नवरा-बायकोच भांडण सोडवायला गेला अन् जीव गमावून बसला…

पंढरपूर (प्रतिनिधी) : पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथील परमेश्वर गाडे आणि त्याच्या बायकोचं कडाक्याचे भांडण सुरू झाले होते. त्यामुळे त्यांच्या शेजारी राहात असलेले संतोष चौगुले हे भांडण सोडवायला गेले होते. यावेळी डोक्यावर परिणाम झालेल्या परमेश्वर गाडे याने संतोष चौगुले यांनाच मारायला सुरुवात केली. तसेच हातातील कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने वार करण्यास सुरुवात केली. यावेळी यांच्या डोक्यावर… Continue reading नवरा-बायकोच भांडण सोडवायला गेला अन् जीव गमावून बसला…

खून केलेल्या आरोपीचा पंढरपूर तालुका पोलिसांनी दोन तासात लावला छडा…

पंढरपूर (प्रतिनिधी) : मौज आंबे चिंचोली येथे दगडाने मारल्याचा राग मनात धरून एका व्यक्तीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची घटना मंगळवारी घडली होती. याचीमाहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी तपासचक्रे फिरवून अवघ्या दोन तासात आरोपीला अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गणपत बबन जाधव (रा. कार्ला, ता. मावळ,… Continue reading खून केलेल्या आरोपीचा पंढरपूर तालुका पोलिसांनी दोन तासात लावला छडा…

आ. समाधान आवताडे यांच्या माध्यमातून १० कोटींचा निधी मंजूर…

पंढरपूर (प्रतिनिधी) : नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण विशेष अनुदान योजनेअंतर्गत पंढरपूर व मंगळवेढा येथील नगरपरिषदांच्या विविध विकासकामांसाठी आमदार समाधान आवताडे यांच्या माध्यमातून १० कोटी निधी मंजूर झाला आहे. या निधीमध्ये पंढरपूर नगरपरिषद अंतर्गत विकास कामांसाठी ५ कोटी व मंगळवेढा नगरपरिषद अंतर्गत ५ कोटी निधी मंजूर झाला आहे. या नियोजित निधी मंजुरीसाठी आ. आवताडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,… Continue reading आ. समाधान आवताडे यांच्या माध्यमातून १० कोटींचा निधी मंजूर…

पत्रकारास धक्काबुक्की करणे भोवले; सोलापूर जिल्ह्यातील पहिला गुन्हा दाखल…

बार्शी (प्रतिनिधी) : जबाबदारी पार न पाडण्याबाबत वार्तांकन केल्याचा राग मनात धरून पत्रकारास धमकी देऊन धक्काबुक्की करत वार्तांकनास अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एकावर पत्रकार संरक्षण कायदयांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. किरण माने, प्रोजेक्ट मॅनेजर, स्वयम शिक्षण प्रयोग (रा. धाराशिव) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. 2017 साली अस्तित्वात आलेल्या पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत दाखल झालेला सोलापूर… Continue reading पत्रकारास धक्काबुक्की करणे भोवले; सोलापूर जिल्ह्यातील पहिला गुन्हा दाखल…

बचत गटांच्या जिल्हास्तरीय मॉलसाठी प्रयत्नशील -पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सोलापूर ( प्रतिनिधी ) उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत सोलापूरमधील रंगभवन जवळील वोरोनाका प्रशालेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मिनी सरस व जिल्हास्तरीय रुक्मिणी महोत्सव प्रदर्शन व विक्री केंद्राचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. उमेदच्या माध्यमातून बचत गटातील महिलांना विविध उद्योग व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे नमूद करून त्या बचत गटातील महिलांनी उत्पादित… Continue reading बचत गटांच्या जिल्हास्तरीय मॉलसाठी प्रयत्नशील -पालकमंत्री चंद्रकांत पाटील

‘सिकंदर’ ठरला सलग दुसऱ्या वर्षी ‘भीमा केसरी’चा मानकरी…

सोलापूर (प्रतिनिधी) : प्रेक्षकांनी गजबजलेल्या टाकळी सिकंदरच्या भीमा केसरी कुस्ती मैदानात, मोहोळच्या पै.सिकंदर शेख याने पंजाबच्या पै. प्रदिपसिंगला एकचाक डावावर आस्मान दाखवत, भीमा केसरीचा बहुमान व चांदीची गदा पटकावली. तसेच महेंद्र गायकवाडने देखील उत्तम खेळ दाखवत, पंजाबच्या पै. दिनेश वर विजय मिळविला. भीमा कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक यांनी भरविलेल्या या कुस्त्यांच्या मैदानात, सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील… Continue reading ‘सिकंदर’ ठरला सलग दुसऱ्या वर्षी ‘भीमा केसरी’चा मानकरी…

पंढरपूरातील विठ्ठल मंदिर प्रशासनातील भ्रष्टाचाराची चौकशी करा :युवासेनेची मागणी..

पंढरपूर (प्रतिनिधी) ; महाराष्ट्राचेच नव्हे तर संपुर्ण देशाचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरातील विठ्ठल मंदीर देवस्थानात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेने केली आहे. तसेच मंदीरातील विविध प्रकरणांची ही निष्पक्षपणे चौकशी करण्यात यावी आणि दोषींवर त्वरीत कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. युवासेना जिल्हाप्रमुख गणेश इंगळे यांनी, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील दान करण्यात… Continue reading पंढरपूरातील विठ्ठल मंदिर प्रशासनातील भ्रष्टाचाराची चौकशी करा :युवासेनेची मागणी..

पंढरपूरमध्ये पंडित प्रदीप मिश्रा यांचे शिवमहापुराण कथेचे आयोजन…

पंढरपूर (प्रतिनिधी) :  श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या माध्यमातून कायमच नवनवीन उपक्रम राबवत असतात. यावेळी पंढरपूरमध्ये पहिल्यांदाच शिवमहापुराण कथेचे अयोजन चंद्रभागा मैदान डीव्हीपी स्क्वेअर समोर २५ ते ३१ डिसेंबर पर्यंत सिहोरचे पंडित प्रदीप मिश्रा यांचे कथेचे आयोजन पाटील यांनी केले आहे. पंढरपूरमध्ये भाविकांच्या सोयीसाठी जवळपास चार एकरामध्ये मंडपाची सोय केलेली आहे.… Continue reading पंढरपूरमध्ये पंडित प्रदीप मिश्रा यांचे शिवमहापुराण कथेचे आयोजन…

श्री विठ्ठल कारखान्याचा ऊस गाळपात विक्रम : २६ दिवसात तब्बल दोन लाख टन गाळप

पंढरपूर (प्रतिनिधी) : पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने मागील ४५ वर्षातील ऊस गाळपाचे सर्व विक्रम मोडीत काढत अवघ्या २६ दिवसात २ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून कारखान्याच्या इतिहासामध्ये नवा विक्रम केला आहे. शिवाय २० वर्षांनंतर कारखाना पहिल्यांदाच पूर्णक्षमतेने चालवण्यात कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील व त्यांच्या संचालक मंडळांना यश आले आहे. मागील दोन… Continue reading श्री विठ्ठल कारखान्याचा ऊस गाळपात विक्रम : २६ दिवसात तब्बल दोन लाख टन गाळप

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली पंढरपूर आरोग्य शिबिराला भेट

पंढरपूर ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण विभागाच्या वतीने श्री क्षेत्र पंढरपूर येथे संपन्न होणाऱ्या कार्तिकी वारीमध्ये “आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी” हे ब्रीद वाक्य घेऊन तीन दिवसीय महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या शिबिराला भेट दिली. चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि,… Continue reading उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली पंढरपूर आरोग्य शिबिराला भेट

error: Content is protected !!