अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांच्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी २३ पासून कॅम्पचे आयोजन

0
160

कोल्हापूर (प्रतिनिधी) : समाजकल्याण विभागाकडील अनु. जाती, वि.जा.भ.ज., इ.मा.व., वि.मा.प्र. व दिव्यांग यांच्या मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्तीसाठी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी दिली.

घाटे यांनी सांगितले की, प्रत्येक तालुक्यासाठी पुढीलप्रमाणे कॅम्पचे नियोजन करण्यात आले आहे. चंदगड आजरा व गडहिंग्लज – विभागासाठी मंगळवार दि. २३ फेब्रुवारी रोजी माध्यमिक शिक्षण सेवकांची पतसंस्था, गडहिंग्लज (श्री साई मंदीर मार्ग डॉक्टर्स कॉलनी) येथे, राधानगरी, भुदरगड व कागल – २५ रोजी श्री परशराम पाटील माध्यमिक विद्यालय, मुदाळ (ता. भुदरगड) येथे, पन्हाळा व शाहूवाडी – २६ रोजी सरनोबत गर्ल्स हायस्कूल, आसुर्ले पोर्ले (ता. पन्हाळा) येथे, हातकणंगले व शिरोळ – १ मार्च रोजी माध्यमिक आश्रमशाळा, , अण्णासाहेब डांगे संकुल, हातकणंगले येथे, करवीर व गगनबावडा – २ मार्च रोजी लोहिया मूकबधिर विद्यालय, कोल्हापूर.

या कॅम्पमध्ये दिव्यांग शिष्यवृत्तीधारक शाळेच्या मुख्याध्यापकांनी उपस्थित रहावे. ४ जानेवारीच्या सूचनेनुसार शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पात्र विद्यार्थ्यांचे प्रस्ताव उर्वरित कॅम्पमध्ये सादर करण्याबाबत कार्यवाही करावी, असेही घाटे यांनी सांगितले.