राज्यात थंडीचा तडाखा वाढला, काही जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी घट

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात परतीच्या पावसानंतर आता थंडीची चाहूल सुरू झाली आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये असलेल्या थंडीच्या लाटेमुळे महाराष्ट्रमध्येही हुडहुडी भरली आहे. पुणे, सातारा या भागांमध्ये तापमानात घट झाल्याचे पाहायला मिळते. मुंबई-नवी मुंबई या भागांतही रात्रीच्या तापमानात घट झाल्याचे दिसून आले. यामुळे एकीकडे पावसाचा अंदाज असताना दुसरीकडे राज्यात थंडीही वाढत आहे. रविवारी पुण्यामध्ये १२.७ अंश इतक्या… Continue reading राज्यात थंडीचा तडाखा वाढला, काही जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी घट

नाशिक, जळगावमध्ये कमी तापमानाची नोंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजस्थान, मध्य प्रदेश पट्ट्यात वाहणाऱ्या कोरड्या वाऱ्यामुळे राज्यातील किमान तापमानात घट नोंदवली जात आहे. मध्य महाराष्ट्रातील निवडक ठिकाणी थंडी जोर धरत असून, नाशिक आणि जळगावमध्ये हुडहुडी भरणारी थंडी होती. जळगावात किमान तापमान १२ तर नाशिक येथे किमान तापमान १२.६ अंश सेल्सिअसवर नोंदवले गेले. जळगाव येथील किमान तापमान मंगळवारी राज्यातील सर्वात कमी… Continue reading नाशिक, जळगावमध्ये कमी तापमानाची नोंद

नोव्हेंबरपासून महाराष्ट्रासह १० राज्यांमध्ये कडाक्याची थंडी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑक्‍टोबर महिना सरत असताना हवामानातही बदल होणार आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार देशातील १० राज्यांमध्ये थंडी पडणार आहे. पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा आणि तेलंगणा सोबतच ६ ते ७ नोव्हेंबर दरम्यान तापमानात झपाट्याने घट होईल. दिवसा आणि रात्रीच्या तापमानात ११ ते १७ अंशांचा फरक दिसून… Continue reading नोव्हेंबरपासून महाराष्ट्रासह १० राज्यांमध्ये कडाक्याची थंडी

महाराष्ट्रासह देशात भूकंपाचे धक्के

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :  महाराष्ट्रापासून जम्मू-काश्मीरपर्यंत देशात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्याचवेळी अफगाणिस्तानातील काबूलमध्ये पृथ्वी हादरली. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानुसार महाराष्ट्रात भूकंपाची तीव्रता ३.९ रिश्टर स्केल आणि काश्मीरमध्ये ३.४ इतकी होती. जम्मू-काश्मीरमध्ये आज (शुक्रवारी) पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. कटरापासून ६२ किमी अंतरावर ईशान्य-उत्तर भागात भूकंपाचे धक्के जाणवले. कोल्हापूरपासून पूर्वेला १७१ किमी अंतरावर रात्री २.२१ वाजता… Continue reading महाराष्ट्रासह देशात भूकंपाचे धक्के

राधानगरी धरणातून १६०० क्युसेक विसर्ग : नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणात २०३.५१ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून १६०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीवरील- इचलकरंजी, राजाराम, सुर्वे, रुई, तेरवाड व शिरोळ, दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, वेदगंगा नदीवरील- वाघापूर, निळपण, शेणगाव, म्हसवे, गारगोटी, कुरणी, बस्तवडे व चिखली, कुंभी नदीवरील- कळे, शेणवडे व मांडूकली, तुळशी नदीवरील- बीड,… Continue reading राधानगरी धरणातून १६०० क्युसेक विसर्ग : नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

