राज्यात १७ सप्टेंबरपासून ‘सेवा पंधरवडा’ चे आयोजन

मुंबई (प्रतिनिधी) : सामान्य नागरिकांच्या तक्रारी, अर्जांवर कालमर्यादेत निपटारा व्हावा, यासाठी राज्यात दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज (सोमवारी) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधत या पंधरवड्यामध्ये नागरिकांचे प्रलंबित अर्ज निकाली… Continue reading राज्यात १७ सप्टेंबरपासून ‘सेवा पंधरवडा’ चे आयोजन

ढोलगरवाडीच्या एकास वीजचोरी प्रकरणी वर्षाचा तुरुंगवास

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथील एका लघुदाब औद्योगिक ग्राहकास वीज चोरी करणे महागात पडले आहे. वीजचोरीप्रकरणी भाऊराव संभाजी पाटील (वय ४०) यांना गडहिंग्लज न्यायालयाने एका वर्षाच्या कैदेची शिक्षा ठोठावली आहे. या ग्राहकाने वीजमीटरमध्ये छेडछाड करून २४ हजार ६७५ वीज युनिटची, आर्थिक मूल्याप्रमाणे २ लाख ५० हजार रुपयांची वीजचोरी केली होती. दि. १९ नोव्हेंबर… Continue reading ढोलगरवाडीच्या एकास वीजचोरी प्रकरणी वर्षाचा तुरुंगवास

केएमटीची मुडशिंगी, चुये-येवती मार्गावरील बस सेवा बंद

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कमी उत्पन्न प्राप्त होत असलेल्या मुडशिंगी आणि चुये-येवती या मार्गावरील बस सेवा दि. १३ सप्टेंबरपासून बंद करण्यात येत आहे, याची या मार्गावरील सर्व प्रवासी नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन केएमटी प्रशासनाने केले आहे. केएमटी उपक्रमाची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे. कर्मचाऱ्यांचे वेतनामध्ये महागाई भत्ता व घरभाडे भत्त्याचा समावेश करण्यात आला आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची… Continue reading केएमटीची मुडशिंगी, चुये-येवती मार्गावरील बस सेवा बंद

कोल्हापूर-मुंबई विमानसेवा ४ ऑक्टोबरपासून

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर-मुंबई मार्गावर विमानसेवा सुरू व्हावी, अशी प्रवाशांची अनेक दिवसांपासूनची मागणी होती. या पार्श्‍वभूमीवर खासदार धनंजय महाडिक यांनीही केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता, त्याला यश आले आहे. ४ ऑक्टोबरपासून स्टार एअरची कोल्हापूर-मुंबई विमानसेवा नियमितपणे सुरू होत आहे. या विमानसेवेमुळे कोल्हापूर-मुंबई असा प्रवास करणार्‍या प्रवाशांची सोय होणार आहे.… Continue reading कोल्हापूर-मुंबई विमानसेवा ४ ऑक्टोबरपासून

संजय राऊतांना भेटण्यास ठाकरेंना परवानगी नाकारली

मुंबई (प्रतिनिधी) : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. संजय राऊत सध्या आर्थर रोड तुरुंगात आहेत. दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेण्यास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे इच्छुक होते; मात्र आर्थर रोड कारागृह प्रशासनाने ठाकरेंना परवानगी नाकारली आहे. मात्र त्यांचे भाऊ सुनील राऊत यांनी हे वृत्त फेटाळले आहे.… Continue reading संजय राऊतांना भेटण्यास ठाकरेंना परवानगी नाकारली

‘प्रशासकीय गतिमानता अभियानात नावीन्यपूर्ण उपक्रम हवेत’

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर भर द्यावा आणि स्पर्धेसाठीचे प्रस्ताव वेळेत सादर करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या. जिल्हाधिकारी राहुल यांच्या अध्यक्षतेखाली अभियान संदर्भात बैठक घेण्यात आली. बैठकीस तहसीलदार अर्चना कापसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांच्यासह संबंधित विभागाचे… Continue reading ‘प्रशासकीय गतिमानता अभियानात नावीन्यपूर्ण उपक्रम हवेत’

पीएम किसान योजनेतून अपात्र करा : राजू शेट्टी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पीएम किसान सन्मान निधी योजनेतून आपल्याला अपात्र करण्यात यावे, या मागणीचे पत्र माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिरोळच्या तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ यांना दिले आहे. पीएम किसान योजनेतून दिला जाणारा दोन हजार रुपयांचा अकरावा हप्ता ३१ मे रोजी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या खात्यात जमा झाला. ते लोकसभेचे माजी सदस्य असल्याने या योजनेसाठी… Continue reading पीएम किसान योजनेतून अपात्र करा : राजू शेट्टी

विमानतळाचे नवीन टर्मिनल मार्चअखेर पूर्ण करा : मंत्री सिंधिया

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूर विमानतळाच्या नवीन टर्मिनल बिल्डिंगचे काम मार्च अखेर पूर्ण करा, असे स्पष्ट निर्देश केंद्रीय नागरी हवाई वाहतूक व पोलाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिले. कोल्हापूर येथील विमानतळ विस्तारीकरणाबाबत केंद्रीय नागरी हवाई वाहतूक व पोलाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,… Continue reading विमानतळाचे नवीन टर्मिनल मार्चअखेर पूर्ण करा : मंत्री सिंधिया

नाईट लँडिंग मार्ग तातडीने सुरू करण्याची काँगेसची मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर विमानतळ जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विमानतळावरील नाईट लँडिंग सुविधेसाठी नाईट मार्गाची निश्चिती तातडीने करावी, कार्गो सुविधा सुरू करावी, वाहतुकीची नवी क्षेत्र निश्चित करावी, अशा विविध मागण्या काँगेस आमदारांच्या वतीने  केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (सिंधिया) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.  या निवेदनावर आ. सतेज पाटील, आ. ऋतुराज… Continue reading नाईट लँडिंग मार्ग तातडीने सुरू करण्याची काँगेसची मागणी

पंचगंगा स्मशानभूमीसाठी महापालिकेने १ कोटीचा निधी द्यावा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पंचगंगा स्मशानभूमी विस्तारीकरणासाठी आमदार सतेज पाटील व आमदार जयश्री जाधव यांनी १ कोटी रुपये देऊ केले आहेत. महापालिकेनेही स्वनिधीतून पंचगंगा स्मशानभूमीच्या दुरुस्ती आणि सुशोभीकरणासाठी १ कोटी रुपयाची तातडीने तरतूद करावी अशी सूचना आ. जयश्री जाधव आणि आम ऋतुराज पाटील यांनी प्रशासक कादंबरी बलकवडे यांना दिल्या. पंचगंगा स्मशानभूमीच्या विस्तारीकरणासाठी आ. सतेज पाटील, आ.… Continue reading पंचगंगा स्मशानभूमीसाठी महापालिकेने १ कोटीचा निधी द्यावा

error: Content is protected !!