पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले येथील बाबासाहेब गणपती पाटील याच्यावर पन्हाळा पोलीस ठाण्यामध्ये अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा व नागरी हक्क संरक्षण कायदा (ॲट्रॉसीटी) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.

गावातील राजू दिनकर चावरेकर याच्या टेम्पोमधून कामावर जानाऱ्या महिला प्रवास करीत असतात. अन्य महिलांना टेम्पोमध्ये बसण्याकरिता टेम्पो आसुर्ले येथील रस्त्यावर थांबवला असता यातील आरोपी बाबासाहेब गणपती पाटील याने टेम्पो रस्त्यावर का थांबवला याचा राग धरून टेम्पो चालकास मारहाण केली. याबाबत फिर्यादी सुमन हिने बाबासाहेब यास अडवण्याचा प्रयत्न करत असताना त्याने महिलांना जातिवाचक शिवीगाळ केली. टेम्पोचालक राजू चावरेकर हा मारहाणीत जखमी झाला आहे. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत बाबासाहेब पाटील याच्यावर ॲट्रॉसीटीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बाबासाहेब याला पन्हाळा पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधीक तपास शाहूवाडी उपविभागीय अधिकारी रवींद्र साळोखे करत आहेत.