इफ्फी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव उद्यापासून

मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय सिने-सृष्टीत सध्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची म्हणजेच ‘इफ्फी’ची चर्चा आहे. उद्यापासून भारतातील या सर्वात मोठ्या चित्रपट महोत्सवाला सुरुवात होणार आहे. गोव्यात २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान हा महोत्सव पार पडणार आहे.  आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पाच मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. यात विक्रम पटवर्धन यांचा ‘फ्रेम’, दिग्पाल लांजेरकचा ‘शेर शिवराज’, डॉ.… Continue reading इफ्फी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव उद्यापासून

पहिल्या खासगी रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण

हैदराबाद (वृत्तसंस्था) भारतीय अंतराळ संशोधन संस्था- इस्रोने नवा इतिहास रचला आहे. इस्रोच्या श्रीहरीकोटा केंद्रावरून पहिले खासगी रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. हे रॉकेट स्कायरूट एरोस्पेस कंपनीचे आहे. या रॉकेटचे नाव विक्रम सबऑर्बिटल असे आहे. निर्धारित लक्ष्यानुसार हे रॉकेट अवकाशात १०० किलोमीटर प्रवास करेल आणि त्यानंतर ते समुद्रात कोसळणार आहे. या रॉकेटने सकाळी ११.३० वाजता सतीश… Continue reading पहिल्या खासगी रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण

नीरव मोदीला मोठा झटका, भारतात आणण्याचा मार्ग मोकळा

लंडन : पीएनबी घोटाळ्यात फरार आरोपी नीरव मोदीला मोठा झटका बसला असून, नीरव मोदीचा भारतात प्रत्यार्पण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रत्यार्पण थांबवण्याची याचिका यूके हायकोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे फरार नीरव मोदीला लवकरच भारतात आणले जाऊ शकते. ब्रिटनच्या उच्च न्यायालयाने त्यासाठी मान्यता दिली आहे. यावेळी नीरव मोदीचे प्रत्यार्पण कोणत्याही प्रकारे अन्यायकारक किंवा जाचक ठरणार नाही,… Continue reading नीरव मोदीला मोठा झटका, भारतात आणण्याचा मार्ग मोकळा

जपानने सुद्धा छापले होते भारताचे चलन ‘रुपया’

जपान : प्रत्येक देशाचे स्वतःचे चलन असते आणि त्या त्या देशाची सरकारे चलन छपाई करत असतात; पण जपानने सुद्धा रुपयाच्या नोटा छापल्या होत्या, याची फारशी माहिती कोणाला नाही. ही गोष्ट आहे दुसऱ्या महायुद्ध काळातली. त्यावेळी जपानने तत्कालीन बर्मावर म्हणजे आजच्या म्यानमारवर कब्जा केला होता आणि अंदमान निकोबारवर कब्जा मिळविण्यासाठी कूच केले होते. इंग्रजानी जपानी नौसेनेला… Continue reading जपानने सुद्धा छापले होते भारताचे चलन ‘रुपया’

दाऊद टोळी पुन्हा दहशतवादी हल्ले करण्याच्या प्रयत्नात

दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या डी कंपनीकडून फूस मिळत असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा आणि साधनसामुग्री पुरवली जात आहे, असा दावा राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने (एनआयए) केला आहे. दाऊद आणि त्याचा साथीदार छोटा शकील पुन्हा एकदा भारतावर दहशतवादी हल्ले  करण्यःच्या प्रयत्नात असल्याचे एनआयएने म्हटले आहे. एनआयएच्या म्हणण्यानुसार,… Continue reading दाऊद टोळी पुन्हा दहशतवादी हल्ले करण्याच्या प्रयत्नात

