आता काही दिवस ऑनलाईन शिक्षणही बंद…

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण देशात ऑनलाइन शिक्षण पध्दतीचा अवलंब करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थी, शिक्षक व पालकही अव्याहतपणे अध्ययन व अध्यापन प्रक्रियेत गुंतले आहेत. पण आता राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणातून दिवाळीची सुट्टी मिळणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज (बुधवार) दिली. विद्यार्थी व शिक्षकांसाठी परंपरागत पध्दतीने मिळणारी सुट्टी या… Continue reading आता काही दिवस ऑनलाईन शिक्षणही बंद…

भाजप नेता म्हणतो, ‘मला पोलिसांनी उचलून फेकलं…’

मुंबई (प्रतिनिधी) : रिपब्लिक चॅनलचे संपादक अर्णव गोस्वामी यांना आज (बुधवार) रायगड पोलिसांनी अटक केली. गोस्वामी यांच्या अटकेनंतर राज्यासह केंद्रातील भाजपा नेते आक्रमक झाले असून त्यांनी ठाकरे सरकारवर जहरी टीका केलीय. अर्णव गोस्वामी यांची भेट घेण्यासाठी अलिबाग पोलीस ठाण्यात गेलो असताना पोलिसांनी परवानगी नाकारली आणि आपल्याला उचलून बाजूला फेकलं असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या… Continue reading भाजप नेता म्हणतो, ‘मला पोलिसांनी उचलून फेकलं…’

नव्या आदेशामुळे ‘मेट्रो’वरून केंद्र-राज्य सरकारमध्ये पुन्हा संघर्ष !

मुंबई (प्रतिनिधी) : ठाकरे सरकारने आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपने  या निर्णयाला विरोध केला. तर आज (मंगळवार) केंद्र सरकारने कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडचे काम थांबवण्याचे आदेश दिला आहे. याबद्दल राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठविण्यात आले आहे. कांजूरमार्गमधील जागा ही मिठागराची असून त्यावरचा हक्क अद्याप सोडलेला नाही. त्यामुळे ही जागा ‘एमएमआरडीए’ला देण्याचा… Continue reading नव्या आदेशामुळे ‘मेट्रो’वरून केंद्र-राज्य सरकारमध्ये पुन्हा संघर्ष !

गुड न्यूज : राज्यातील चित्रपटगृहे त्वरित सुरू होणार…

मुंबई (प्रतिनिधी) : केंद्रीय गृहमंत्रालयाने अनलॉक -५ अंतर्गत गाईडलाईन्स जारी करुन देशातील चित्रपटगृहे १५ ऑक्टोबरपासून उघडण्यास परवानगी दिली आहेत. मात्र महाराष्ट्रातील चित्रपटगृहे आतापर्यंत बंद होती. पण आता राज्यातील चित्रपटगृहे २४ तासांच्या आत सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर चित्रपटांचे नियमित शोज ६ नोव्हेंबरपासून सुरु करण्यात येणार आहेत. या संदर्भात चित्रपट समीक्षक कोमल नाहटा यांनी… Continue reading गुड न्यूज : राज्यातील चित्रपटगृहे त्वरित सुरू होणार…

पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर…

मुंबई (प्रतिनिधी) : विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या ५ जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या जागांसाठी १ डिसेंबरला मतदान होणार असून ३ डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना पाहायला मिळेल. औरंगाबाद, नागपूर आणि पुणे पदवीधर मतदारसंघ तर अमरावती आणि पुणे शिक्षक मतदारसंघ अशा पाच जागांसाठी ही… Continue reading पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर…

गोवा विद्यापीठात छ. शिवाजी महाराज अध्यासन केंद्र सुरू करण्याची खा. संभाजीराजेंची मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोवा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र सुरु करावे, रायगड विकास प्राधिकरणाला गोवा सरकारने पोर्तुगीज कागदपत्रे, पत्रव्यवहार आणि संदर्भग्रंथ याबाबत सहकार्य करावे, या मागण्यांचे निवेदन खा. छ. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचेकडे केली. याबाबतचे निवेदन त्यांनी आज (शनिवार) दिले. मुख्यमंत्री सावंत या दोन्ही मागण्या मान्य करण्यात येतील, अशी ग्वाही यावेळी दिली.… Continue reading गोवा विद्यापीठात छ. शिवाजी महाराज अध्यासन केंद्र सुरू करण्याची खा. संभाजीराजेंची मागणी

होय, पुलवामा हल्ला आमच्या सरकारचं कृत्य ! : पाकिस्तानी मंत्र्याची कबुली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गतवर्षी काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेला दहशतवादी हल्ला हे इम्रान खान सरकारचं कृत्य असल्याची निर्लज्ज कबुली पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी आज (गुरुवार) पाकिस्तानी संसदेत दिली आहे. पुलवामा हल्ला हे पाकिस्तानचं यश आहे. पुलवामा हल्ल्याचं श्रेय फवाद चौधरी यांनी त्यांचा पक्ष पीटीआय आणि इम्रान खान यांना… Continue reading होय, पुलवामा हल्ला आमच्या सरकारचं कृत्य ! : पाकिस्तानी मंत्र्याची कबुली

‘हे’ तर मी ३० वर्षांपासून ऐकतोय ! : शरद पवारांचा शिवसेनेला टोला

नाशिक (प्रतिनिधी) : स्थानिक स्वराज्य संस्थांवर एकहाती शिवसेनेची सत्ता आणण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल (मंगळवार) मातोश्रीवर झालेल्या सर्व जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत केले होते. यावरून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. स्वबळावर भगवा फडकवणार हे मी गेल्या ३० वर्षांपासून ऐकत आलो आहे, त्यात नवीन काही नाही, असे त्यांनी म्हटले… Continue reading ‘हे’ तर मी ३० वर्षांपासून ऐकतोय ! : शरद पवारांचा शिवसेनेला टोला

कुमार सानूच्या मुलाचा मस्तवालपणा : ‘बिग बॉस’मध्ये मराठी भाषेचा अवमान

मुंबई (प्रतिनिधी) : कलर्स वाहिनीवर सुरु असलेल्या ‘बिग बॉस’ रिअॅलिटी शोमध्ये जान कुमार सानूनं मराठी भाषेबद्दल अवमानकारक वक्तव्य केले. जान हा प्रसिद्ध गायक कुमार सानूचा मुलगा आहे. यामुळे सर्व थरातून संताप व्यक्त करण्यात होत आहे. शिवसेना आणि मनसेने कलर्स वाहिनीला सानूला या शोमधून हाकलण्याची मागणी केली आहे. राज्यात उमटलेल्या प्रक्षुब्ध भावनांचा विचार करून कलर्स वाहिनीने… Continue reading कुमार सानूच्या मुलाचा मस्तवालपणा : ‘बिग बॉस’मध्ये मराठी भाषेचा अवमान

राज्यातील सर्व नागरिकांना कोरोनाची लस देणार मोफत !

औरंगाबाद (प्रतिनिधी) : राज्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली असली तरी अद्याप धोका टळलेला नाही. त्यामुळे सरकारकडून वारंवार सुरक्षित वावराचे नियम पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कोरोना प्रतिबंधक लसीसाठी आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. ही लस कधी मिळणार हे निश्चित नसले तरी राज्य सरकारने मात्र सर्व नागरिकांना मोफत लस दिली जाईल, अशी घोषणा केली… Continue reading राज्यातील सर्व नागरिकांना कोरोनाची लस देणार मोफत !

error: Content is protected !!