इचलकरंजी नजीकच्या औद्योगिक वसाहतीत गांजा पुरवणारी टोळी जेरबंद

0
103

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजीनजीक असलेल्या पार्वती औद्योगिक वसाहतीत गांजा पुरविणाऱ्या टोळीला इचलकरंजी पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. वसीम बाणदार (वय २८),  शाहरुख गवंडी (२४),  मोहम्मद हारिस (२१), अजमेर मुल्ला (२३, रा. सर्व जण सांगली) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून ५ किलो गांजा, मोटार आणि ४ मोबाईल असा सुमारे साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वरील सर्व आरोपी कर्नाटक तसेच कोल्हापूर जिल्ह्यात गांजा पुरवण्याचे काम करत होते. याची माहिती मिळताच पो. ना. सुनील पाटील, सागर हारुगले, जावेद आंबेकरी, सुहास शिंदे यांनी मुख्य आरोपी वसीम बाणदारसह चौघांना थरारक पाठलाग करून अटक केली. त्यांच्याकडून  ५ किलो गांजा, एक मोटार, ४ मोबाईल एकूण ३ लाख ४५ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला

या कारवाईमध्ये शहापूर ठाण्याचे सपोनि गणेश खराडे, शशिकांत ढोणे, मनोज मडीवाळ आदींनी सहभाग घेतला