प्रेमप्रकरणातून दुरावलेल्या मुलींशी समिती समन्वय साधणार

मुंबई (प्रतिनिधी) : लव्ह जिहादविरोधात राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आंतरधर्मीय प्रेमप्रकरणात कुटुंबापासून दुरावलेल्या मुलींसाठी राज्य सरकार विशेष समिती स्थापन करणार आहे. आंतरधर्मीय प्रेमविवाह केलेल्या मुलींच्या आयुष्यात सध्या काय सुरू आहे, याची ही समिती माहिती घेणार आहे. पुढील सात दिवसांत १० सदस्यांची समिती स्थापन होणार आहे. या मुलींशी समन्वय साधून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी समिती… Continue reading प्रेमप्रकरणातून दुरावलेल्या मुलींशी समिती समन्वय साधणार

सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात मस्ती गेली आहे : अजित पवार

मुंबई (प्रतिनिधी) : सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात मस्ती गेली आहे म्हणून सरकारमधील नेते अशी बेताल वक्तव्य करत आहेत, असे मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. मविआच्या काळात एकही प्रकल्प गेला नाही, आताच प्रकल्प राज्याबाहेर गेले आहेत. खमकेपणाणे राज्यासाठी काम केले तर राज्याचा विकास होतो, असेही अजित पवारांनी म्हटले आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले… Continue reading सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात मस्ती गेली आहे : अजित पवार

सुषमा अंधारे टीका करण्यात एक्सपर्ट : रामदास आठवले

मुंबई (प्रतिनिधी) : ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे ह्या आधी माझ्या पक्षात होत्या तसेच अंधारे या टीका करण्यात ‘एक्सपर्ट’ आहेत, अशी टीका केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली.  ‘सुषमा अंधारे या टीका करण्यात एक्सपर्ट आहेत, टीका करायला हरकत नाही, पण सारखी टीका करू नये’ अंधारे आमच्याही पक्षात होत्या; पण… Continue reading सुषमा अंधारे टीका करण्यात एक्सपर्ट : रामदास आठवले

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्राला इशारा

मुंबई (प्रतिनिधी) : ‘महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतल्याने काही फरक पडणार नाही’, असे म्हणत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्राला उघडपणे इशारा दिला आहे, तर शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील आणि उदय सामंत यांनी या विधानाचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई महाराष्ट्राच्या सीमाभागाबद्दल वारंवार विधान करत आहे. त्यांच्या या विधानावर… Continue reading कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्राला इशारा

ईशान किशनचे वेगवान द्विशतक; बांगलादेशसमोर ४१० धावांचे लक्ष्य

ढाका (वृत्तसंस्था) : भारत आणि बांगलादेश यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना चटोग्राम येथील झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारताचा युवा सलामीवीर ईशान किशनने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात भारताकडून सर्वात जलद म्हणजे १३१ चेंडूत २१० धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे.  ईशान किशनचे द्विशतक आणि विराटच्या शतकी खेळीच्या… Continue reading ईशान किशनचे वेगवान द्विशतक; बांगलादेशसमोर ४१० धावांचे लक्ष्य

संपत्तीसाठी मुलाने केली अभिनेत्री आईची हत्या

मुंबई (प्रतिनिधी) :  मनोरंजनसृष्टीतील छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री वीणा कपूर यांच्या मुलानेच संपत्तीसाठी त्यांची हत्या केली आहे. मुंबईतील जुहू भागात ही घटना घडली आहे. ४३ वर्षीय मुलाने ७४ वर्षीय अभिनेत्रीची बॅटने मारहाण करत हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर पोलिसांपासून वाचण्यासाठी मृतदेह एका बॉक्समध्ये भरून माथेरानच्या जंगलात फेकून दिला. संपत्तीवरून वीणा कपूर आणि त्यांच्या मुलामध्ये वाद… Continue reading संपत्तीसाठी मुलाने केली अभिनेत्री आईची हत्या

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पुन्हा रखडला

मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून हिवाळी अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळातील दुसऱ्या टप्प्यातील विस्तार होईल, असे सांगितले जात होते; परंतु तो मंत्रिमंडळ विस्तार आता रखडला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर स्वतःकडची अतिरिक्त खातीसुद्धा इतर मंत्र्यांकडे सोपवली आहेत. शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळात सध्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि १८ कॅबिनेट मंत्री पकडून जवळपास २० मंत्री आहेत. त्यामुळे अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा… Continue reading राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पुन्हा रखडला

लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे निधन

मुंबई (प्रतिनिधी) : साठ वर्षांहून अधिक काळ आपल्या गायनाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी, ज्येष्ठ पार्श्‍वगायिका सुलोचना चव्हाण यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. वृध्दापकाळाने त्यांचे निधन झाल्याच माहिती त्यांचा मुलगा विजय चव्हाण यांनी दिली आहे. त्यांची प्रकृती गेली काही दिवस खालावली होती. काही शस्त्रक्रिया आणि वयोपरत्वे आलेले आजारपण… Continue reading लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे निधन

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी २०० कोटी मंजूर

मुंबई (प्रतिनिधी) : राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला थकीत पगारासाठी २०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा रखडलेला पगार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन अदा करण्यासाठी शासनाकडून दिरंगाई झाली होती. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा पगार रखडला होता. आता २०० कोटी रुपये मंजूर झाल्याने पगार होण्याची चिंता सध्यातरी दूर झाली… Continue reading एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी २०० कोटी मंजूर

दहावीची परीक्षा २ मार्चला, बारावीची २१ फेब्रुवारीपासून

मुंबई (प्रतिनिधी) : दहावीची परीक्षा २ ते २५ मार्च या कालावधीत होणार आहे. तसेच बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च या कालावधीत होणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडाळाने जाहीर केले. त्यामुळे विद्यार्थांना अभ्यासाचे नियोजन करता येईल. दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी कोरोना काळात दिलेल्या सवलती शिक्षण मंडळाने… Continue reading दहावीची परीक्षा २ मार्चला, बारावीची २१ फेब्रुवारीपासून

error: Content is protected !!