‘ताई’ नवीन पक्षात प्रवेश कधी?, वंचितची प्रणिती शिंदेंवर टीका

सोलापूर/प्रतिनिधी : वंचित बहुजन आघाडीकडून येणारे प्रस्थावांवर प्रस्ताव आणि अटी शर्थींमुळे हैराण झालेल्या महाविकास आघाडीने अखेर वंचित बहुजन आघाडीशिवाय महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. यात ठाकरे गट सर्वाधिक जागा लढणार आहे. दरम्यान, कॉंग्रेस नेत्या प्रणिती शिंदे ह्या सोलापुरात गावात कॉर्नर बैठकीत बोलत असताना त्यांनी वंचित बहुजन आघाडीवर नाव न घेता टीका केली… Continue reading ‘ताई’ नवीन पक्षात प्रवेश कधी?, वंचितची प्रणिती शिंदेंवर टीका

शिवाजी पार्कवरील ऐतिहासिक सभेने भाजपासह फुटीरसेनेची झोप उडाली: नाना पटोले

बाळासाहेब ठाकरेंनीच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत युपीएला दोनदा पाठिंबा दिला, हे विसरले का? मुंबई/प्रतिनिधी : शिवाजी पार्कवरील भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपाच्या ऐतिहासीक सभेने एक नवा इतिहास रचला आहे. इंडिया आघाडीच्या देशभरातील नेत्यांच्या उपस्थितीत या सभेला ‘जनसागर’ लोटला होता. शिवाजी पार्कवरील सभेने भाजपाला आपला पराभव समोर दिसू लागला आहे त्यामुळे नैराश्येतून चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दरेकर यांच्यासह मुख्यमंत्री… Continue reading शिवाजी पार्कवरील ऐतिहासिक सभेने भाजपासह फुटीरसेनेची झोप उडाली: नाना पटोले

‘वंचित’शिवाय महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला

मुंबई /प्रतिनिधी : निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीत जागावाटपाच्या घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. ज्यात उद्धव ठाकरेंना 22 जागा मिळणार असल्याचे निश्चित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर पुढील दोन दिवसांत उद्धव ठाकरेंकडून मतदारसंघासह उमेदवारांच्या नावाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे वंचित बहुजन… Continue reading ‘वंचित’शिवाय महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला

मोदीभक्त देशभक्त नाहीत का?; उद्धव ठाकरेंचा पलटवार

मुंबई/प्रतिनिधी : मुंबईत काल भारत जोडो न्याय यात्रेची सांगता सभा झाली. यावेळी देशातील दिग्गज नेते या सभेला उपस्थित होते. मुंबईत कार्यक्रम असल्याने उद्धव ठाकरेंनीही आवर्जुन हजेरी लावली. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाषणाची सुरुवात हिंदू बांधवांनो-भगिनींनो न म्हणत केली. यावरून विरोधकांनी ठाकरे यांना लक्ष करत टीका केली जात आहे. उद्धव ठाकरे यांनी काल (१७ मार्च)शिवाजी पार्कात राहुल… Continue reading मोदीभक्त देशभक्त नाहीत का?; उद्धव ठाकरेंचा पलटवार

‘लोकसभे’पूर्वी निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; 6 राज्य गृहसचिव हटवले

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) सार्वत्रिक निवडणुकीची पहिली अधिसूचना जारी करण्यापूर्वी निवडणूक आयोगाने आज मोठी कारवाई केली आहे. आयोगाने 6 राज्यांच्या गृहसचिवांना हटवण्याचे आदेश जारी केले आहेत. याशिवाय पश्चिम बंगालच्या डीजीपींना हटवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करताना निवडणूक आयोग निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी शक्य ती सर्व पावले उचलणार असल्याचे सांगितले होते. मुख्य… Continue reading ‘लोकसभे’पूर्वी निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; 6 राज्य गृहसचिव हटवले

निवडणूक आयोगानं बीएमसी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना हटवलं

मुंबई/प्रतिनिधी : बृहन्मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यासह अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांना केंद्रीय निवडणूक आयोगाने हटवलं आहे. निवडणूक आयोगाने गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या सहा राज्यांतील सचिवांना हटवले आहे. लोकसभेच्या निवडणुकांची तारीख जाहीर केल्यानंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याबरोबर मिझोराम… Continue reading निवडणूक आयोगानं बीएमसी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना हटवलं

सांगली लोकसभेच्या उमेदवारीवर दादा घराण्याचा अबोला…

जयंत पाटील, विश्वजित कदम विशाल पाटलांना पाठबळ देणार की संजय पाटलांना मदत करणार सांगली/प्रतिनिधी : सांगली लोकसभेच्या जागेचा तिढा अद्याप कायम आहे. या जागेवर शिवसेना ठाकरे गट आणि कॉंग्रेस आग्रही आहे. शिवसेनेने कोल्हापूरची जागा कॉंग्रेसला दिल्याने ठाकरे गटाकडून सांगलीच्या जागेवर दावा सांगितला जात आहे. तर कॉंग्रेस नेते आमदार विश्वजित कदम यांनी सांगलीची जागा कोणत्याही परिस्थितीत… Continue reading सांगली लोकसभेच्या उमेदवारीवर दादा घराण्याचा अबोला…

विद्यमान खासदार संजय मंडलिकांच्या विरोधात भाजपनेत्यानंच उपसलं अस्त्र

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) गेल्या काही दिवसांपासून विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना होऊ घातलेल्या लोकसभेसाठी उमेदवारी मिळणार का ? यावरुन जोरदार चर्चा सुरु आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला खासदार मंडलिक यांनी प्रचारासाठी सुरुवात केली आहे. याला आता नवं वळण लागलं असून विद्यमान खासदारांच्या उमेवारीला भाजपचेच नेते संग्रामसिंह कुपेकर यांनी विरोध केला आहे. चंदगड परिसरात पार पडलेल्या… Continue reading विद्यमान खासदार संजय मंडलिकांच्या विरोधात भाजपनेत्यानंच उपसलं अस्त्र

अजित पवारांचं वागणं बरं नाही ! कुटुंबाची अजित पवारांविरोधात भूमिका

कमकुवत समजू नका?, श्रीनिवास पवारांचा इशारा मुंबई/प्रतिनिधी : अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडत भाजपसोबत जाण्याच्या निर्णय घेतला. आता तर अजित पवार यांनी बारामती मधून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. पण अजित पवारांच्या या भूमिकेला पवार कुटुंबातून जोरदार विरोध होत आहे. अजित पार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय… Continue reading अजित पवारांचं वागणं बरं नाही ! कुटुंबाची अजित पवारांविरोधात भूमिका

केसीआर यांना धक्का ! ईडीकडून मुलीला अटक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :  तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांची मुलगी के. कविता यांना शुक्रवारी ईडीने ताब्यात घेतले आहे. के. कविता यांच्या हैदराबादमधील निवासस्थानी दोन्ही तपास यंत्रणांनी छापेमारी केल्यानंतर त्यांना ताब्यात घेतले. आज दुपारी दिल्लीहून १० अधिकारी चौकशीसाठी हैदराबादमध्ये आले होते. के. कविता आणि त्यांचे पती डी. अनिल कुमार यांच्या समोरच घराची झडती घेण्यात आली. सूत्रांनी… Continue reading केसीआर यांना धक्का ! ईडीकडून मुलीला अटक

error: Content is protected !!