अमरावती (प्रतिनिधी) : शिवजयंतीच्या दिवशी कोरोनाचे नियम धाब्यावर बसवत विनामास्क व विना हेल्मेट बुलेट सवारी केली. या प्रकरणी आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला   आहे. नवनीत राणा आणि रवी राणा हे बुलेटवरुन जात असताना दोघांनीही मास्क घातलेला नव्हता. याचा व्हिडिओ रवी राणा यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंट वरून पोस्ट केला होता.

राज्यभरात दुचाकीवर प्रवास करताना प्रत्येकाने मास्क लावणे बंधनकारक केले  आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरोधात मोठी कारवाई केली जात आहे. आतापर्यंत अनेक जणांवर ही कारवाई केली आहे. शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला जाताना नवनीत राणा आणि रवी राणा दोघेही बुलेटवर गेले. पण त्यावेळी दोघांनीही मास्क आणि हेल्मेट घातलेले नव्हते. अशावेळी सर्वसामान्य नागरिकांना बंधनकारक असलेली नियमावली लोकप्रतिनिधींना नाही का?, असा सवाल नागरिकांतून उपस्थितीत केला जात आहे. जर लोकप्रतिनिधीच नियम मोडून सार्वजनिक ठिकाणी प्रवास करत असतील, तर ही बाब अत्यंत चुकीची आहे.