निवडून येण्याची क्षमता असणारे उमेदवार शिवसेनेच्या संपर्कात : राजेश क्षीरसागर

0
1224

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आगामी कोल्हापूर महापालिका निवडणूक लढविण्यासाठी निवडून येण्याची क्षमता असणारे ३० पेक्षा अधिक उमेदवार शिवसेनेच्या संपर्कात आहेत, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज (मंगळवार) येथे पत्रकार परिषद दिली.   

क्षीरसागर म्हणाले की, ज्या पक्षाचा मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री आहे, त्यांना विकास करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर काम न करता आधीच काम आम्ही करत आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांच्या दौऱ्यानंतर शहरातील अनेक प्रलंबित कामे मार्गी लागली आहेत.   शिवसेना येत्या निवडणुकीत एक नंबरचा पक्ष असेल, असा विश्वास यावेळी क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे.