LiveMarathi

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नवनियुक्त कुलगुरू डॉ. महानवर यांचे केले अभिनंदन

मुंबई ( प्रतिनिधी ) डॉ. प्रकाश महानवर यांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे कुलगुरुपदी नियुक्ती झाली आहे. या नियुक्तीबद्दल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी “Modi shaping a global order in flux” हे पुस्तक त्यांना भेट देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. चंद्रकांत पाटील यांनी कुलगुरू श्री.महानवर यांच्याशी विद्यापीठ आणि… Continue reading मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नवनियुक्त कुलगुरू डॉ. महानवर यांचे केले अभिनंदन

कुणीच कुणाला शिव्या देऊ नयेत : अजित पवार

पुणे : आपली संस्कृती, परंपरा, इतिहास काय सांगतो. दोन व्यक्तींनी काय, कुणीच कुणाला शिव्या देऊ नये. एवढ्या महत्त्वाच्या पदावर असणाऱ्या व्यक्तींनी तसे बोलू नये. उच्च व तंत्र शिक्षण विभाग मिळाल्याने चंद्रकांत पाटील हे कदाचित नाराज असतील. त्यामुळे त्याचे संतुलन राहिले नाही का, हे कळायला मार्ग नाही, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष… Continue reading कुणीच कुणाला शिव्या देऊ नयेत : अजित पवार

चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुडमधील विजयावर शिक्कामोर्तब

पुणे (प्रतिनिधी) : २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत आमदार व विद्यमान मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुडमधील विजयावर सर्वोच्च न्यायालयाकडूनही शिक्कामोर्तब करण्यात आले असून, सर्वोच्च न्यायालयाने ही ॲड. किशोर शिंदे यांची याचिका फेटाळून लावली आहे. २०१९ च्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी निर्विवाद विजय मिळवला होता. या निवडणुकीतील निकालाला ॲड. किशोर शिंदे… Continue reading चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुडमधील विजयावर शिक्कामोर्तब

‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देणाऱ्यांवर कारवाई करू : फडणवीस

नागपूर (वृत्तसंस्था) : ‘पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना सोडणार नाही, त्याला शोधून त्यावर कारवाई करू’ अशा शब्दांत फडणवीसांनी इशारा दिला आहे. काल पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर झालेल्या आंदोलनात ‘पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘अल्लाह हूं अकबर’ अशी घोषणाबाजी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून, पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी ही घोषणाबाजी केली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या देशभरातील कार्यालयावर… Continue reading ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देणाऱ्यांवर कारवाई करू : फडणवीस

जेजुरीत निर्मला सीतारामन यांनी घेतले खंडेरायाचे दर्शन

जेजुरी (प्रतिनिधी) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सकाळी जेजुरीतील खंडेरायाचे दर्शन घेतले. सीतारामन यांनी जेजुरी संस्थानच्या पदाधिकाऱ्यांची बैठकही घेतली. त्यावेळी देवस्थानच्या वतीने सीतारामन यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौऱ्यावर आहेत. बारामती मतदारसंघातील सर्व तालुक्यांमध्ये सीतारामन भेट देऊन विविध घटकांशी संवाद साधत आहे. त्यांच्यासोबत इंदापूरचे माजी… Continue reading जेजुरीत निर्मला सीतारामन यांनी घेतले खंडेरायाचे दर्शन

एनआयएच्या छापेमारीत राज्यात २० जणांना अटक

मुंबई/ पुणे (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय गुप्तचर तपास यंत्रणेकडून (एनआयए) टेरर फंडिंगबाबत कसून तपास केला जात आहे आहे. या तपासाला आता वेग आला आहे. त्यामुळे पीएफआयचे (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) धाबे दणाणले आहे. एटीएस आणि एनआयएचे टीम एकत्रितपणे हा तपास करीत आहे. पहाटे तीन वाजेपासूनच देशभरात एनआयएची छापेमारी सुरू आहे. टेरर फंडिंग, प्रशिक्षण… Continue reading एनआयएच्या छापेमारीत राज्यात २० जणांना अटक

ज्येष्ठ पत्रकार, लेखक आशीष चांदोरकर यांचे निधन

पुणे (प्रतिनिधी)  ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि फूड ब्लॉगर आशीष चांदोरकर (वय ४४) यांचे बुधवारी पहाटे झोपेतच हृदयविकाराच्या झटक्याने पुण्यातील घरी निधन झाले. चांदोरकर अविवाहित होते. त्यांच्या पश्चात एक बहीण व कुटुंबीय असा परिवार आहे. आज संध्याकाळी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. चांदोरकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीवर आधारित ‘मॅन ऑफ मिशन… Continue reading ज्येष्ठ पत्रकार, लेखक आशीष चांदोरकर यांचे निधन

आता गृहपाठाला मिळणार सुट्टी ?

पुणे (प्रतिनिधी) : पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. लवकरच तज्ज्ञांशी चर्चा करुन गृहपाठ बंदीवर निर्णय घेणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. त्यामुळे राज्यातील विद्यार्थी आणि पालकांसाठी ही आनंदाची बातमी ठरणार आहे. केसरकर म्हणाले, माझे वैयक्तिक मत आहे की, मुलांवर अभ्यासाचे ओझे देऊ नये. मुलांच्या मेंदूचा विकास… Continue reading आता गृहपाठाला मिळणार सुट्टी ?

विद्यापीठांमधील विद्यार्थी निवडणुका सुरू व्हाव्यात: केंद्रीय मंत्री बघेल

पुणे (प्रतिनिधी) : विद्यापीठे आणि शिक्षण संस्थांमधील स्थगित असलेल्या विद्यार्थी निवडणुका पुन्हा सुरू झाल्या पाहिजेत. देशातील सद्यकालीन राजकीय प्रवाह एका स्थित्यंतरातून जात आहे. अशा परिस्थितीत राजकीय पटलावरील भावी युवा नेतृत्व घडवण्यासाठी भारतीय छात्र संसद महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकेल, अशी अपेक्षा केंद्रीय कायदा आणि न्याय राज्यमंत्री प्रा. एस. पी. सिंह बघेल यांनी गुरुवारी येथे व्यक्त केली.… Continue reading विद्यापीठांमधील विद्यार्थी निवडणुका सुरू व्हाव्यात: केंद्रीय मंत्री बघेल

नवीन प्रकल्प आणण्यावर लक्ष केंद्रित करा  : शरद पवार

पुणे (प्रतिनिधी) : गेलेला वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प राज्यात पुन्हा येणार नाही. त्यावर आता चर्चा करून काही उपयोग नाही. नवीन प्रकल्प कसे येतील, यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. केंद्रातील सत्ता हातात असल्यास राज्यात येणारे प्रकल्प बाहेर जातात, असे प्रकार घडत असतात. शिंदे-भाजप सरकारला राज्यात प्रकल्पाची गरज वाटत नाही, असा टोला शरद पवार यांनी लगावला. पवार हे पुण्यात… Continue reading नवीन प्रकल्प आणण्यावर लक्ष केंद्रित करा  : शरद पवार