कोल्हापुरी ठसका : ‘हा’ यांनी केलेला विकास….

कोल्हापूर महानगरपालिकेची वाटचाल आता सुवर्णमहोत्सवी वर्षाकडे सुरू आहे. तत्पूर्वी आता लवकरच ९ वे सभागृह अस्तित्वात येईल. मुळात कोल्हापूर म्हणजे मोठं खेडं. मागील ४८ वर्षात या मोठ्या खेडेवजा शहराची लोकसंख्या वाढली. मोठ्या इमारतींची संख्या वाढली. पेठा अधिकच गजबजल्या. दाटीवाटी झाली. महापालिका अस्तित्वात आली तेव्हा जेवढे क्षेत्र होते,  तेवढेच क्षेत्र आजही आहे. महापालिकेच्या हद्दीत जेवढ्या किलोमीटरचे रस्ते… Continue reading कोल्हापुरी ठसका : ‘हा’ यांनी केलेला विकास….

देशभरात कोल्हापूरचा लौकिक वाढविणाऱ्या बाळासाहेब तानवडेंचा ‘रुबाबच वेगळा…’ (व्हिडिओ)

राजस्थानात झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील आगळ्यावेगळ्या स्पर्धेचे विजेतेपद पटकावून कोल्हापूरच्या नावलौकिकात आणखी भर घालणाऱ्या बाळासाहेब तानवडे यांच्याशी खास बातचीत.  

‘फुलेवाडी, बलराम कॉलनी’तील सर्व विकासकामे १०० टक्के पूर्ण करू : राहुल माने (व्हिडिओ)

प्रभाग विकास प्रक्रिया सतत सुरू असते. त्यामुळे फुलेवाडी व बलराम कॉलनी प्रभागातील सर्व विकासकामे १०० टक्के पूर्ण करणे, हेच ‘माझे व्हिजन’ असल्याचे माजी नगरसेवक राहुल माने यांनी स्पष्ट केले.  

कोल्हापुरी ठसका :  जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीत कुणाला आहे इंटरेस्ट..?

कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या मुदतपूर्व बदलीसाठी कुणीतरी गुपचुप प्रयत्न करत असल्याची कुणकुण शहरवासीयांना लागली आहे. या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची लोकप्रियता कुणाला तरी खुपते आहे. त्यांच्या बदलीत कुणाचा इंटरेस्ट आहे हे सध्या तरी गुलदस्त्यात असले, तरी आज ना उद्या ते उघड होणार आहे. दीड वर्षांपूर्वी जिल्हाधिकारी देसाई यांची कोल्हापूरला बदली झाली. ते मूळचे याच जिल्ह्यातील असल्याने… Continue reading कोल्हापुरी ठसका :  जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीत कुणाला आहे इंटरेस्ट..?

कोल्हापुरी ठसका : राजकारणी आणि पत्रकार म्हणजे ‘सख्खे शेजारी…

‘दर्पण’ कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची आज जयंती. त्यानिमित्त आज पत्रकार दिन साजरा केला जातो.  आचार्य जांभेकर यांच्यावेळेची पत्रकारिता एका ध्येयाने प्रेरित होती. मात्र, आजच्या पत्रकारितेला बाजारूपणाची लागण झाली आहे. राजकारणी आणि पत्रकार म्हणजे ‘सख्खे शेजारी’ बनले आहेत. पत्रकार विकाऊ, भाट, झाल्याचा थेट आरोप सर्वसामान्य वाचक करू लागले आहेत. पूर्वी पत्रकार आणि राजकारणी एकमेकांशी परिचित… Continue reading कोल्हापुरी ठसका : राजकारणी आणि पत्रकार म्हणजे ‘सख्खे शेजारी…

कोल्हापुरी ठसका : ताकाला जाऊन मोगा का लपवता ?

