एसी. सी चांडक यांचे मार्गदर्शनाखाली प्राधिकरणामार्फत ६७.४० लाख रुपयांचे अर्थसाहाय्य करण्यात आले. यामध्ये ॲसिड हल्ल्यातील दोन १५ पीडित महिला,… Continue reading ‘मनोधैर्य योजनेतून ‘पीडित महिला, बालकांना अर्थसहाय्य

अनिल देशमुख यांना जामीन; पण तुरुंगातच राहणार

मुंबई (प्रतिनिधी) : माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख यांना न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या एकल पीठाने ईडीने दाखल केलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज मंजूर केला. देशमुख यांना गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अटक करण्यात आली होती; परंतु सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात मात्र त्यांना जामीन मिळालेला नाही. त्यामुळे त्यांना आताही तुरुंगात राहावे… Continue reading अनिल देशमुख यांना जामीन; पण तुरुंगातच राहणार

धनुष्यबाण कोणाचे? आता लढाई निवडणूक आयोगाच्या कोर्टात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षादरम्यान सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाला मोठा दिलासा तर,उद्धव ठाकरेंना धक्का दिला आहे. आज दिवसभर पार पडलेल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या कामकाजावर स्थगिती आणण्यास नकार दिला. यामुळे पक्षचिन्हासंबंधी निर्णय घेण्याचा निवडणूक आयोगाचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे आत्तापर्यंत ‘धनुष्यबाण’ मिळवण्यासाठी शिंदे गट आणि ठाकरेंमध्ये सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली लढाई… Continue reading धनुष्यबाण कोणाचे? आता लढाई निवडणूक आयोगाच्या कोर्टात

संजय राऊत यांचा यंदाचा दसरा कोठडीतच

मुंबई (प्रतिनिधी)  गोरेगाव पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा दसराही आता आर्थर रोड कारागृहात होणार आहे. कारण न्यायालयाने संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर पुढील सुनावणी आता १० ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली आहे. संजय राऊत या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप ईडीने केला आहे. दरम्यान या सगळ्या प्रकारावर संजय राऊतांना आज कोर्टासमोर हजर… Continue reading संजय राऊत यांचा यंदाचा दसरा कोठडीतच

चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुडमधील विजयावर शिक्कामोर्तब

पुणे (प्रतिनिधी) : २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत आमदार व विद्यमान मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुडमधील विजयावर सर्वोच्च न्यायालयाकडूनही शिक्कामोर्तब करण्यात आले असून, सर्वोच्च न्यायालयाने ही ॲड. किशोर शिंदे यांची याचिका फेटाळून लावली आहे. २०१९ च्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी निर्विवाद विजय मिळवला होता. या निवडणुकीतील निकालाला ॲड. किशोर शिंदे… Continue reading चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुडमधील विजयावर शिक्कामोर्तब

नारायण राणे यांना सुप्रीम कोर्टाचा धक्का, याचिका फेटाळली

मुंबई (प्रतिनिधी) : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सुप्रीम कोर्टाने मोठा धक्का दिला आहे. नारायण राणे यांच्या अधिश बंगल्याच्या अवैध बांधकामावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. याआधी उच्च न्यायालयाने अवैध बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. याविरोधात नारायण राणे यांनी सुप्रिम कोर्टात याचिका केली होती, पण सुप्रीम कोर्टाने ही आव्हान याचिका फेटाळली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला… Continue reading नारायण राणे यांना सुप्रीम कोर्टाचा धक्का, याचिका फेटाळली

चित्रपट महामंडळाच्या माजी संचालकांना १०.७८ लाख भरण्याचे आदेश

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या माजी संचालकांना सहा आठवड्याच्या आत १० लाख ७८ हजार ५९३ रुपये भरण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी दिले आहेत. हा आदेश माजी संचालकांना लागू आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या इतिहासात प्रथमच सर्व माजी संचालकांवर अशी कारवाई झाली आहे. हा आदेश माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे, विजय पाटकर, विजय… Continue reading चित्रपट महामंडळाच्या माजी संचालकांना १०.७८ लाख भरण्याचे आदेश

मुंबई महापालिकेची चूक टर्निंग पॉईंट ठरली

मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांत एकापाठोपाठ एक राजकीय धक्के बसलेल्या शिवसेनेसाठी दसरा मेळावा घेण्यास  परवानगी देण्याचा निर्णय मोठा दिलासादायक ठरला. मुंबई महापालिकेने कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत शिवसेना आणि शिंदे गट या दोघांचे शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठीचे परवानगी अर्ज फेटाळून लावले होते. त्यामुळे शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळणार नाही, असा अंदाज व्यक्त केला जात होता, परंतु… Continue reading मुंबई महापालिकेची चूक टर्निंग पॉईंट ठरली

शिवाजी पार्कवर ठाकरेंचा आवाज घुमणार

मुंबई (प्रतिनिधी) : शिवाजी पार्कवर दसरा मेळावा उद्धव ठाकरे गटाचाच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबई हायकोर्टाने उद्धव ठाकरेंना दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे शिवाजी पार्कवर दसऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांचाच आवाज घुमणार आहे. मेळाव्यासाठी शिवसेनेकडून कायदा व्यवस्थेची हमी घेण्यात आली. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोणी घेणार यावरुन राजकारण चांगलंच तापले होते. ठाकरे… Continue reading शिवाजी पार्कवर ठाकरेंचा आवाज घुमणार