परंतु, आमच्या दोघांच्याही वाटा वेगळ्या झाल्या : ना. हसन मुश्रीफ

0
110

कागल (प्रतिनिधी) : मी आणि संजय घाटगे आम्ही दोघेही कॉलेजचे मित्र. त्यावेळी आम्ही कॉलेजमध्ये दोघेही फास्ट बॉलर होतो, तसेच राजकारणातही ही आहे. आम्ही स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखाली एकाच गटात काम केले. परंतु, काही कारणास्तव आमच्या दोघांच्याही वाटा वेगळ्या झाल्या असल्याचे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. ते कागल तालुक्यातील भडगांव येथे बोलत होते.

यावेळी भडगांव येथे ग्रामदैवत हनुमान मंदिराचे भूमिपूजन,  मरगुबाई मंदिरांची वास्तुशांती तसेच विविध विकास कामांची उद्घाटन ना. मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ. संजयबाबा घाटगे होते.  

संजयबाबा घाटगे यांनी, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राजकीय वारसा नसतानाही कर्तुत्वाच्या जोरावर  जनतेला आपलंसं केलं. त्यांच्या हातून अजूनही लोककल्याणाचं बरंच कार्य बाकी आहे. अल्पसंख्यांक समाजात जन्मूनही केवळ लोकसेवेचे व्रत घेऊन त्यांनी बहुजन समाजाला सोबत घेऊन नेतृत्व केल्याचे सांगितले.         

मंत्री मुश्रीफ म्हणाले की, जनतेने मला एवढे भरभरून दिलं आहे की या जन्मीच काय, सात जन्मी सुद्धा जनतेच्या ऋणातून उतराई होऊ शकत नाही.  तसेच विविध विकास कामांच्या माध्यमातून मी जनतेचे पांग फेडणार असल्याचे प्रतिपादन केले.

यावेळी अंगणवाडी इमारत उद्घाटन, नवीन फिल्टर हाऊस उद्घाटन, गावातील अंतर्गत रस्ते- गटर्स, हनुमान मंदिरसमोर पेव्हिंग ब्लॉक, हायमास्ट पोलची उभारणी, माळवाडी रस्ता डांबरीकरण, पाणवठा रस्ता खडीकरण-डांबरीकरण,  भडगांव ते भडगांव फाटा रस्ता डांबरीकरण अशा एकूण दीड कोटी  रूपयांच्या कामांचा  लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते

यावेळी जि.प. सदस्य मनोज फराकटे, एम. एस. पाटील, सरपंच दिलीप चौगले, उपसरपंच बी.एम.पाटील, ज्ञानदेव म्हांगोरे, दत्तात्रय सोनाळकर, देवानंद पाटील, बाबासो चौगले,  समाधान राणे, रघुनाथ पाटील, मधुकर कांबळे आदी उपस्थित होते.