महापालिकेची निवडणूक नक्की कधी होईल हे अद्याप निश्चितपणे सांगता येत नाही. पण, वातावरण हळूहळू तापू लागले आहे. पालिकेवर आपलीच सत्ता यावी यासाठी सर्वच पक्षांचे नेते रणनीती आखू लागले आहे. सत्तेपेक्षा एकमेकाला शह कसा द्यायचा हाच या नेत्यांचा प्राधान्यक्रम असणार आहे. त्यामुळेच बंद खोलीतील चर्चांचे प्रमाण वाढले आहे. मात्र चर्चा तर करायच्या आणि याबाबत विचारले तर… Continue reading कोल्हापुरी ठसका : ताकाला जाऊन मोगा का लपवता ?

कोल्हापुरी ठसका : कालचा गोंधळ बरा होता असं नको व्हायला…

महापालिका निवडणूक जाहीर झाली की इच्छुक जनतेपुढे फारच नम्र होतात. इतके की, नम्रतेचे जणू आदर्शच… निकाल लागल्यावर मात्र नम्रतेचा उसना मुखवटा गळून पडतो. अर्थात, अगदी हाताच्या बोटाच्या मोजण्याइतकेच याला अपवाद असतात. सभागृहात आले की त्यांचे वर्तन, भाषा बदलते, असा अनुभव आहे. वास्तविक, मागील काही वर्षांपासून अशी परिस्थिती आहे. किंबहुना आणखीनच बिघडत चालली आहे. सर्वांनी याचा… Continue reading कोल्हापुरी ठसका : कालचा गोंधळ बरा होता असं नको व्हायला…

कोल्हापुरी ठसका : महापौरपदानंतर फुलस्टॉप…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून आमदार, खासदार, मंत्री होण्याची संधी मिळत असते. तो एक उत्तम मार्ग आहे. कोल्हापूर शहर मात्र त्याला आजपर्यंत अपवाद ठरले आहे. महापौर पदानंतर प्रयत्न करूनही तशी संधी कुणालाच मिळाली नाही. सर्वांनाच महापौर पदानंतर फुलस्टॉप घ्यावा लागला हा इतिहास आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकारण करण्यासाठी राजकारणाचा अनुभव असावा लागतो. असा अनुभव किंवा राजकारणाचे बाळकडू… Continue reading कोल्हापुरी ठसका : महापौरपदानंतर फुलस्टॉप…

कोल्हापुरी ठसका : सर्वांचीच घरे काचेची…

समाजसेवा विविध प्रकारे करता येते. त्यासाठी हातात सत्ता असायला हवी असे काही नाही. कोणतीही सत्ता हातात काम नसताना अनेकांनी समाजसेवेचे व्रत अंगिकारले आहे. कित्येक वर्षे ते या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी सत्तेचा कधीच हव्यास केला नाही. ते जास्तीत जास्त एखाद्या पुरस्काराचे मानकरी ठरतात. अपवादात्मक एखाद्याला शासनाकडून अनुदान मिळते. सेवाव्रतींंना लोकाश्रय मात्र चांगला मिळतो, असा अनेकांचा… Continue reading कोल्हापुरी ठसका : सर्वांचीच घरे काचेची…

कोल्हापुरी ठसका : पर्यटनासाठी माणसं जंगलात आणि गवे शहरात..!

कोल्हापूर शहराच्या भरवस्तीत गव्यांचा वावर असल्याचं स्पष्ट झाले. असं का व्हावं, असा प्रश्न प्रत्येकाला पडला. उत्तरही अगदी सोपं आहे. माणसांचा अति स्वार्थ त्याला कारणीभूत आहे, हे मान्य करावेच लागेल. निसर्गाच्या सान्निध्यात राहणे वेगळे आणि अतिक्रमण करणे वेगळे… पूर्वी वानप्रस्थाश्रम व्यवस्थेत वयोवृद्ध जंगलात जात असत. आता कुणीही उठतो, जंगलात जातो आणि तिथे अतिक्रमण करतो. आपण जंगली… Continue reading कोल्हापुरी ठसका : पर्यटनासाठी माणसं जंगलात आणि गवे शहरात..!

error: Content is protected !!