भुईबावडा घाटात दरड कोसळली

कोल्हापूर : सोमवारपासून सुरु झालेल्या दमदार पावसामुळे खारेपाटण-गगनबावडा रस्यावर भुईबावडा घाटात गगनबावड्याच्या अलीकडे पाच कि.मी.वर दरड कोसळली आहे. ही दरड हटवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी तेथे दाखल झाले आहेत. ही दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ थांबविण्यात आली आहे.

जिल्ह्यात ८ जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा, दोन बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर (प्रतिनिधी) : दीर्घ काळ प्रतीक्षेनंतर कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारपासून दमदार पावसास सुरुवात झाल्याने शेतकरी वर्गासह सर्व सामान्य जनतेतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. सोमवारी सकाळी ७ वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून एक हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. राधानगरी धरणात ६७.१८ दलघमी पाणीसाठा आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ८ जुलै पर्यंत हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला असून, सर्व… Continue reading जिल्ह्यात ८ जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा, दोन बंधारे पाण्याखाली

जून महिन्यात पावसाकडून निराशा, चिंतेचे ढग कायम

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यातील नागरिकांसाठी जून महिना चांगला ठरला नाही. या महिन्यातील पाऊस महाराष्ट्रासाठी फारसा समाधानकारक नव्हता. महिना अखेरपर्यंत राज्यात पावसाची ३१ टक्के तूट नोंदली गेली आहे. पहिल्या दीर्घकालीन पूर्वानुमानानुसार राज्यात कोकणाचा काही भाग आणि विदर्भाचा काही भाग वगळता उर्वरित राज्यात सरासरीहून अधिक पाऊस होणे अपेक्षित होते.  मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, लातूर आणि परभणी हे जिल्हे… Continue reading जून महिन्यात पावसाकडून निराशा, चिंतेचे ढग कायम

गडहिंग्लज पूर्व भागात ‘हिरण्यकेशी’चे पात्र कोरडे

नूल (प्रतिनिधी) : पावसाचा हंगाम लांबल्यामुळे गडहिंग्लज तालुक्याच्या पूर्व भागातील हिरण्यकेशी नदीचे पात्र कोरडे पडले आहे. थोडेफार शिल्लक असलेले पाणी शेतीसाठी उचलले जात आहे. पाऊस आणखी लांबला तर पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. चित्री प्रकल्पातील पाणी नदी पात्रात सोडले असून, दोन-तीन दिवसाने हे पाणी नांगनूर पर्यंत पोहोचेल, असे पाटबंधारे खात्यामार्फत सांगण्यात आले. जून महिना… Continue reading गडहिंग्लज पूर्व भागात ‘हिरण्यकेशी’चे पात्र कोरडे

मुंबई, कोकणसह राज्यभर पावसाचे आगमन

मुंबई : अखेर आज (शनिवारी) मान्सूनने राज्यभर हजेरी लावल्याने बळीराजासह उकड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. नैऋत्य मान्सून मुंबईसह कोकणातील बहुतांश भाग आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात पोहोचला आहे. आज मुंबईत मान्सूनला अधिकृत सुरुवात झाली. पावसाळा सुरू होताच मुंबईतील अनेक भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्येही मान्सून दाखल झाला आहे. शुक्रवारी तळकोकणात… Continue reading मुंबई, कोकणसह राज्यभर पावसाचे आगमन

कोकणात पाऊस दाखल

पुणे (प्रतिनिधी) : मान्सून कोकणात दाखल झाला असून, पुढील दोन दिवसात हा पाऊस संपूर्ण महाराष्ट्र राज्यात दाखल होईल, असे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. संध्याकाळच्या सुमारास पुणे शहर आणि जिल्ह्यातील काही भागात ढग दाटून आले आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली. यामुळे नागरिकांचा चांगलाच गोंधळ उडालेला पाहायला मिळाला. दिवसभर पुणे शहरात चांगलाच उकाडा जाणवत होता. सकाळी स्वच्छ… Continue reading कोकणात पाऊस दाखल

‘मान्सून’ कारवारमध्ये रेंगाळला…

कोल्हापूर (प्रतिनिधी): यंदाच्या वर्षी मान्सूनची एन्ट्री दमदार होणार असं हवामान खात्याने अंदाज वर्तवला होता, यामुळे उष्णतेने होरपळणाऱ्या जनतेला दिलासा मिळाला होता. मात्र सध्या नैॠती मोसमी वाऱ्यांचा अडथळा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रातील प्रवेश थोडासा लांबणीवर पडल्याचे चित्र दिसून येत आहे. मान्सून सध्या कर्नाटक मधील कारवारमध्ये गेल्या तीन दिवसापासून मान्सून रेंगाळला आहे, त्यामुळेच राज्यात अद्यापही उष्णतेचा पारा वाढलेलाच… Continue reading ‘मान्सून’ कारवारमध्ये रेंगाळला…

राज्यात पुढील दोन दिवस पाऊस, गारपिटीचा इशारा

नागपूर  (प्रतिनिधी) : राज्यात थंडीमुळे जनजीवन गारठले असताना पुढील  दोन दिवस राज्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारपिट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. २८ आणि २९ डिसेंबररोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी ढगांच्या गडगडाटसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अमरावती, वर्धा, नागपूर आणि भंडारा या चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट… Continue reading राज्यात पुढील दोन दिवस पाऊस, गारपिटीचा इशारा

गगनबावडा, करवीरमध्ये सर्वाधिक पाऊस : शेतकरी हवालदिल

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मागील तीन दिवसांपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात अवकाळी पावसाने लावलेल्या हजेरीमुळे नागरिकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडवली आहे. रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. तर, ऊस गाळप करताना साखर कारखान्यांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. ऊस तोडणी ठप्प झाली आहे. तर सर्वाधिक पावसाची नोंद गगनबावडा, करवीर तालुक्यात झाली आहे.   … Continue reading गगनबावडा, करवीरमध्ये सर्वाधिक पाऊस : शेतकरी हवालदिल

राज्यात पुढील २४ तासांत अतिवृष्टीची शक्यता

पुणे (प्रतिनिधी) : ‘गुलाब’ चक्रीवादळ शांत झाले असून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे राज्यात पुढील २४ तासांत मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार ते अतीमुसळधार आणि अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील ३-४ तासात धुळे, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक, अहमदनगर, पुणे आणि सातारा जिल्ह्यांत काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस… Continue reading राज्यात पुढील २४ तासांत अतिवृष्टीची शक्यता

error: Content is protected !!