भारताकडे प्रगती साधण्याच्या अनेक संधी : पुतीन

मॉस्को: भारतीय नागरिक प्रतिभाशाली आहेत. भारतामध्ये अनेक प्रकारच्या क्षमता आहेत. विकासाच्या रूपाने त्याचे परिणाम लवकरच दिसून आल्याशिवाय राहणार नाहीत, अशा शब्दात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी भारताचे कौतुक केले. रशियाच्या एकता दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. भारताकडे प्रगती साधण्याच्या अनेक संधी आहेत. तब्बल १५० कोटीची लोकसंख्या हे भारताचे सर्वात मोठे बलस्थान आहे. भारतीय लोक भौतिक… Continue reading भारताकडे प्रगती साधण्याच्या अनेक संधी : पुतीन

उद्योगपती जमशेद इराणी यांचे निधन

जमशेदपूर (वृत्तसंस्था) : स्टील मॅन ऑफ इंडिया अशी ओळख असलेले उद्योगपती पद्मविभूषण जमशेद जे. इराणी यांचे निधन झाले आहे. सोमवारी रात्री जमशेद इराणी यांनी जमशेदपूरमध्ये अखेरचा श्वास घेतला. जमशेद इराणी हे ८५ वर्षांचे होते. गेल्या जवळपास ४ दशकांपासून ते टाटा स्टीलशी संलग्न होते. जून २०११ मध्ये टाटा स्टीलच्या संचालक मंडळातून जमशेद इराणी सेवानिवृत्त झाले. त्यांनी… Continue reading उद्योगपती जमशेद इराणी यांचे निधन

अभिनेत्री रंभाच्या कारला कॅनडामध्ये अपघात : मुलगी गंभीर

मुंबई (प्रतिनिधी) : हिंदी सिनेसृष्टीतील ‘बंधन’, ‘जुडवा आणि ‘क्रोध’ यासारख्या सुपरहिट चित्रपटांची अभिनेत्री रंभाच्या गाडीला कॅनडात अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रंभा मुलांना शाळेतून घरी घेऊन जात असताना ही घटना घडली. यामध्ये रंभाची धाकटी मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या दुर्घटनेची माहिती, अभिनेत्री रंभाने सोशल मीडियावर शेअर केली आहे. यावेळी… Continue reading अभिनेत्री रंभाच्या कारला कॅनडामध्ये अपघात : मुलगी गंभीर

एक सेलिब्रिटी ठरला शेकडो लोकांच्या मृत्यूचे कारण…

दक्षिण कोरिया (वृत्तसंस्था) : दक्षिण कोरीयामध्ये  हॅलोविन पार्टीदरम्यान  झालेल्या चेंगराचेंगरीत १५१ जण मृत्यूमुखी पडले आहेत. तर शेकडो लोक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत ५० हून अधिक लोकांना हृदयविकाराचा झटका आला होता. तर अनेक लोक रस्त्यावर पडलेले दिसत होते. काल (शनिवार) रात्री इटावॉन लेजर जिल्ह्यात हॅलोवीन पार्टीचं… Continue reading एक सेलिब्रिटी ठरला शेकडो लोकांच्या मृत्यूचे कारण…

शासनाच्या योजनांचा योग्य प्रकारे विनिमय करावा : सौंदराराजन

पाँडिचेरी : ‘ज्याप्रमाणे मोबाईल मधल्या ठरावीक व्यतिरिक्त इतर सुविधा आपल्याला माहिती नसतात किंवा त्याचा वापर आपल्याकडून होत नाही. त्याच प्रकारे शासनाच्या अशा अनेक योजना आहेत, ज्या आपल्याला माहिती नाहीत आणि जसा आपल्याकडून वापर होत नाही. तेव्हा अशा योजनांची माहिती घेऊन त्यांचा योग्य प्रकारे विनिमय करावा आणि संशोधन क्षेत्रात पुढे जावे’ असे प्रतिपादन पाँडिचेरी विद्यापीठाच्या मुख्य… Continue reading शासनाच्या योजनांचा योग्य प्रकारे विनिमय करावा : सौंदराराजन

error: Content is protected !!