आदित्य ठाकरे केंद्र सरकारच्या रडावरवर

मुंबई (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या रडावरवर युवासेनाप्रमुख आमि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आले आहेत. मोदी सरकारने आदित्य ठाकरे यांनी पर्यावरणमंत्री म्हणून गेल्या अडीच वर्षांच्या काळात घेतलेल्या निर्णयांचे आणि कामकाजाचे ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. पर्यावरण मंत्री म्हणून आदित्य ठाकरे यांच्या कामकाजाचे अनेकदा कौतुक झाले होते. परंतु, आता केंद्र सरकारने या सगळ्याची समीक्षा केल्यास त्यामधून… Continue reading आदित्य ठाकरे केंद्र सरकारच्या रडावरवर

अदानी (इंधन) समायोजन आकाराचा जबरदस्त दणका

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यातील घरगुती, व्यापारी, शेतकरी, औद्योगिक व अन्य सर्व २.८७ कोटी ग्राहकांवर जुलै २०२२ मध्ये मिळालेल्या बिलापासून ५ महिन्यासाठी अदानी (इंधन) समायोजन आकार या नावाखाली थेट वीज आकाराच्या २० टक्के दरवाढ लागू करण्यात आली आहे. याशिवाय थकीत इंधन समायोजन आकार १२२६ कोटी रू., अदानीचे राहीलेले देणे ७७०९ कोटी रू. व समान करार असलेल्या… Continue reading अदानी (इंधन) समायोजन आकाराचा जबरदस्त दणका

कुरुंदवाड मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधातील तक्रारी मागे

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : कुरुंदवाड शहर बचाव कृती समितीने मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्याविरोधात वेळोवेळी केलेल्या तक्रारी मागे घेतल्याचा अर्ज कृती समिती अध्यक्ष अर्शद बागवान यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवला आहे. आतापर्यंत दिलेल्या सर्व तक्रारी गैरसमजूतीतून तसेच भावनेच्या भरात केल्या असल्याचे कृति समिती अध्यक्षांनी दिलेल्या अर्जात म्हटले आहे. या सर्व तक्रारी स्वखुषीने मागे घेत असून, माझ्यावर कोणत्याही प्रकारचा… Continue reading कुरुंदवाड मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधातील तक्रारी मागे

कुंभोज येथे ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबवणार

कुंभोज (प्रतिनिधी) : येथील ग्रामपंचायतीने ‘हर घर तिरंगा’ अभियानात उत्स्फूर्तपणे सहभाग घेण्याचा निर्णय घेतला आहे. दि. ११ ते १७ ऑगस्ट या कालावधीत राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या घरावर, सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापना, सहकारी संस्था शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फूतीने करावयाची आहे. निर्धारित केलेल्या किमतीमध्ये प्रत्येक घराने ध्वज खरेदी करून स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत ‘हर घर… Continue reading कुंभोज येथे ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबवणार

शहरातील खराब रस्ते तातडीने दुरुस्त करा : डॉ. बलकवडे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरातील खराब झालेल्या रस्त्याबाबत प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी निवडणूक कार्यालयामध्ये आढावा घेतला. यावेळी गणेशोत्सवच्या अनुषंगाने मिरवणुकीचा मार्ग व मुख्य रस्ते तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना शहर अभियंता यांना दिल्या. या बैठकीस शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत व सर्व उप-शहर अभियंता उपस्थित होते. प्रशासक डॉ. कादंबरी बलवकडे यांनी पावसामुळे शहरातील जे रस्ते खराब… Continue reading शहरातील खराब रस्ते तातडीने दुरुस्त करा : डॉ. बलकवडे

कोल्हापुरात ६४ अनधिकृत फलक जप्त

कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील महापालिकेच्या इस्टेट विभागाच्या वतीने दि. १९ व २० जुलै रोजी शहरात अवैध, अनधिकृत होर्डिंग, जाहिरात फलक, बॅनर्स, पोस्टर्स, घोषणा फलक इत्यादी हटविणेकिरता विशेष अभियान राबविण्यात आले. या अभियानामध्ये शहरामधील ६४ अनधिकृत जाहिरात फलक जप्त करण्यात आले आहे. दि. २० जुलै रोजी शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आढळलेले अनाधिकृत फलक लावणा-या संबंधितावर महाराष्ट्र… Continue reading कोल्हापुरात ६४ अनधिकृत फलक जप्त

यंदा दहीहंडी, गणेशोत्सवासह सर्व सण निर्बंधमुक्त

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून ब्रेक लागलेला दहीहंडी आणि गणेशोत्सव यंदा धुमधडाक्यात साजरा होणार आहे. यंदा गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सवाला कोणतेही   निर्बंध असणार नाही, अशी महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केली. मूर्तिकारांना जागा उपलब्ध करून देण्यात येणार असून, मूर्तींच्या उंचीवर कुठलंही बंधन नसणार असेही मुख्यमंत्री… Continue reading यंदा दहीहंडी, गणेशोत्सवासह सर्व सण निर्बंधमुक्त

पाचगावमध्ये सोमवारपासून एक दिवसआड पाणीपुरवठा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गेल्या अनेक दिवसांपासून पाचगाववासीयांना भेडसावत असलेल्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न आमदार ऋतुराज पाटील यांच्या पुढाकारातून मार्गी लागला आहे. आ. पाटील यांनी पाचगाव ग्रामस्थांच्या शिष्टमंडळासह महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांची भेट घेऊन पाणी प्रश्न सोडवण्यासाठी चर्चा केली. सोमवारपासून पाचगाव परिसरातील नागरिकांना दिवसाआड नियमित पाणीपुरवठा करण्याची ग्वाही प्रशासक डॉ. बलकवडे यांनी दिली. महापालिकेकडून पाचगावसह… Continue reading पाचगावमध्ये सोमवारपासून एक दिवसआड पाणीपुरवठा

मुख्यमंत्र्यांनी आरेमधील मेट्रो कारशेडवरील बंदी हटवली

मुंबई (प्रतिनिधी) : येथील आरेमधील मेट्रो कारशेडवरील बंदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हटवली आहे. त्यामुळे मेट्रो कारशेडचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी मेट्रो कारशेडवरील बंदी हटवल्यानंतर आता आरेतील मेट्रो कारशेडच्या कामासाठी जोरदार सरकारी हालचाली सुरू झाल्या आहेत. आरेमध्ये कारशेड करण्याबाबत देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात २०१९ मध्ये निर्णय झाला होता; पण राज्यात महाविकास आघाडीचे सरकार… Continue reading मुख्यमंत्र्यांनी आरेमधील मेट्रो कारशेडवरील बंदी हटवली

‘कोजिमाशि’च्या अध्यक्षपदी डॉ. दत्तात्रय घुगरे, उपाध्यक्षपदी पांडुरंग हळदकर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी प्राचार्य डॉ. दत्तात्रय घुगरे, तर उपाध्यक्षपदी पांडुरंग हळदकर यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप मालगावे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली. कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक सहकारी पतसंस्थेचे निवडणूक शिक्षक नेते दादासाहेब लाड विरुद्ध आमदार जयंत आसगावकर या नेतृत्वांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या पॅनेलमध्ये… Continue reading ‘कोजिमाशि’च्या अध्यक्षपदी डॉ. दत्तात्रय घुगरे, उपाध्यक्षपदी पांडुरंग हळदकर

error: Content is protected !!