कु़डाळ येथे 21 एप्रिलरोजी एक दिवसीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन…

कुडाळ (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डॉक्टर्सचे ज्ञान अद्ययावत व्हावे यासाठी डीएफसी सिंधुदुर्ग, वर्किंग कमिटी कुडाळ यांच्यावतीने एक दिवसाची वैद्यकीय परिषद आणि कार्यशाळा सिंधुरेस्पिकॉन २१ एप्रिलरोजी आयोजित करण्यात आली आहे. याकरिता मुंबई, पुणे, सांगली, कोल्हापूर, गोवा येथील नामवंत फुफ्फुसविकार तज्ज्ञ तसेच संशोधक मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. आराध्या अडोरर, झाराप झिरो पॉइंट याठिकाणी ही परिषद संपन्न… Continue reading कु़डाळ येथे 21 एप्रिलरोजी एक दिवसीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन…

रत्नागिरी लोकसभेसाठी आज एक नामनिर्देशन पत्र दाखल : एम. देवेंदरसिंह

रत्नागिरी (प्रतिनिधी) : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या पहिल्या दिवशी शकील अब्दुल करीम सावंत यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले. अशी माहिती रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दि

भाजपला लोकसभेला उमेदवार मिळत नाही हे दुर्दैव : जयेंद्र परुळेकर

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जो पक्ष संपुर्ण जगात मोठा असल्याचा दावा करतो. त्या पक्षाला सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदार संघासाठी उमेदवार मिळत नाही हे दुर्दैव आहे, असा आरोप आज (मंगळवार) आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केला. ज्या नारायण राण्यांचे नाव चर्चेत आहे, त्यांनी केंद्रीय मंत्री असून सुद्धा कोकणासाठी काही केले नाही. त्यामुळे या ठिकाणी विनायक राऊत… Continue reading भाजपला लोकसभेला उमेदवार मिळत नाही हे दुर्दैव : जयेंद्र परुळेकर

‘सुपर 30’च्या ‘CVRaman_बॅचला ‘ब्रीज कोर्स’ ची धूमधडाक्यात सुरुवात…

कुडाळ (प्रतिनिधी) : अवघ्या सर्व ज्युनिअर कॉलेजना उत्सुकता लागून राहिलेल्या ‘सुपर 30’च्या ‘CVRaman_बॅच’ला ‘ब्रीज कोर्स’ ने धूमधडाक्यात सुरुवात झाली आहे. मुख्य हायब्रीड प्रोग्राम सुरू होण्यापूर्वीच इ. 10 वीच्या विद्यार्थी तसेच पालकांमध्ये या बॅचबाबत चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. ‘लाईव्ह मराठी’ या बॅचचा मीडिया पार्टनर आहे. ‘सुपर 30’ ची ‘CVRaman_बॅच’ 1 एप्रिल पासून सुरू झाली आहे.… Continue reading ‘सुपर 30’च्या ‘CVRaman_बॅचला ‘ब्रीज कोर्स’ ची धूमधडाक्यात सुरुवात…

अवैध दारू वाहतूक केल्याप्रकरणी मुंबईतील दोघे ताब्यात : १० लाखांचा मुद्देमाल जप्त

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : अवैधरित्या गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्कच्या माध्यमातून बांदा-ओटवणे रोड परिसरात मुंबईतील दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. धोंडीराम लिंबाजी गायकवाड (वय ४२, रा. ठाणे, मुंबई) आणि विशाल मारुती पठारे (वय ४३, रा‌. गोरेगाव, मुंबई) अशी त्यांची नावे असून त्यांच्याकडून बोलेरो टेम्पोसह १० लाख ८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.… Continue reading अवैध दारू वाहतूक केल्याप्रकरणी मुंबईतील दोघे ताब्यात : १० लाखांचा मुद्देमाल जप्त

