अजित पवार यांच्या नावाने बिल्डरला खंडणीसाठी धमकी

0
10

पुणे (प्रतिनिधी) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाईल नंबरचा वापर करत पुण्यातील एका मोठ्या बिल्डरला खंडणीसाठी धमकी दिल्याचा प्रकार आज (शुक्रवार) समोर आला आहे. या बिल्डरकडे २० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. याप्रकरणी बिल्डरने बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी ६ संशयित आरोपींना अटक केली आहे.

एका अॅपच्या सहाय्याने आरोपींनी अजित पवार यांच्या नावाने बिल्डरला फोन केला. अजित पवार यांचा पीए चौबे बोलत असल्याचे सांगून आरोपींनी या बिल्डरकडे  खंडणी मागितली. हा प्रकार १३ जानेवरीपर्यंत सुरु होता. आरोपींनी बिल्डरकडून २ लाख रुपयेही उकळले होते. एका अॅपद्वारे आरोपींनी अजित पवार यांच्याच मोबाईल क्रमांकाचा वापर केल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.