ख्रिसमस परेडमध्ये भरधाव गाडी घुसली : अनेक जण चिरडले

0
25

वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) : ख्रिसमस परेडमध्ये भरधाव गाडी घूसून झालेल्या अपघातात अनेकांचा चिरडून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. ही धक्कादायक घटना अमेरिकेच्या विस्कॉन्सिनमध्ये घडली. या भयंकर घटनेचा  व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

विस्कॉन्सिनच्या वौकेशा शहरात ख्रिसमस परेड सुरू  असताना  एक लाल रंगाची स्पोर्टस कार अंदाधुंद पद्धतीने गर्दीला चिरडून जाताना दिसत आहे. या घटनेतील मृतांचा अधिकृत आकडा अद्याप समजू शकलेला नाही. मात्र २० हून अधिक जण या अपघातात गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये काही लहान मुलांचाही समावेश आहे.