सिंधू केअर हॉस्पिटलचे उद्या शानदार उद्घाटन…

कुडाळ (प्रतिनिधी) : डॉ. शामसुंदर परूळेकर ह्यांचा वैद्यकीय वारसा पुढे चालवत त्यांचे सुपुत्र डॉ. मकरंद परूळेकर आणि डॉ. गौरी परुळेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सेवेत सिंधू केअर हॉस्पिटल या भव्य वास्तूच्या रूपाने एक नविन भर टाकली आहे. याचे उद्घाटन उद्या (शनिवार) रोजी होणार आहे. डॉ. मकरंद आणि डॉ. गौरी परुळेकर हे गेली 20 वर्षाहून अधिक सिंधुदुर्ग जिल्ह्यात… Continue reading सिंधू केअर हॉस्पिटलचे उद्या शानदार उद्घाटन…

ही तर नारायण राणेंची राजकीय अधोगती : आ. वैभव नाईक

कुडाळ (प्रतिनिधी) : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून केंद्रीय मंत्री असूनही नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाली नाही. ही तर नारायण राणेंची राजकीय अधोगती असल्याची टीका आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ येथे युवा महाराष्ट्रभिमान मेळाव्यात केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा क्षेत्राचा युवा महाराष्ट्रभिमान मेळावा कुडाळ येथे खासदार विनायक राऊत, शिवसेना सचिव वरुण… Continue reading ही तर नारायण राणेंची राजकीय अधोगती : आ. वैभव नाईक

डिजिटल माध्यमांनी माहिती प्रसारणाची गती-देवाणघेवाण प्रक्रियाही वाढवली : मनोज पाटील

पुणे (प्रतिनिधी) : सुरुवातीच्या काळामध्ये माहितीचे प्रसारण करण्यासाठी किमान २४ तासाचा कालावधी लागत होता. परंतु, नव्याने उदयास आलेले डिजिटल मीडिया हे प्रभावी माध्यम असून यातून वेळ आणि ठिकाणाच्या मर्यादा सीमा ओलाडणारे अन् अपडेटेड बातम्या देण्यापर्यंत डिजिटल मीडिया माध्यमांनी मजल मारली आहे. असे मत पुण्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी डिजिटल मीडिया… Continue reading डिजिटल माध्यमांनी माहिती प्रसारणाची गती-देवाणघेवाण प्रक्रियाही वाढवली : मनोज पाटील

कुडाळ नगरसेवकांचा काश्मीर दौरा वादात…

कुडाळ (प्रतिनिधी) : प्रशिक्षण निश्चित नसताना कुडाळ नगरपंचायतीचे नगरसेवक काश्मीर येथे जाऊन आले. या झालेल्या खर्चाला जबाबदार कोण ? असा सवाल आता जनतेतून विचारला जात आहे. जनतेच्या पैशावर नगरसेवकांनी फक्त मजा केली असल्याचा आरोप केला जात आहे. कुडाळ नगरपंचायतीच्या नगरसेवकांसाठी काश्मीर येथे सभा शास्त्र तसेच नगरपंचायतीच्या कायद्यांसंदर्भात प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी कुडाळ नगर… Continue reading कुडाळ नगरसेवकांचा काश्मीर दौरा वादात…

गुणवत्तापूर्वक शिक्षण देण्याचा या जिल्ह्यात चांगला प्रयत्न करू : डॉ. गणपती कमळकर

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : प्रत्येक विद्यार्थी ही राष्ट्राची संपत्ती आहे. जिल्ह्यातील वाढत्या पटाच्या शाळा तसेच कमी पटाच्या शाळांचा अभ्यास करुन गुणवत्तापूर्वक शिक्षण देण्याचा या जिल्ह्यात चांगला प्रयत्न करू. अशी प्रतिक्रिया सिंधुदुर्गचे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. गणपती कमळकर यांनी दिली. ते आज (बुधवार) प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारताना बोलत होते. कळमळकर म्हणाले की, आपण प्राथमिक शिक्षक होतो. एमपीएससी… Continue reading गुणवत्तापूर्वक शिक्षण देण्याचा या जिल्ह्यात चांगला प्रयत्न करू : डॉ. गणपती कमळकर

error: Content is protected !!