सौंदलगाजवळ कारची झाडाला धडक : महिला, मुलगी जागीच ठार

0
78

निपाणी (प्रतिनिधी) : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सौंदलगाजवळ भरधाव कारची झाडाला धडक बसली. या भीषण अपघातात महिला व मुलगी जागीच ठार झाल्या. तर तिघेजण गंभीर जखमी झाले.  हा अपघात आज (रविवार) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास झाला. यात लता राजेंद्र पाटील (वय ४०) व अनिषा राजेंद्र पाटील (वय १७) अशी मृत्यू झालेल्यांची नांवे आहेत.  तर अथर्व राजेंद्र पाटील (१४), सुमीत राजेंद्र पाटील (१९), राजेंद्र शिवाजी पाटील (४४, सर्व रा. बिस्तूर. जि. सांगली) अशी जखमींची नावे आहेत. 

 घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार,  पाटील कुटुंबीय सांगलीहून कारने बंगळूरला निघाले हाेते. बेळगावच्या दिशेने जाताना राष्ट्रीय महामार्गावरील सौंदलगा येथील कळंत्रे मळ्यानजीक आल्यावर चालकाचे नियंत्रण सुटले.  आणि भरधाव कार  झाडावर जाऊन जोराची धडकली. यात एका महिलेचा आणि मुलगीचा मृत्यू झाला. निपाणी ग्रामीण पोलीस आणि महामार्ग देखभाल करणाऱ्या जयहिंद कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी जाऊन  कारमध्ये अडकलेल्या तिघा जणांना बाहेर काढले. जखमींना निपाणी येथील महात्मा गांधी रुग्णालयात दाखल केले आहे.