मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या निषेधार्थ सोमवारी कुरुंदवाड बंदची हाक…

0
15

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : कुरुंदवाडमधील एका महिला सफाई कामगारावर  मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी अन्याय केला आहे. त्या सफाई कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी निखिल जाधव यांच्या निषेधार्थ ३० मे रोजी कुरुंदवाड शहर कडकडीत बंद करण्याचे आवाहन सर्व पक्षीय कृती समितीच्या वतीने माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांनी केले आहे.

आज कुरुंदवाड येथे मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या निषेधार्थ सर्व पक्षीय नेते व कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत सफाई कर्मचारी त्रिमुर्ती वाघेला, लक्ष्मीबाई लालबागे या उपस्थित होत्या. तसेच  कुरुंदवाडचे व्यापारीही उपस्थित होते. यावेळी त्यांनी कुरुंदवाड बंदसाठी पाठिंबा जाहीर केला.

यावेळी माजी नगरसेवक उदय डांगे, किरण जोंग, उमेश कर्नाळे, आयुब पट्टेकरी, आप्पासाहेब भोसले, संतोष शहा, अभय पाटुकले, रघु नाईक, सुनिल जुगळे, सुहास पासोबा आदी उपस्थित होते.