हेरवाडमध्ये दोन वाहनांचा भीषण अपघात ; 7 जण गंभीर जखमी

कुरुंदवाड प्रतिनिधी :- हेरवाड – पाचवा मैल मार्गालगत असणाऱ्या हॉटेल पनुजा जवळ दोन वाहनांच्या समोरासमोर झालेल्या धडकेत सात प्रवासी गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज बुधवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला असून, हा अपघात इतका भिषण होता की दोन वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. जखमींना तातडीने मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल… Continue reading हेरवाडमध्ये दोन वाहनांचा भीषण अपघात ; 7 जण गंभीर जखमी

सावर्डेत ट्रॅक्टर ट्रॉलीसह 10 फूट खाली तरीही..!

पन्हाळा (प्रतिनिधी ) – पन्हाळ्यातील सावर्डे तर्फे असंडोली येथील दलित वस्तीच्या मुख्य वहिवाटी रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाली असून , येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना येथील रस्त्यामुळे अनेक अडी – अडचणीना सामोरे जावे लागत आहे. काल रात्री या रस्त्यावरून एका शेतकऱ्याचा ट्रॅक्टर ट्रॉलीसह 10 फूट खाली गेला. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.   दलित वस्तीच्या मुख्य… Continue reading सावर्डेत ट्रॅक्टर ट्रॉलीसह 10 फूट खाली तरीही..!

नाना पटोलेंचा भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत गाडीचा चक्काचूर

भंडारा – भंडाऱ्यामध्ये मोठी घटना घडली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. प्रचार करून परतत असताना ट्रकने मागून धडक दिली. या अपघातामध्ये नाना पटोले हे थोडक्यात बचावले आहेत. भंडारा शहरालगतच्या भीलवाडा गावाजवळ ही घटना घडली आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास प्रचार आटपून सुकळी या गावी जात असताना मागून येणाऱ्या ट्रकने त्याच्या… Continue reading नाना पटोलेंचा भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत गाडीचा चक्काचूर

उंड्री येथील अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू…

पन्हाळा (प्रतिनिधी) : कोतोली-नांदगाव रस्त्यावर उंड्री गावाजवळ मोटरसायकल घसरून सागर महादेव पाटील या तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना काल (मंगळवार) सायंकाळच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार, शाहूवाडी तालुक्यातील नांदगाव येथील सागर महादेव पाटील-कोगे हा आपली मोटरसायकल घेऊन कोतोलीकडे जात होता. पन्हाळा तालुक्यातील उंड्री गावाजवळ नवीन केलेल्या सिमेंटच्या रस्त्यावर त्याची मोटरसायकल अचानक… Continue reading उंड्री येथील अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू…

वाठार फ्लायओव्हर जवळ भीषण अपघात

पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाठार येथे उड्डाणपुला जवळ भरधाव आलेल्या ट्रकने धडक दिल्याने चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर सात जण जखमी आहेत यातील दोघेजण गंभीर जखमी आहेत सर्व जखमींना सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत हातकणंगले तालुक्यातील भादुले इथल्या सेंट्रींग कामगारांना घेऊन जाणारा एक टेम्पो रस्त्याशेजारी थांबला होता तर सेंट्रींग… Continue reading वाठार फ्लायओव्हर जवळ भीषण अपघात

बोरपाडळे येथे धोकादायक वळणावर ट्रकला अपघात…

बोरपाडळे (प्रतिनिधी) : बोरपाडळे येथील कमानीजवळ असणाऱ्या धोकादायक वळणावर ट्रकला काल (रविवार) रात्री उशिरा झालेल्या अपघातात ट्रकचा चक्काचूर झाला. यामध्ये सुदैवाने जिवीतहानी झाली नाही. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, (केए 32 डी 7277) हा ट्रक जयगडहून गुलबर्गा-कर्नाटककडे कोळसा भरून निघाला होता. त्यावेळी समोरून येणाऱ्या गॅस टँकराला वाचवताना ताबा सुटल्याने हा ट्रक पलटी झाला. यामध्ये चालक महेश कोळी… Continue reading बोरपाडळे येथे धोकादायक वळणावर ट्रकला अपघात…

रेल्वे चालक मोबाईलमध्ये क्रिकेट पाहण्यात मग्न; भीषण अपघातात 14 जण दगावले

विजयनगर ( वृत्तसंस्था ) 29 ऑक्टोबर 2023 रोजी जेव्हा आंध्र प्रदेशमध्ये दोन पॅसेंजर ट्रेनची टक्कर झाली. या अपघातात तब्बल 14 जणांनी आपला जीव गमावावा लागला आहे. याबाबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोठा खुलासा केला आहे. त्यानुसार ट्रेनचे लोको पायलट आणि असिस्टंट लोको पायलट मोबाईल फोनवर क्रिकेट मॅच पाहत असल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती… Continue reading रेल्वे चालक मोबाईलमध्ये क्रिकेट पाहण्यात मग्न; भीषण अपघातात 14 जण दगावले

कबनूरमध्ये बर्निंग कारचा थरार..! प्रसंगावधानामुळेमोठा अनर्थ टळला..!

टोप ( प्रतिनिधी ) धावती कार अचानक बंद पडल्याने, रस्त्याकडेला पार्क केली असता पार्क कारला अचानक आग लागली. या आगीने क्षणार्धात रौद्ररुप धारण करुन कारला पूर्ण आग लागली यात संपूर्ण कार जळून खाक झाली. ही कार टोप ( ता.हातकणंगले ) येथील हर्षद अरुण वाघमारे यांच्या मालकीची असून, ही घटना कबनूर ( ता. हातकणंगले ) नजीकच्या… Continue reading कबनूरमध्ये बर्निंग कारचा थरार..! प्रसंगावधानामुळेमोठा अनर्थ टळला..!

पंचगंगा पुलाजवळ अपघात : एकाचा जागीच मृत्यू

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पुणे-बेंगलोर महामार्गावर पंचगंगा नदीच्या पुलाजवळ ऊसाने भरलेल्या क्र. (केए 23 टीडी 8891) या ट्रॅक्टरला पाठीमागून दिल्याने संदीप राजाराम शिंदे (वय 41, सध्या रा. शिरोली मुळगाव चिकुर्डे, ता. वाळवा, जि.सांगली) हा जागीच ठार झाला. संदीप शिंदे हा आपली अक्टिव्हा क्र. (एमएच 09 ईडी 0841) हा भरधाव वेगात जात होता. यावेळी त्याच्या समोर असणाऱ्या… Continue reading पंचगंगा पुलाजवळ अपघात : एकाचा जागीच मृत्यू

तोल गेला अन् घात झाला; ऊस ट्रॉली खाली चिरडल्याने शिरढोण येथे महिला ठार

कुरुंदवाड ( प्रतिनिधी ) शिरढोण (ता. शिरोळ) येथे ऊसाच्या ट्रॉलीच्या चाकाखाली सापडून महिलेचा जागीच मृत्यू झाला. शालन प्रकाश कलाल (वय 50 रा. आसरानगर, इंचलकरंजी) असे मृत महीलेचे नाव आहे. शिरढोण येथील दर्गा चौकातील वळणावर हॉटेल मुन्नराजूच्या समोर सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. अपघातानंतर ट्रॅक्टचालक फरार झाला आहे. घटनास्थळांवरुन मिळालेल्या माहितीनुसार शिरढोण येथून ऊसाने भरलेला… Continue reading तोल गेला अन् घात झाला; ऊस ट्रॉली खाली चिरडल्याने शिरढोण येथे महिला ठार

error: Content is protected !!