भोपाळ (वृत्तसंस्था) : मध्य प्रदेशात कालव्यात  ६० प्रवाशांची बस कोसळून झालेल्या भीषण अपघातात ३२ प्रवाशी ठार झाले आहेत.  तर अनेक प्रवाशांचे मृतेदह वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ७ जणांना वाचवण्यात यश आले आहे. ही दुर्घटना आज सकाळी ७.३० वाजता घडली.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत  तत्काळ बचावकार्य सुरु केले. घटनास्थळी डॉक्टर आणि रुग्णवाहिका  आल्या होत्या.  ही अत्यंत दुख:द घटना आहे. बचावकार्य आधीच सुरु आहे. दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत दिली जाणार आहे. संपूर्ण राज्य पीडितांच्या दुखात सहभागी आहे, अशा शोकभावना  मुख्यमंत्री  शिवराजसिंग चौहान यांनी व्यक्त केल्या आहेत.