टोप (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील हेर्ले येथे दिव्यांगांसाठी वीस लाखांचा  एक वर्षात व्यवसाय हॉल उभारणार असल्याचे प्रतिपादन माजी सभापती राजेश पाटील यांनी केले. ते राष्ट्रीय दिव्यांग दिन आणि वेद अपंग सेवाभावी संस्थेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपा दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष गजानन सुभेदार होते.

यावेळी राजेश पाटील म्हणाले, दिव्यांग बांधवांना सर्वोतोपरी मदत केले जाईल. दिव्यांग हाँलसाठी जि. प. च्या फंडातून दहा लाख रुपये तर ग्रामपंचायत आणि पंचायत समिती फंडातून प्रत्येकी पाच लाख असे वीस लाख खर्चून एक वर्षात हाँल पुर्ण करण्यात येणार असल्याचे सांगितले.

यावेळी राजेश पाटील, जिल्हाअध्यक्ष अनिल उपाध्ये, स्वाभिमानी शेतकरी संघटना सरचिटणीस मुनीर जमादार, भाजपा तालुका चिटणीस श्रीकांत पाटील, उपसरपंच राहुल शेटे, माजी उपसरपंच संदीप चौगुले यांच्या हस्ते प्रतिमापुजन आणि दिपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी अपंगांना जाँब कार्डचे वाटपही करण्यात आले.

यावेळी  ग्रा.पं. सदस्या निलोफर खतीब, जिल्हाअध्यक्ष अनिल उपाध्ये, उज्वला परमाज यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.