LiveMarathi

फोंडा घाटात दरड कोसळली; केवळ हलकी***

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंडाघाट येथे दरड कोसळली असून सदर घाटातील रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. याबाबतची माहिती नुकतीच कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालयाकडून देण्यात आली असून, मार्गावरील वाहतूक सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंडाघाट येथे दरड कोसळण्य़ाची घटना आज सकाळी घडली आहे. त्यामुळे फोंडा घाट वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे.… Continue reading फोंडा घाटात दरड कोसळली; केवळ हलकी***

नवाब मलिक यांना जामीन देण्यामागे राजकारण : पृथ्वीराज चव्हाण 

कराड : माजी मंत्री नवाब मलिक यांना जामीन देण्यामागे राजकारण असावे. मलिकांवर दबाव आणून राजकीय भूमिका घ्यायला भाग पाडले असावे. कारण त्यांच्या जामिनाला ईडी, सीबीआय, एनआयई व अन्य कोणत्याही तपास यंत्रणेने विरोध केलेला नाही. त्यांनी विरोध न करणे हे बरेच काही सूचक आहे, असा संशय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले, नवाब मलिक यांना चुकीच्या पध्दतीने… Continue reading नवाब मलिक यांना जामीन देण्यामागे राजकारण : पृथ्वीराज चव्हाण 

निवृत्त पोलीस उपअधीक्षक पंढरीनाथ मांढरे यांचे निधन

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) राष्ट्रपती पदक विजेते माजी पोलीस उपाधीक्षक तसेच निवृत्त पोलीस कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ मांढरे यांचे आज सकाळी तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने अकस्मित निधन झाले आहे. आज सकाळच्या सुमारास त्यांना त्रास जाणवू लागल्यावर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्य़ू झाला. त्यांनी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कोल्हापूर, पुणे इत्यादी ठीकाणी सेवा… Continue reading निवृत्त पोलीस उपअधीक्षक पंढरीनाथ मांढरे यांचे निधन

Satara : डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना जिल्हाध्यक्षपदी गणेश बोतालजी

सातारा ( प्रतिनिधी ) डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी कोरेगाव येथील संपादक पत्रकार गणेश बोतालजी यांची आज बिनविरोध झाल्याची घोषणा डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी केली. राज्यातील 5 हजारहून अधिक युट्युब चॅनेल व वेब पोर्टलचे संपादक पत्रकार सभासद असलेल्या देशातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार संघटनेने डिजिटल मीडियातील… Continue reading Satara : डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना जिल्हाध्यक्षपदी गणेश बोतालजी

पाटण तालुक्यात कुटुंबातील चौघांच्या मृत्यूबाबत तर्त-वितर्क

कराड : पाटण तालुक्यातील सणबूर येथे गुरुवारी रात्र एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. एकाच कुटुंबातील व्यक्तींनी आत्महत्या केली की, त्यांचा घातपात झाला याबाबत तर्त-वितर्क लढवले जात आहेत. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरु असून, लवकरच या कुटुंबाच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. सणबूर, ता. पाटण येथील आनंदा पांडुरंग जाधव,… Continue reading पाटण तालुक्यात कुटुंबातील चौघांच्या मृत्यूबाबत तर्त-वितर्क

कोयना धरणात 6 टीएमसी पाणीसाठा

सातारा : जिल्ह्यात सुरु असलेल्या संततधार पावसाने कोयना धरणाच्या पाण्यात मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात धरणात 6 टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. धरणात पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरु आहे. कोयनानगरमध्ये 165 तर महाबळेश्वरला 153 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पावसामुळे दरडी कोसळत असल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. कोयना धरणात 74 हजार 569 क्यूसेकने… Continue reading कोयना धरणात 6 टीएमसी पाणीसाठा

शरद पवार यांना राष्ट्रवादीतील ‘त्या’ शिलेदारांची साथ

कराड : राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार यांनी सोमवारी कऱ्हाडच्या प्रीतिसंगमावरून पक्षबांधणीसाठी पुन्हा दंड थोपटले. सख्ख्या पुतण्यासह विश्वासू सहकाऱ्यांनी दगा दिला असताना चर्चेतील तिघा तरुण चेहऱ्यांनी मात्र ‘शरद पवार’ या आश्वासक चेहऱ्यालाच पसंती दिली आहे. पवारांचे नातू आमदार रोहित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक आणि दिवंगत आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांची… Continue reading शरद पवार यांना राष्ट्रवादीतील ‘त्या’ शिलेदारांची साथ

चांदोबाचा लिंबमध्ये रंगला माऊलींचा रिंगण सोहळा

फलटण : संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे बेलवडी येथे पहिले गोल रिंगण मंगळवारी सकाळी झाले. त्यानंतर पालखी लासुर्णे मार्गे अंथुर्णेत विसावेल. संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचे पहिले उभे रिंगण चांदोबाचा लिंब येथे मोठ्या उत्साहात पार पडले. संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी दुपारी लोणंद येथून तरडगावकडे मार्गस्थ झाली. लोणंद होऊन काही किलोमीटर अंतरावर चांदोबाचा लिंब या ठिकाणी पालखी… Continue reading चांदोबाचा लिंबमध्ये रंगला माऊलींचा रिंगण सोहळा

वारकऱ्यांसाठी जास्तीत जास्त सुविधा द्याव्यात : रवींद्र चव्हाण 

फलटण : श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळा फलटण मुक्कामी असताना सोहळ्यातील वारकरी, दिंडीकरी तसेच दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची कसलीही गैरसोय होऊ नये, याची प्रशासनाने खबरदारी घ्यावी. यासोबतच वारकऱ्यांसाठी जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्यावर प्रशासनाने भर द्यावा, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले. बांधकाममंत्री चव्हाण यांनी आज फलटण येथे पालखी तळाची पाहणी केली. भाजपचे जिल्हाध्यक्ष,… Continue reading वारकऱ्यांसाठी जास्तीत जास्त सुविधा द्याव्यात : रवींद्र चव्हाण 

आनेवाडी येथे भरधाव टँकरने मायलेकीला चिरडले

सातारा : बसची वाट पाहत महामार्गावर उभ्या असलेल्या मायलेकी आणि नातीला भरधाव टँकरने चिरडल्याची घटना घडली. पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर आनेवाडी गावाच्या हद्दीत ही घटना घडली. टोलनाक्याहून साताऱ्याच्या दिशेने निघालेल्या टँकरवरील चालकाचे पुलावरून उतारावर नियंत्रण सुटले. वाहनांच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या दोन महिला आणि एका लहान मुलीला टँकरने उडवले. यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्या महिलेचा… Continue reading आनेवाडी येथे भरधाव टँकरने मायलेकीला चिरडले

error: Content is protected !!