पडसाळी, पोंबरे, नांदारी, बर्की लघु प्रकल्प ओव्हर फ्लो

पन्हाळा (प्रतिनिधी) : पडसाळी, पोंबरे, नांदारी, बर्की या लघुप्रकल्प क्षेत्रात पावसाची तुफान वृष्टी होत आहे. त्यामुळे हे लघु प्रकल्प ओव्हर फ्लो होऊन सांडव्यावरुन पाणी वाहत आहे. कासारी धरण क्षेत्रातदेखील पावसाचा जोर कायम असल्याने या धरणाची पाणीपातळी वाढली आहे. बाजार भोगाव, पुनाळसह पन्हाळा पश्चिम परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. मल्लिका अर्जुन, जांभळी, कासारी नदीचे पाणी पात्राबाहेर… Continue reading पडसाळी, पोंबरे, नांदारी, बर्की लघु प्रकल्प ओव्हर फ्लो

इचलकरंजीत पंचगंगेचा जुना पूल लवकरच पाण्याखाली

इचलकरंजी : येथील पंचगंगा नदीची पाणीपातळी अवघी एक फुटाने वाढल्यास जुना पुलावर पाणी येणार आहे. पाणीपातळी संथगतीने वाढत असून, हा पूल लवकरच पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. सध्या हा पूल वाहतुकीस पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. येथील पंचगंगा नदीची नदीच्या वरील बाजूस असलेल्या ओढे व नाल्यातून अजूनही पाणी वाहत नसल्याने नदीची पाणीपातळी संथगतीने वाढत आहे. मंगळवारी… Continue reading इचलकरंजीत पंचगंगेचा जुना पूल लवकरच पाण्याखाली

जिल्ह्यात एकूण ५३ बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर परिसरात दुपारनंतर पावसाचा जोर कमी-जास्त होता. थोडा वेळ उघडीप होती. पंचगंगेची वाटचाल इशारा पातळीकडे सुरु असून, मंगळवारी सायंकाळी ७ वा. राजाराम बंधाऱ्यावरील पंचगंगेची पाणीपातळी ३४ फूट ५ इंचावर पोहोचली आहे. जिल्ह्यात एकूण ५३ बंधारे पाण्याखाली आहेत. राधानगरी धरणात १३२.३५ दलघमी पाणीसाठा असून, या धरणातून १३५० क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हे… Continue reading जिल्ह्यात एकूण ५३ बंधारे पाण्याखाली

राज्यात पावसाचा धुमाकूळ, ‘अलमट्टी’तून  ७५ हजार क्युसेस विसर्ग

मुंबई (प्रतिनिधी) : पूर्ण राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी पूरस्थितीही उद्भवली आहे. मुंबईसह उपनगरांतही पावसाचा जोर वाढला आहे. शहरात सखल भागांत पाणी साचले आहे. एकीकडे सकाळपासूनच मुंबई आणि उपनगरात पावसाची संततधार सुरू असताना दुसरीकडे मुंबईच्या समुद्रालाही उधाण आल आहे. मुंबईच्या समुद्रात सध्या ४.४७ मीटर्सपर्यंत उंच लाटा उसळताना दिसत आहेत. गुजरातमध्ये गेल्या २४  तासांत… Continue reading राज्यात पावसाचा धुमाकूळ, ‘अलमट्टी’तून  ७५ हजार क्युसेस विसर्ग

जिल्ह्यातील ४५ बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहर आणि जिल्ह्यात मंगळवारी थोडी विश्रांती घेत पावसाची बॅटिंग सुरूच राहिली. काही काळ सूर्यदर्शनही झाले. राधानगरी धरणात १३०.२४ दलघमी पाणीसाठा आहे. मंगळवारी सकाळी ७ वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून १३५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सध्या जिल्ह्यातील ४५ बंधारे पाण्याखाली आहेत. सध्या पंचगंगा नदीची पाण्याची पातळी ३३.७ फुटावर आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम,… Continue reading जिल्ह्यातील ४५ बंधारे पाण्याखाली

error: Content is protected !!