मोठी बातमी..! ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांचा हल्ला

पुणे ( प्रतिनिधी ) निर्भय बनो कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे हे महाराष्ट्रभर दौरे करत आहेत. नाशिकसह राज्यातील अनेक ठिकाणी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत निखील वागळे यांनी निर्भय बनो यात्रेचं आयोजन केले आहे. दरम्यान आज त्यांच्या कार्यक्रमाचे पुण्यातील साने गुरुजी हॉलमधे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांच्यावर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला असल्याची प्राथमिक माहिती समोर… Continue reading मोठी बातमी..! ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांचा हल्ला

कोल्हापूर विभागीय केंद्रामुळे चार जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयांना सुविधा मिळतील -मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) महाराष्ट्रातील एकमेव आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे. या विद्यापीठाच्या कोल्हापुरात होत असलेल्या विभागीय केंद्रामुळे कोल्हापूरसह सांगली, सिंधुदुर्ग व रत्नागिरी या चार जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयांना तत्पर सेवा- सुविधा मिळतील, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. पुढे बोलताना ना. मुश्रीफ म्हणाले डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा… Continue reading कोल्हापूर विभागीय केंद्रामुळे चार जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयांना सुविधा मिळतील -मंत्री हसन मुश्रीफ

नाशिकमध्ये शुभांगी पाटील यांना ठाकरे गटाचा पाठिंबा

नाशिक (वृत्तसंस्था) : नाशिक पदवीधरच्या जागेसाठी काँग्रेसचे डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्यात आली होती; पण डॉ. सुधीर तांबे यांनी ऐनवेळी माघार घेत काँग्रेसला धक्का दिला. त्या ठिकाणी त्यांचे चिंरजीव सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी केली. आपण काँग्रेसमध्येच असून, सर्व पक्षांना पाठिंबा मागणार असल्याचे सत्यजित तांबे यांनी जाहीर केले. आता काँग्रेसने सत्यजित तांबेंना पाठिंबा देण्यास… Continue reading नाशिकमध्ये शुभांगी पाटील यांना ठाकरे गटाचा पाठिंबा

सिन्नर-शिर्डी महामार्गावर भीषण अपघातात १० ठार

नाशिक (वृत्तसंस्था) : सिन्नर-शिर्डी महामार्गावर पाथरे शिवारातील ईशानेश्वर मंदिराच्या कमानीजवळ सकाळच्या सुमारास खासगी बस आणि ट्रक यांची टक्कर झाली. अपघात झाला त्यावेळी बसमध्ये ५० जण होते. बसमधील प्रवाशांपैकी १० जणांचा मृत्यू झाला. सिन्नर-शिर्डी महामार्गावर पाथेर गावच्या जवळ खासगी आराम बस आणि ट्रकची समोरासमोर टक्कर झाली. अपघातात दोन्ही वाहनांचा चुराडा झाला. जखमींना सिन्नर आणि नाशिकमधील हॉस्पिटलमध्ये… Continue reading सिन्नर-शिर्डी महामार्गावर भीषण अपघातात १० ठार

नाशिक पदवीधरची निवडणूक बिनविरोध होणार ?

नाशिक : विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नाशिकमध्ये नाट्यमय घडामोडी घडत आहेत. डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसने उमेदवारी दिलेली असताना ऐनवेळी त्यांचे सुपुत्र सत्यजित तांबे यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यातच ही निवडणूक बिनविरोध होण्याकरिता प्रयत्न सुरू असतानाच भाजापाने मोठा दावा केला आहे. सत्यजित तांबे यांनी पाठिंबा मागितल्यास आम्ही देऊ, अशी भूमिका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत… Continue reading नाशिक पदवीधरची निवडणूक बिनविरोध होणार ?

महामोर्चा शिवसेनेचा; नावाला फक्त काँग्रेस-राष्ट्रवादीचा सहभाग : आंबेडकर

नाशिक (प्रतिनिधी) : शनिवारी काढलेला महामोर्चा हा महाविकास आघाडीचा होता; मात्र महाविकास आघाडीमध्ये आम्हाला घ्यायला मतभेद आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा आम्हाला महाविकास आघाडीत घेण्यास विरोध आहे, असे वक्तव्य करत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ‘मविआ’च्या महामोर्चात सामील न होण्याचे कारण सांगितले. ‘काँग्रेस आणि राष्ट्रवादीला गरिबाला सत्तेत येऊच द्यायचे नाही. हा मोर्चा शिवसेनेचा आहे,… Continue reading महामोर्चा शिवसेनेचा; नावाला फक्त काँग्रेस-राष्ट्रवादीचा सहभाग : आंबेडकर

माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन

नाशिक (वृत्तसंस्था) : माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित (वय ८८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. नाशिकमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना आज (शनिवार) सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. माणिकराव गावित यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा भरत गावित यांनी ट्वीट करत ही माहिती दिली. माणिकराव गावित यांची अचानक प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना नाशिकमधील खासगी रुग्णाल्यात उपचारासाठी दाखल… Continue reading माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन

नाशिकमध्ये कोट्यवधींचे घबाड जप्त; अभियंत्यास अटक

नाशिक : आदिवासी विभागाचा कार्यकारी अभियंता दिनेश कुमार बागुलच्या घरांची झाडाझडती सुरू आहे. मुंबई, पुणे, नाशिक आणि धुळ्यातील बागुल यांच्या घरांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापे टाकले आहेत. बागुलच्या दोन घरांमध्ये कोट्यवधी रुपयांची रोकड सापडली आहे. त्याच्या इतर घरांमधील आणि लॉकरमधील रोख रकमेची मोजदाद अद्याप बाकी आहे. आदिवासी विभागात कार्यकारी अभियंता म्हणून काम करणाऱ्या दिनेश बागलशी… Continue reading नाशिकमध्ये कोट्यवधींचे घबाड जप्त; अभियंत्यास अटक

error: Content is protected !!