सुळे-आकुर्डे धरणाचे काम पूर्णत्वास; शेतकऱ्यांतून समाधान

कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील सुळे-आकुर्डे धरणाची वर्षभरापासून अतिशय बिकट अवस्था झाली होती. त्याची दखल घेत पाटबंधारे विभागाने या धरणासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिल्याने धरणाच्या पिलर्सची चांगल्याप्रकारे दुरुस्ती करण्यात आली आहे. पाटबंधारे विभाग व ठेकेदाराच्या कामाविषयी शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.  धामणी खोऱ्यातील दहा ते बारा गावांना जोडणारे धरण म्हणून सुळे-आकुर्डे धरणास ओळखले जाते.… Continue reading सुळे-आकुर्डे धरणाचे काम पूर्णत्वास; शेतकऱ्यांतून समाधान

रेशन दुकानासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत : जिल्हाधिकारी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील एकूण २९ नवीन रास्तभाव धान्य दुकानांसाठी २०२२ सालचा जाहीरनामा प्रसिध्द करण्यात आला आहे. इच्छुक संस्था, महिला बचत गटांनी, स्थानिक स्वराज्य संस्थांनी कागदपत्रांसह दि. ४ ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे. रास्तभाव दुकान व गावाचे/क्षेत्राची नावे पुढीलप्रमाणे : कोल्हापूर शहर- शिवाजी पेठ, शाहूपुरी,… Continue reading रेशन दुकानासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत : जिल्हाधिकारी

विधानभवन कक्ष अधिकारीपदी रोहित जाधव

कुंभोज (प्रतिनिधी) : येथील रोहित मोहन जाधव यांची सचिवालय विधानभवन मुंबई येथे कक्ष अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ते सचिवालय विधानभवन मुंबई येथे सहायक कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत होते. या निवडीबद्दल कुंभोज ग्रा.पं. च्या वतीने जाधव यांचा सरपंच अरुणादेवी पाटील, उपसरपंच अनिकेत चौगुले, महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.… Continue reading विधानभवन कक्ष अधिकारीपदी रोहित जाधव

बोगस डॉक्टरांवर कारवाई करा : जिल्हाधिकारी रेखावार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील स्त्री भ्रूण हत्याविरोधी मोहीम गतिमान करा. यासाठी बोगस डॉक्टरांची तपासणी मोहीम प्रभावीपणे राबवून बोगस डॉक्टरांवर कारवाई करा, अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या आहेत. जिल्हा दक्षता पथक (पीसीपीएनडीटी) बैठक मंगळवारी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शाहू सभागृहात घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक… Continue reading बोगस डॉक्टरांवर कारवाई करा : जिल्हाधिकारी रेखावार

दौलत देसाई यांचा प्रशासकीय सेवेचा राजीनामा

कोल्हापूर : मास्क नाही, तर प्रवेश नाही हे घोषवाक्‍य राज्याला देणारे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिला आहे. सध्या ते मुंबईत वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सह सचिवपदावर कार्यरत होते.  जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी फेब्रुवारी २०१९ मध्ये कोल्हापूर जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यानंतर त्यांनी लोकसभा, विधानसभा निवडणुका शांततेत आणि नियोजनबध्द पार पाडल्या. याशिवाय महापुराच्या… Continue reading दौलत देसाई यांचा प्रशासकीय सेवेचा राजीनामा

पन्हाळयाचे प्रशासक स्वरूप खारगे यांना निरोप

पन्हाळा (प्रतिनिधी) : येथील नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांची नुकतीच बदली गडहिंग्लज नगरपरिषद येथे झाल्याने त्यांना एका समारंभात निरोप देण्यात आला. खारगे यांची बदली झाल्याने पन्हाळा नगरपरिषदेचा अतिरिक्त कारभार जिल्हाधिकाऱ्यांनी हुपरीच्या मुख्याधिकाऱ्यांकडे सोपवला होता. निरोप समारंभप्रसंगी माजी नगराध्यक्षा रुपाली धडेल, पन्हाळा पोलीस निरीक्षक अरविंद काळे, माजी नगराध्यक्ष विजय पाटील, तेजस्विनी गुरव, रवींद्र धडेल,… Continue reading पन्हाळयाचे प्रशासक स्वरूप खारगे यांना निरोप

उद्योजकांच्या विजेच्या समस्या सोडविण्यास कटिबध्द : कावळे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : औद्योगिक ग्राहकांना सुरळीत व दर्जेदार वीज पुरवठा मिळावा या भूमिकेतून महावितरण व उद्योजक यांच्यात सातत्यपूर्ण संवाद सुरू आहे. मे महिन्यातील बैठकीनंतर महावितरण व मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन ऑफ कागल-हातकणंगले यांचे शिष्टमंडळासमवेत पाठपुरावा बैठक झाली. यावेळी उद्योगांसाठी वीज सुविधांचे बळकटीकरण करणे आणि उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यासाठी महावितरण कटिबध्द असल्याचे अधीक्षक अभियंता अंकुर कावळे यांनी… Continue reading उद्योजकांच्या विजेच्या समस्या सोडविण्यास कटिबध्द : कावळे

पन्हाळा तालुक्यात संजय गांधी निराधार योजना समिती पुनर्गठीत

कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना तब्बल १० वर्षांनी पुनर्गठीत झाली. पालकमंत्री सतेज पाटील व आ. पी. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी या समितीच्या नियुक्तीचे आदेश दिले. केंद्र व राज्य सरकारच्या वतीने संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, आर्थिक दुर्बल घटकांसाठी इंदिरा गांधी वृद्धापकाळ, विधवा, दिव्यांग यांना उदरनिर्वाहासाठी मासिक पेन्शन दिली… Continue reading पन्हाळा तालुक्यात संजय गांधी निराधार योजना समिती पुनर्गठीत

शंकरराव जाधव यांनी प्रशासनाची प्रतिमा उंचावली : जिल्हाधिकारी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हाधिकारी कार्यालय चांगल्या पद्धतीने चालवण्याचे कसब निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांच्यामध्ये होते, असे गौरवोद्गार काढून महसूल विभागात उत्कृष्ट काम करुन प्रशासनाची प्रतिमा उंचावण्यात शंकरराव जाधव यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. पुढील काळात त्यांची निश्चितच उणीव भासत राहील, असे भावनिक उद्गार जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी काढले. निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांच्या सेवा निवृत्तीनिमित्त… Continue reading शंकरराव जाधव यांनी प्रशासनाची प्रतिमा उंचावली : जिल्हाधिकारी

गडहिंग्लजमध्ये दोन योजनेचा १३२ लाभार्थ्यांना लाभ

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : संजय गांधी निराधार योजनेची मासिक बैठक पार पडली. समितीचे अध्यक्ष अमर चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विधवा, परित्यक्ता, घटस्फोटीत, अपंग अशा अशा संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ४७ अर्ज मंजूर करण्यात आले. श्रावणबाळ सेवा राज्य निवृती वेतन योजनेअंतर्गत १९ अर्जांना मंजुरी देण्यात आली. दोन्ही योजनेत मिळून एकूण ६६ नव्या लाभार्थ्यांना लाभ मिळणार… Continue reading गडहिंग्लजमध्ये दोन योजनेचा १३२ लाभार्थ्यांना लाभ

error: Content is protected !!