इचलकरंजी पालिका इमारतीतील शाळांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव रद्द करा : इचलकरंजी नागरिक मंचची मागणी

0
74

इचलकरंजी (प्रतिनिधी) : नगरपरिषदेच्या शाळातून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षण मिळण्यासाठी खासदार धैर्यशील माने निधी उपलब्ध करून देणार आहेत. नगरपरिषद इमारतीतील शाळांचा मुदतवाढीचा आगामी सभेसमोरील प्रस्ताव रद्द करावा, त्याचप्रमाणे शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशा मागण्या इचलकरंजी नागरिक मंचने केल्या आहेत. आज (शुक्रवार) याबाबतचे निवेदन प्र. मुख्याधिकारी शरद पाटील यांना देण्यात आले.

या वेळी प्र. मुख्याधिकारी शरद पाटील यांनी शाळेच्या खाजगीकरण व मुदतवाढीबाबत सभेत म्हणणे मांडून निर्णय घेणार असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे भटक्या कुत्र्यांचा निर्बीजीकरण प्रस्ताव सभेसमोर ठेवणार असल्याचे आरोग्य अधिकारी सुनिलदत्त संगेवार यांनी सांगितले.

या वेळी ‘इनाम’चे अभिजित पटवा, राजू कोंनूर, अमित बियाणी, राजूदादा आरगे, उदयसिंह निंबाळकर, महेंद्र जाधव, सचिन बाबर, विद्यासागर चराटे, धैर्यशील कदम, राजेश बांगड आदी उपस्थित होते.