यंदा साखर विक्रीचे अधिकार ‘स्वाभिमानी’ला; नामदार मुश्रीफांनी केलं जाहीर

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामातील साखर विक्रीचे संपूर्ण अधिकार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांना देत आहोत. सर्वच साखर कारखान्यांच्या साखर विक्रीच्या तपासणीसाठी त्यांनी कोणत्याही कारखान्यात यावे. सर्व साखर कारखाने त्यांना साखर विक्रीचे संपूर्ण रेकॉर्ड दाखवतील. त्यामुळे श्री. शेट्टी यांचा साखरविक्रीच्या दराबाबतचा संभ्रम आणि गैरसमज… Continue reading यंदा साखर विक्रीचे अधिकार ‘स्वाभिमानी’ला; नामदार मुश्रीफांनी केलं जाहीर

कळेतील डी.वाय.पाटील साखर कारखान्याच्या शेती विभागीय कार्यालयाला ठोकले टाळे… 

कळे (प्रतिनिधी)  : कळे (ता.पन्हाळा) येथील डी.वाय.पाटील सहकारी साखर कारखान्याच्या शेती विभागीय कार्यालयाला शरद जोशी शेतकरी संघटनेकडून टाळे लावण्यात आले. यावेळी मागील वर्षीचा प्रतिटन ५०० रुपयांचा दुसरा हप्ता देण्यात यावा, कारखान्याच्या गेटच्या बाहेर शेतकरी वजन काटा बसवण्यात यावा व येणाऱ्या शेतकऱ्यांच्या सर्व उसाचे वजन त्याच काट्यावरती करावे  व वजनकटा ऑनलाईन असावा, केंद्र सरकारने साखरेचा मूल्यांक… Continue reading कळेतील डी.वाय.पाटील साखर कारखान्याच्या शेती विभागीय कार्यालयाला ठोकले टाळे… 

पीकविमा योजना शेतकऱ्यांच्या नव्हे पंतप्रधानांच्या मित्रांसाठी फायद्याच्या- नाना पटोले

मुंबई ( वृत्तसंस्था ) राज्यातील शेतकरी बदलत्या हवामानाच्या तडाख्याने चांगलाच हैराण झाला आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना पिकविमा योजनेसाठी जाहिरात करत प्रोत्साहित केले आहे. यापार्श्वभूमीवर आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोचरा वार केला आहे. पटोले म्हणाले की, राज्यातील भाजपा सरकार शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीकविमा योजना सुरु केल्याचा ढोल बडवत आहे पण ते… Continue reading पीकविमा योजना शेतकऱ्यांच्या नव्हे पंतप्रधानांच्या मित्रांसाठी फायद्याच्या- नाना पटोले

धक्कादायक..! हत्तीच्या हल्ल्यात घाटकरवाडीचा वनकर्मचारी ठार

आजरा ( प्रतिनिधी ) आजरा तालुक्यातील घाटकरवाडी परिसरात गेल्या काही तासांपासून हत्ती धुमाकूळ घालत आहे. या पार्श्वभूमीवर हत्तीला हुसकावण्यासाठी आज वनविभाग आणि ग्रामस्थांनी मोहीम हाती घेतली होती. दरम्यान आज सकाळी हत्तीला हुसकवण्यासाठी वन विभागातील कर्मचारी प्रयत्न करत होते. यावेळी 11 च्या सुमारास हत्तीने अचानक हल्ला केल्याने एका वनकर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या महितीनुसार आजरा तालुक्यात… Continue reading धक्कादायक..! हत्तीच्या हल्ल्यात घाटकरवाडीचा वनकर्मचारी ठार

2025 पर्यंत भारतात पाण्याचे गंभीर संकट; संयुक्त राष्ट्राने दिला गंभीर इशारा

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) संयुक्त राष्ट्रांच्या एका नव्या अहवालानुसार, भारतात पाण्याचे संकट सतत गंभीर होत आहे. अनेक राज्यांनी भूजल कमी होण्याचा टप्पा ओलांडला आहे. यातच 2025 पर्यंत संपूर्ण वायव्य प्रदेशाला भूजलाच्या गंभीर संकटाचा सामना करावा लागू शकतो, असा अहवालाचा अंदाज आहे. अहवालात असे म्हटले आहे की सौदी अरेबिया आधीच भूजल संकटाचा सामना करत आहे… Continue reading 2025 पर्यंत भारतात पाण्याचे गंभीर संकट; संयुक्त राष्ट्राने दिला गंभीर इशारा

गोकुळचे सहकारी दुग्ध व्यवसायातील कामकाज कौतुकास्पद : तुकाराम मुंढे      

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाचे पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांची गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे आणि गोकुळ मुबई शाखेचे व्यवस्थापक दयानंद पाटील यांनी मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी मुंढे यांनी, महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये सहकार क्षेत्राचे मोठे योगदान आहे. सहकारी दुग्धव्यवसायामध्ये गोकुळचे नाव आदर्शवत असल्याचे म्हणाले. तुकाराम मुंढे म्हणाले की, गोकुळ हा दुग्ध… Continue reading गोकुळचे सहकारी दुग्ध व्यवसायातील कामकाज कौतुकास्पद : तुकाराम मुंढे      

वारंवार आंदोलनं करून पैसे मिळत नसतील तर संघर्ष अटळ- राजू शेट्टी

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गेल्यावर्षी तुटलेल्या ऊसाला दुसरा हप्ता 400 रूपये द्या या मागणीसाठी जिल्हाधिकारी राहूल रेखावर यांच्या अध्यक्षतेखाली साखर कारखानदार व शेतकरी संघटनांची बैठक निष्फळ झाली असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, आजच्या बैठकीकडे जिल्ह्यातील अनेक चेअरमनांनी पाठ फिरविल्याने साखर… Continue reading वारंवार आंदोलनं करून पैसे मिळत नसतील तर संघर्ष अटळ- राजू शेट्टी

ठरलं..! कोल्हापूरकरांचे दिवाळी अभ्यंगस्नान थेट पाईपलाईनच्या पाण्याने

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूरकरांना काळम्मावाडीतील शुद्ध पाणी मिळावे यासाठी अनेक लोकप्रतिनिधींनी प्रयत्न सुरु केले आहेत. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी आज सोमवारी दुपारी महानगरपालिकेत पत्रकार परिषद घेत याबाबत मोठं विधान केले आहे. या पत्रकार परिषदेत बोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या थेट पाईपलाईन योजनेचे… Continue reading ठरलं..! कोल्हापूरकरांचे दिवाळी अभ्यंगस्नान थेट पाईपलाईनच्या पाण्याने

पुण्यातील सिस्टीमा बायोकडून गोकुळ दूध संघाला ‘फ्लेम’ अॅवार्ड… 

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) एन.डी.डी.बी,(मृदा), सिस्टीमा बायो यांच्या संयुक्त विद्यमाने कार्बन क्रेडीट योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक महिलांसाठी गोकुळच्या माध्यमातून बायोगॅस योजना राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत ३ हजार बायोगॅस प्रकल्प पूर्ण झाले. यासाठी सिस्टीमा बायो, पुणे यांच्यावतीने गोकुळला ‘फ्लेम’अॅवार्ड देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी अरुण डोंगळे म्हणाले की,… Continue reading पुण्यातील सिस्टीमा बायोकडून गोकुळ दूध संघाला ‘फ्लेम’ अॅवार्ड… 

क्षारपड जमीन सुधारण्यासाठी ‘शाहू’ शेतकऱ्यांना पाठबळ देणार : समरजितसिंह घाटगे

कागल (प्रतिनिधी) : ऊस उत्पादनात वाढीच्या दृष्टीने क्षारपड जमीनीचा पोत सुधारण्यासाठी दत्त-शिरोळ पॅटर्न प्रमाणे येथील शाहू साखर कारखाना शेतकऱ्यांना पाठबळ देईल. असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले. कागल तालुक्यातील करनूर येथे शेतकऱ्यांनी क्षारपड जमीन सुधारण्यासाठी सामूहिकपणे राबवलेल्या भूमिगत सच्छिद्र पाईप निचरा चरीच्या उपक्रमाच्या पाहणीवेळी ते बोलत होते. येथील सहा शेतकऱ्यांनी एकत्र येऊन… Continue reading क्षारपड जमीन सुधारण्यासाठी ‘शाहू’ शेतकऱ्यांना पाठबळ देणार : समरजितसिंह घाटगे

error: Content is protected !!