नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर दिल्लीतील गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. ८२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज (सोमवारी) सकाळी ८.१५ वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात ते ‘नेताजी’ या नावाने प्रसिद्ध होते.… Continue reading माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे निधन