शिरोलीत भरधाव कार डिव्हायडरवर धडकली : कोल्हापुरातील तरुण जागीच ठार

0
499

टोप (प्रतिनिधी) : चालकाचा कारवरील ताबा सुटून डिव्हायडरला धडकून झालेल्या अपघातात कारमधील तरुणाचा जागीच मृत्यू झाला. करण रमेश पोवार (रा. रामानंदनगर, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. या अपघातात  सूरज सदाशिव पाटील (रा. संभाजीनगर, कोल्हापूर) गंभीर जखमी झाला. हा अपघात शुक्रवारी रात्री ११.२५ च्या सुमारास कोल्हापूर-सांगली रस्त्यावरील शिरोली टोल नाक्यावर झाला. याची नोंद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करण पोवार आणि सूरज पाटील हे टाटा इंडिका व्हिस्टातून (एमएच ०९ सीएम  ९५११) शुक्रवारी रात्री ११.२५ च्या दरम्यान घरी परत येत होते. त्यांची कार शिरोली जवळील रामदेव बाबा मंदिराजवळ आली असता चालकाचा कारवरील ताबा सुटला. कार वेगात असल्याने टोल नाक्याच्या डिव्हायडरला धडकली. त्यामध्ये कारमधील करण पोवार याचा जागीच मृत्यू झाला. तर सूरज पाटील हा गंभीर जखमी झाला. या अपघाताची नोंद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली आहे.