उदयनराजे फुंकणार ‘तुतारी’?

व्हिडीओ व्हायरल, राजकीय वर्तुळात चर्चा कोल्हापूर/प्रतिनिधी : भाजपने लोकसभेसाठीची दुसरी यादी नुकतीच जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील २० नेत्यांचा नावाचा समवेश आहे. यात भाजपने माढा लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. पण सातारा लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर न केल्याने उदयनराजे भोसलेंच्या समर्थकांमध्ये नाराजीचा सूर आहे. यातच उदयनराजे यांच्या समर्थकांकडून एक व्हिडीओ व्हायरल केल्याने राजकीय पटलावर अनेक तर्कवितर्क लावले… Continue reading उदयनराजे फुंकणार ‘तुतारी’?

पत्रकारास धक्काबुक्की करणे भोवले; सोलापूर जिल्ह्यातील पहिला गुन्हा दाखल…

बार्शी (प्रतिनिधी) : जबाबदारी पार न पाडण्याबाबत वार्तांकन केल्याचा राग मनात धरून पत्रकारास धमकी देऊन धक्काबुक्की करत वार्तांकनास अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एकावर पत्रकार संरक्षण कायदयांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. किरण माने, प्रोजेक्ट मॅनेजर, स्वयम शिक्षण प्रयोग (रा. धाराशिव) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. 2017 साली अस्तित्वात आलेल्या पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत दाखल झालेला सोलापूर… Continue reading पत्रकारास धक्काबुक्की करणे भोवले; सोलापूर जिल्ह्यातील पहिला गुन्हा दाखल…

अखेर मनोज जरांगे-पाटील यांची कुणबी नोंद सापडली…

पुणे (प्रतिनिधी) : मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांची कुणबी नोंद सापडल आहे. शिरूरच्या तहसील कार्यालयामध्ये मोडी लिपीमध्ये ही नोंद आढळून आली आहे. यामुळे मनोज जरांगे पाटील यांना कुणबी दाखला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मोडी लिपी संशोधन करणारे पथक शिरूर दौऱ्यावर आले होते. त्यादरम्यान त्यांना मनोज जरांगे पाटील यांचे वडील कुणबी… Continue reading अखेर मनोज जरांगे-पाटील यांची कुणबी नोंद सापडली…

सगळ्याच पक्षांमध्ये वाचाळवीर वाढलेत : अजित पवार

कराड : सगळ्याच पक्षांमध्ये वाचाळवीर वाढले आहेत. लोकशाहीत प्रत्येकाला स्वतःचे मत मांडण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. त्या अधिकाराचा वापर आपण कशा प्रकारे करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु, रोज आपण बघतो कोणीतरी काहीतरी वक्तव्य करतो. कोणी अरे म्हटले की, का रे म्हणायचे असे सगळे चालू आहे. ही यशवंतराव चव्हाणांची शिकवण नाही, ही महाराष्ट्राची संस्कृती… Continue reading सगळ्याच पक्षांमध्ये वाचाळवीर वाढलेत : अजित पवार

महाबळेश्वरमध्ये हिमकण, पारा घसरला

महाबळेश्वर (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे नंदनवन असलेल्या पर्यटनस्थळ महाबळेश्वरमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. येथील नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेल्या वेण्णालेक, लिंगमळा परिसरात दवबिंदूचे हिमकणात रूपांतर झाल्याचे दृश्य आता पाहावयास मिळाले. पहाटे वेण्णालेकसह लिंगमळा परिसरात तापमानाचा पारा ३ ते ४ अंशापर्यंत खाली गेला आहे. वेण्णालेक परिसरामध्ये आज पहाटे वाहनांवर, पानांवर, वेण्णालेक नौकाविहारासाठी ये-जा करण्यासाठी असलेल्या लोखंडी बोटीवर काही प्रमाणात… Continue reading महाबळेश्वरमध्ये हिमकण, पारा घसरला

फलटणनजीक अपघातात आ. जयकुमार गोरे जखमी

सातारा (प्रतिनिधी) : माण-खटाव मतदारसंघाचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला आज पहाटे भीषण अपघात झाला. गोरे यांच्यासह चार जण त्या गाडीतून प्रवास करत होते. या अपघातात गोरे यांच्यासह त्याचे सहकारी किरकोळ जखमी झाले आहेत, तर त्यांच्या चालक आणि अंगरक्षकाला गंभीर दुखापत झाली आहे. आज पहाटे तीन वाजता सातारा जिल्ह्यातील फलटण येथील मलठण येथे हा… Continue reading फलटणनजीक अपघातात आ. जयकुमार गोरे जखमी

कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज

मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या ४८ तासांत कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे. बहुतांश भागात ढगाळ हवामानामुळे ऐन हिवाळ्यात उकाडा, इन्फ्लुएन्झाचा धोका वाढला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात दोन दिवसांपासून थंडी जाणवत असली तरी दुपारी उकाडा होताना दिसत आहे. वातावरणात होणाऱ्या झपाट्याच्या बदलांमुळे जनजीवनावर प्रचंड परिणाम दिसून येत आहे. दरम्यान, बदलत्या हवामानामुळे रबी पीकही धोक्यात आले आहे. बंगालच्या… Continue reading कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज

महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना देशद्रोहासारखी कठोर शिक्षा व्हावी : उदयनराजे

सातारा/मुंबई (प्रतिनिधी) : छत्रपती शिवरायांचा अवमान पाहण्यापेक्षा मेलो असतो, तर बरं झाले असते, अशी भावना माझ्या मनात आली. त्यामुळे मी भावुक झालो होतो, असे उदयनराजे भोसले यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना देशद्रोहासारखी कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत खासदार उदयनराजे भावूक झाले होते. त्यावेळी उदयनराजे… Continue reading महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना देशद्रोहासारखी कठोर शिक्षा व्हावी : उदयनराजे

प्रतापगडावर उभारले जाणार शिवप्रताप स्मारक  

सातारा (प्रतिनिधी) : शिवप्रताप दिनी प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझल खानाच्या कबरीजवळील अतिक्रमण हटवण्यात आले. यामुळे राज्य सरकारच्या या कारवाईचे कौतुक होत आहे. आता सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. प्रतापगडावर अफझलखान वधाचा पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी शिवप्रेमी तसेच दुर्गप्रेमी संघटनांकडून करण्यात येत होती. साताऱ्याच्या हिंदू एकता आंदोलन संघटनेकडूनही याबाबतचे पत्र पर्यटन मंत्र्यांना देण्यात… Continue reading प्रतापगडावर उभारले जाणार शिवप्रताप स्मारक  

प्रतापगडाच्या पायथ्याशी आणखी तीन कबरी

सातारा (प्रतिनिधी) : साताऱ्या जिल्ह्यातील प्रतापगडाच्या पायथ्याला असलेल्या  अफजल खानच्या कबरीजवळ  आणखी तीन कबरी आढळून आल्या आहेत. या कबरी कुणाच्या हा सध्या मोठा चर्चेचा विषय बनला आहे. आणखी तीन कबरी असल्याच्या वृत्ताला साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दुजोरा दिला आहे. या कबरी नेमक्या कोणाच्या याबाबत सध्या माहिती घेण्याचे काम महसूल विभागाकडून केले जात आहे. दरम्यान,… Continue reading प्रतापगडाच्या पायथ्याशी आणखी तीन कबरी

error: Content is protected !!