कोल्हापुरात ‘कोसळधार’, पाणी पातळी ३२.०८ फुटावर

कोल्हापूर, (प्रतिनिधी) : शहरासह जिल्ह्यात सोमवारपासून जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. दमदार पावसामुळे  राधानगरी धरणात १२४.७२ दलघमी पाणीसाठा झाला आहे. आज सकाळच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून १३५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सोमवारी सकाळी ११ वा. च्या माहितीनुसार जिल्ह्यातील ४० बंधारे पाण्याखाली गेले आहे. दरम्यान, पाणी आलेल्या रस्त्यावर आणि पूरस्थिती निर्माण होणाऱ्या ग्रामीण भागात पथके तैनात करण्यात… Continue reading कोल्हापुरात ‘कोसळधार’, पाणी पातळी ३२.०८ फुटावर

जिल्ह्यात दमदार पाऊस; यंदाही महापुराची धास्ती

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात मंदावलेल्या पावसाने पुन्हा जोर धरला असून, धरण क्षेत्रातही पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. जिल्ह्यातील २८ बंधारे पाण्याखाली आहेत. जोरदार पावसामुळे यंदाही महापुराची स्थिती उद्भवण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शनिवारी दिवसभर पावसाची संततधार सुरु राहिल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. आज (शनिवार) सायंकाळी ६ वा. पंचगंगेची… Continue reading जिल्ह्यात दमदार पाऊस; यंदाही महापुराची धास्ती

अमरनाथ दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू, पुण्यातील दोघे अडकले

जम्मू-काश्मीर (वृत्तसंस्था) : अमरनाथ गुहेजवळ ढगफुटीसदृश पावसामुळे झालेल्या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू  झाला आहे, तर ५० हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे. याशिवाय काही लोक बेपत्ता असल्याचीही माहिती आहे. राष्ट्रीय आपत्ती निवार दल, राज्य आपत्ती  निवारण दलाचे जवान तसेच पोलीस आणि नागरी प्रशासनाचे अधिकारी-कर्मचारी आणि इंडो-तिबेटियन सीमा पोलिसांचे जवानही मदतकार्यात सहभागी झाले आहेत. ही… Continue reading अमरनाथ दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू, पुण्यातील दोघे अडकले

हिंगोली जिल्ह्यात ढगफुटी सदृश पाऊस

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील आसना नदीला पूर आल्यामुळे अनेक घरे पाण्याखाली गेलेली आहेत. ढगफुटी सदृश झालेल्या पावसाने संपूर्ण कुरुंदा गाव पाण्याखाली गेले आहे. दिल्ली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही बाब कळताच त्यांनी दिल्लीवरून हिंगोलीचे जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधून पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांच्या जेवणाची, राहाण्याची व्यवस्था करण्याचे, पाण्यात अडकलेल्या… Continue reading हिंगोली जिल्ह्यात ढगफुटी सदृश पाऊस

कोल्हापूर जिल्ह्यातील २७ बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात १०० दलघमी पाणीसाठा आहे. राधानगरी धरणातून १२०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळपासून शहर आणि ग्रामीण भागात दमदार पाऊस सुरू आहे. पंचगंगेची राजाराम बंधाऱ्यावरील दुपारी १२ वा. पाणी पातळी ३१.३ फूट आहे. जिल्ह्यातील २७ बंधारे पाण्याखाली आहेत. सखल भागात रस्त्यावर पाणी साचल्याने पादचाऱ्याना पाण्यातून व खड्ड्यातून जपूनच… Continue reading कोल्हापूर जिल्ह्यातील २७ बंधारे पाण्याखाली

पंचगंगा इशारा पातळीकडे..

कोल्हापूर, दि. 7 (प्रतिनिधी) : गेल्या दोन दिवासापासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील राधानगरी धरणात 92.28 दलघमी पाणीसाठा झाला असून धरणातून 1200 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.आज गुरुवार  दुपारी १२ वाजता राजाराम बंधारा पाणी पातळी ३२.४ असून जिल्ह्यातील २६ बंधारे पाण्याखाली आहेत. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- हळदी,… Continue reading पंचगंगा इशारा पातळीकडे..

गगनबावडा परिसरात २५९ मि. मी. पाऊस

साळवण (प्रतिनिधी) : पावसाने दमदार सुरुवात केली असून, गगनबावडा परिसरात २५९ मि. मी., तर धरण क्षेत्रात २८२ मि.मी. अशी पावसाची उच्चांकी नोंद झाली आहे. सांगशी, शेणवडे, मांडुकली बंधारे पाण्याखाली गेले आहेत. बळीराजानेही या पावसाची धास्ती घेतली आहे. सोमवारी करुळ घाटात ठिकठिकाणी दरडी कोसळल्या. भुईबावडा घाटातही दरडी कोसळल्याने चार तास वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. आता… Continue reading गगनबावडा परिसरात २५९ मि. मी. पाऊस

मुंबईसह उपनगरात धो धो; अनेक भाग जलमय

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईसह उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भाग जलमय झाला आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. या मुसळधार पावसाचा वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. शुक्रवारपर्यंत हा अलर्ट असणार आहे. मुंबईत पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.… Continue reading मुंबईसह उपनगरात धो धो; अनेक भाग जलमय

कोकणच्या २३ गावांतून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले

मुंबई (प्रतिनिधी) : कोकणात धुवॉंधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे कोकणामधील २३ गावांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. प्रशासनाने काय उपाययोजना केल्या आहेत, याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्विटद्वारे दिली आहे. राजापूर येथील अर्जुना नदीला पूर आला असून, आसपासच्या गावांतील लोकांना सतर्क राहण्याच्या व सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोकण आणि गोव्यात देखील पुढील… Continue reading कोकणच्या २३ गावांतून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले

पूर परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवा : मुख्यमंत्री

मुंबई (प्रतिनिधी) : हवामान खात्याने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा दिलेला इशारा लक्षात घेता तसेच सध्या पावसाचा जोर वाढल्याने पूर परिस्थिती निर्माण होऊन जीवित व मालमत्तेची हानी होऊ नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोकणातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असून, एनडीआरएफ जवानांना तसेच इतर पथकांना सज्ज राहण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर,… Continue reading पूर परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवा : मुख्यमंत्री

error: Content is protected !!