राशिवडे (प्रतिनिधी) :  कोल्हापूर ते राधानगरी रस्त्यावर खिंडी व्हरवडे ते अनाजे दरम्यानच्या रस्त्यावर भरधाव वेगाने टाटा इंडिका (एमएच ०९ बीबी ३००७) ही कार झाडावर आदळून अपघात झाला. यामध्ये कारचालक जागीच ठार झाला. तर गाडीमधील चार प्रवासी जखमी झालेत. एकनाथ गुंडू पाटील (रा. बटकणंगले ता. हातकणंगले) असे या मृत कारचालकाचे नाव आहे. हा अपघात आज (सोमवार) दुपारी झाला आहे.

यावेळी गाडीमधील जखमी प्रवाशांना स्थानिक नागरिकांनी कोल्हापूर येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले आहे. गाडी चालवताना चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने अपघात घडल्याचे समजते. अधिक तपास राधानगरी पोलिस करत आहेत.